बालगीते

बालभारतीच्या कवितेची गाणी

Submitted by Charudatta Sawant on 28 February, 2022 - 10:39
तारीख/वेळ: 
28 February, 2022 - 10:21
ठिकाण/पत्ता: 
तळेगाव दाभाडे, पुणे

बालभारतीच्या कवितेची गाणी

मला माझ्या लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या आपणा सर्वांनाच आवडत असत.

ह्या बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेला वाचक आणि श्रोत्यांसाठी त्या मी नवीन रुपात सादर केले आहे.

बालभारतीच्या कवितेची गाणी ही लेखमाला माझ्या ब्लॉगवर मी केलेली आहे.

माहितीचा स्रोत: 
https://charudattasawant.com/balbharati
प्रांत/गाव: 

पिढ्या सांधणारा दुवा

Submitted by रायगड on 8 October, 2015 - 14:42

रात्री मुलांना झोपवताना मी एक गाणं बरेचदा म्हणते - 'गोजिरवाणी खार पहा ही, गोजिरवाणी खार!' पूर्वी मुलांना आवडायचं गाणी ऐकणं...आता ती माझीच गरज म्हणून मी घसा साफ करून घेते. हिचं गाणं ऐकण्यापेक्षा पटकन झोपलेलं बरं...असा विचार करून ते लवकर झोपतात हा एक मोठा फायदा! असो!

एक चिऊ गोजीरवाणी

Submitted by पुरंदरे शशांक on 30 July, 2014 - 23:09

एक चिऊ गोजीरवाणी

एक चिऊ गोजीरवाणी
गात अस्ते गाणीच गाणी

गोबरे लाल मोठ्ठे डोळे
दुडकत चिऊ कश्शी चाले

हातात असते भावली एक
नाचत गिरकी घेत सुरेख

भाव्लीचे कधी लाड फार
कधी मिळतो चापट-मार

हे काय नि ते काय
चिऊताई थांबतंच नाय

तंद्रीत अस्ता चिऊताई
ऐकू मुळीच येत नाही

चिवचिव करता चिऊताई
हळुचकनी झोपून जाई ....

’माझं एक स्वप्न आहे

Submitted by SuhasPhanse on 30 December, 2010 - 01:12

’माझं एक स्वप्न आहे’ मराठी किशोरवयीन मुला-मुलींनी नववर्षाचा संकल्प म्हणून गाण्यासाठी स्फुर्तीदायक गाणे. हे गाणे स्टेजवरही ’परफ़ॉर्म’ करता येईल. नुसते गाऊन किंवा नाचत-गातसुद्धा. बच्चाकंपनीला भेट म्हणूनसुद्धा आपण हे गाणे पाठवू शकता.

गुलमोहर: 

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

Submitted by अभय आर्वीकर on 14 August, 2010 - 01:31

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

मोरा मोरा नाच रे
अंकलिपी वाच रे
वाचता वाचता बोल रे
पृथ्वी कशी गोल रे

गोल चेंडू उडला
सुर्यावरती पडला
कान त्याचा कापला
म्हणून सुर्य तापला

ऊन, हवा आणि
गरम झाले पाणी
पाणी गरम झाले
वाफ़ होऊन आले

सोडूनिया धरती
वाफ़ गेली वरती
आभाळात मगं
तिचे झाले ढगं

ढग वाजे गडगड
वीज चमके कडकड
वारा सुटला सो-सो
पाऊस आला धो-धो

मोरा मोरा नाच रे
श्रावणाचा मास रे
नाचता नाचता सारा
फ़ुलवून दे पिसारा

गुलमोहर: 

अंगाई गीत - जरा साजरासा...!!

Submitted by अभय आर्वीकर on 9 February, 2010 - 05:21

अंगाई गीत - जरा साजरासा...!!

कसा बाळ माझा? श्याम सावळासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

चांदणे स्वरूपी चंदनाचे अंग
मुख पाहतांना तारकाही दंग
असा बाळ माझा, चंद्र गोजिरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

नेत्र काजळीले, तीटबिंदु गाली
टिळा देखुनिया दृष्टही पळाली
हसे बाळ माझा, विठू हासरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

ओठी अंगठ्याने करी सुधापान
तया चुंबण्याला लोभावते मन
दिसे बाळ माझा, राम सुंदरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

आली बघा आली, नीजराणी आली
मिटमिट पापण्यांची, पेंग लुब्ध झाली
निजे बाळ माझा अभय सागरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

गुलमोहर: 
Subscribe to RSS - बालगीते