स्पर्श

स्पर्श

Submitted by राजेंद्र देवी on 3 February, 2019 - 11:27

स्पर्श

बालपणीचा स्पर्श मायेचा
तो हात होता आईचा
पाठीवरी फिरे स्पर्श
तो हात होता बाबांचा

हातात हात घालून हिंडलो
तो स्पर्श होता मैत्रीचा
फुलला तो स्पर्श
तो हात होता प्रियेचा

केली वाटचाल आयुष्याची
स्पर्श होता सहचरी प्रियेचा
खट्याळ तो स्पर्श
तो हात होता नातवाचा

केला स्पर्श वार्ध्यक्याने
आसुसलेला मी स्पर्शाचा

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

भास होते

Submitted by अविनाश महाले on 23 December, 2018 - 08:11

भास होते तुझे स्पर्श सारे ।
व्यर्थ हेलावती का शहारे ।
फूलही मागते तू कशाला
पेरते वाट माझी निखारे ।
आज मी वेदनामुक्त झालो
मानले वेदनांचे पहारे ।
सांग तू ऐक तूही जरासे
वेदनेला मिळे ना किनारे ।
आज, तू ना तुझी आठवणही
हे कसे प्राक्तनाचे इशारे।

शब्दखुणा: 

पहिला स्पर्श......

Submitted by हेमंत on 18 November, 2017 - 00:38

पहिला स्पर्श... पावसानंतरचा
बघ ना आज पण पाऊस पडला न तुझी आठवण आली ,
आठव ना, आपण सोमेश्वरला गेलेलो तू आली होतीस एक दीड तासाने college road वर तुझ्या मैत्रिणीला railway स्टेशन वर सोडून मी वाट पाहत होतो तुझी पाऊस पडून गेलेला होता नुकताच...
तो एक दीड तास पण मला एखाद्या जन्मासारखा वाटला कोणतीही activa येवो चालवणारी तूच आहेस का बघत होतो, पण तू आलीस न ठरले जाऊ सोमेश्वर...सोमेश्वर ला पोहचल्यावर आपण घेतलेली गुलाबाची फुले (अजून पण आहेत का ग ते तुझ्याकडे) ..

विषय: 
शब्दखुणा: 

हे काय होते ..?

Submitted by मिलन टोपकर on 24 January, 2012 - 11:01

जे स्पर्श आपलंसं
गालांस होत होते,
माझ्याच आसवांचे
अलवार हात होते ...!

मज सोबतीस 'ती' ही
होती हवी म्हणुनी
माझे नी सावलीचे
घरटे उन्हात होते ...!

माझी वरात ज्यांनी
खांद्यावरुन नेली
मारेकर्‍यांत माझ्या
त्यांचेच हात होते ...!

माझ्या मनातले ते
अंधार दाटलेले
वणव्यात आठवांच्या
उजळुन जात होते ...!

गेले उडुन पक्षी
नभ मोकळे, भकास
हे कोणत्या दिशेचे
वारे वहात होते ...?

गुलमोहर: 
Subscribe to RSS - स्पर्श