कवितेस,

Submitted by मुक्ता.... on 24 March, 2022 - 12:24

कवितेस....

पडताझडताना सावरतेस....
दुःखात बुडताना अश्रूंना आवरतेस....
सुखात मी हलकी झुलताना.....
मला सांभाळतेस.....
जगण्याचे माझ्या परिमाण आहेस...
नवीन शब्दमाळ जन्म घेते जेव्हा,
मनातल्या भावना मोती तुझ्यातला बनू पाहतात...
एका तालात गुणगुणू लागतात....
अतीव तुझे सामर्थ्य....
या साहित्याच्या महासागरात अथांगतेचा आनंद घेताना...
आपल्या क्षुद्रपणाचे जाणिवेत अधिक लहान भासताना,
तूच पुन्हा तारू बनू पाहतेस....
कवेत घेतेस,किनारा दाखवतेस....
एक क्षुल्लक मी कण असताना,
अनेक मौक्तिकात एक साधा धूलिकण मी...
अस्तित्वाला अर्थ देतेस....

मुक्ता
२४/०३/२०१९

Group content visibility: 
Public - accessible to all site users