आठवण

Submitted by sanjay_35928 on 10 May, 2022 - 04:57

नमस्कार मायबोलीकर,

पहिल्यांदाच लहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही चुकल्यास क्षमा असावी.

आठवण
आयुष्याच्या उत्तरार्धात सर्व आठवू लागले.
सुटून गेलेले क्षण आठवण म्हणून पहिले.

काय करायचे राहून गेले डोळ्यांसमोरून तरळून गेले.
अचानक माझे मन विस्मुर्तीत रमुन गेले.

काही क्षण सुटले की जाणूनबुजून जाऊ दिले.
अजून उत्तर सापडत नाही विचार करणे सोडून दिले.

एक एक क्षण आठवु लागल्यावर डोळ्यात आश्रू आले.
ज्यांच्यासाठी आले तेच सोडून गेले.

राहिल्यात आठवणी त्यांच्या, भास होत राहिले.
हाक आली म्हणून मागे वळून पहिले.

भासच होता तो, प्रत्यक्ष कोणी नाही राहिले.
थबकून क्षणभर पुन्हा काही क्षण उचंबळून आले.

थकून गेलो विचार करुनी, काही नाही राहिले.
आठवणींच्या शिदोरीवर आयुष्य उरून राहिले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users