आरोग्य

शतायुषी व्हायचे आहे काय?

Submitted by SureshShinde on 13 October, 2021 - 12:59

जपान मध्ये एक छोटसं बेट आहे त्याचं नाव आहे, ओकिनावा. या बेटाचे वैशिष्ट्य असे आहे की येथील सर्व माणसे शंभर वर्षापेक्षा जास्त जगतात. संपूर्ण जपान मध्ये शंभरी गाठलेल्या व्यक्तींची संख्या दर एक लाखांमध्ये 65 आहे अनेक प्रगतीशील देशांमध्ये ही संख्या 30 पर्यंत आहे तर आपल्या देशामध्ये ही संख्या फक्त तीनच आहे. दीर्घायुषी होणे म्हणजे एका अडचणींची शर्यतच आहे जणू!

विषय: 

स्थूलता: शरीरस्थ महारिपु !

Submitted by SureshShinde on 9 October, 2021 - 03:22

११ ऑक्टोबर हा जागतिक स्थूलता अथवा लठ्ठपणा प्रबोधन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने स्थूलता अर्थात लठ्ठपणा याविषयी थोडीशी माहिती करून घेणे सयुक्तिक ठरेल.

विषय: 

लागली कशी ही उ- च- की

Submitted by कुमार१ on 29 September, 2021 - 06:14

“मला, लागली कुणाची उचकी”, ही पिंजरा चित्रपटातील लावणी माहीत नाही असा मराठी गानरसिक विरळा. उषा मंगेशकर यांच्या स्वराने जगदीश खेबुडकरांच्या या चित्रगीताला अजरामर केलेले आहे. असो. आज ते गाणे हा आपला विषय नाही. तरीसुद्धा हे गाणे माझ्या ओठांवर यायचे कारण म्हणजे…….
.....
.....
आज त्या गाण्यातील ‘उचकी’ वर काही आरोग्यलेखन करीत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

भारतातील चांगले बीपी आणि शुगर मशीन

Submitted by च्रप्स on 21 September, 2021 - 10:28

आजीला अचानक किडनी सूज आल्यामुळे ऍडमिट करावे लागले, डॉक्टर म्हणाले शुगर शूट झाल्यामुळे असा त्रास झाला आहे...
आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरीच बीपी आणि शुगर चेक करण्याचा प्लॅन आहे...
चांगले मशीन सुचवू शकता का... वापरण्यास सोपे असावे आणि ऍक्युरेट...

शब्दखुणा: 

हवामानातील बदल (क्लायमेट चेंज) आणि स्त्री आरोग्य

Submitted by सीमंतिनी on 12 September, 2021 - 22:41

स्त्रियांचे आरोग्य हवामानाशी निगडीत आहे ही बाब हल्ली प्रकर्षाने जाणवत आहे कारण पर्यावरणाचा समतोल ढासळला तशा स्त्रीच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या. हवामान बदलांचा परिणाम पुरुषांच्या आणि बालकांच्या आरोग्यावरही होतोच; पण त्याबद्दल चर्चा नंतर कधी करू.

विषय: 

स्व-काळजी-आहार-किती आणि कधी?

Submitted by मोहिनी१२३ on 6 September, 2021 - 10:41

भूक लागली असताना खाणं ही आणि प्रकृती आणि संस्कृतीही.
दुसर्याला जरूर द्या मग त्याकरिता मुद्दामून जास्त बनवा.
भूक लागली असताना ती चहा/कॅाफी/ तत्सम पेयांनी मारणं ही विकृती.
भूक लागली नसताना खाणं ही ही विकृतीच.
किती खावे- पोट म्हणेल तितके.
कधी खावे-भूक लागली असताना.
काय खावे-ताजे
कसे खावे-शांतपणे बसून.

ह्या, आयुष्य इतके सोपे असते तर काय हवे होते….

व्यायाम / जिम/ कार्डिओ फिटनेस लेव्हल

Submitted by सामो on 30 August, 2021 - 05:41

सात आठ महीने झाले अ‍ॅपल वॉच घेउन. बरेच उपयोगी आहे.
आठवडा झाला जिम जॉइन करुन. अचानक अ‍ॅपल वॉचवरती नोटिफिकेशन्स येऊ लागली - कार्डीओ फिटनेस लेव्हल अति कमी (Poor) आहे.
https://www.whyiexercise.com/VO2-Max.html
इथे वाचनात आले माझ्या वयाला, स्त्रियांची कार्डिओ फिटनेस लेव्हल अगदी Poor - २१-२४ आहे.
माझी तर १९ दाखवते. त्यामुळे हादरले आहे.
---------------------------------------------------------

वेटलॉस तमाशा

Submitted by Kavita Datar on 25 August, 2021 - 10:19
'यात XL साईज असेल का ? आत जाऊन विचारावं का ?' मी विचारात पडले.

वेटलॉस तमाशा

(माझ्या जवळच्या मैत्रिणीची वेटलॉस स्टोरी तिच्या संमती ने शब्दबद्ध करत आहे. आशा आहे वाचकांना नक्कीच आवडेल. आपल्या अभिप्रायांच्या प्रतिक्षेत...)

मॉलमधल्या त्या रेडिमेड कपड्यांच्या दुकानासमोर माझी पावलं थबकली. हँगर ला टांगून ठेवलेल्या, बाहेरच्या भागातील शोकेस मध्ये लावून ठेवलेल्या ऊंची कपड्यांची आकर्षक मांडणी मनाला भूरळ पाडत होती. शोकेसमधल्या लाल काळ्या रंगाच्या, सुंदर डिझाईन च्या एका वनपीस वर माझी नजर रेंगाळली.

विषय: 
शब्दखुणा: 

पुण्यातील स्त्रीरोगतज्ञ

Submitted by दीपाकुल on 10 August, 2021 - 15:14

पुण्यात चांगल्या स्त्रीरोगतज्ञांची नावे समजतील का? सिंहगड रोड, कोथरूड, सातारा रोडच्या आसपास? आयुर्वेदीक किंवा अॅलोपॅथीक दोन्हीही सुचवा.

लहान मुलांचा तिरळेपणा कमी।करायचे उपाय

Submitted by समीक्षा on 9 August, 2021 - 15:08

माझ्या नऊ महिन्याच्या मुलीच्या डोळ्यात तिरळेपणा दिसू लागलाय, ती कसा ठीक होऊ शकतो , खूप लहान आहे तर काही घरगुती उपाय होऊ शकतात का?

विषय: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य