जून महिना सुरु झाला कि नवीन इयत्ता नवीन कपडे नवीन वह्या नवीन पुस्तके. सारे काही नवीन नवीन. पण त्या नाविन्याला "उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरु झाली" ह्याची कडवी किनार पण असायची. नवीन पुस्तकांमध्ये सर्वात आवडीचे पुस्तक असायचे ते मराठीचे. हातात पडल्यापडल्या ते अथपासून इतिपर्यंत भराभरा वाचून काढायचो. गोष्टीचे पुस्तक वाचल्यासारखे. नवीन पुस्तकांच्या नाविन्याचा गंध हवेत विरून जाण्यापूर्वी हे मराठीचे पुस्तक वाचून झालेले असायचे. त्यातले काही धडे, काही धड्यातील काही वाक्ये, काही कविता पुढे आयुष्यभर लक्षात राहिल्या.
.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अंतर्गत, बालभारती ने सर्वप्रथम 1971 मधे किशोर प्रकाशित करायला सुरुवात केली!!, पाठयपुस्तक मंडळात विषय तज्ञ म्हणुन माझे वडील "सिलेबस रिव्यु" ला पुण्याला जात असत, त्यांनीच प्रथम मला ह्या मासिकाची गोडी लावली, कॉन्वेंट मधे शिकुनही आज जी काही मोड़की तोड़की मराठी मी लिहु शकतो त्याचे बऱ्याच अंशी श्रेय ह्या मासिकाला मी देतो, 1992 ते 2000(वय वर्षे 7 ते 16) दर महिन्याला हे मासिक घरपोच अगदी वेळेवर येत असे पोस्टाने.
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू. 