Cनाटक, चित्रपट, मुलाखती , वेब सिरीज यांवर धागे आहेत.
हा एक धागा नाटक/ चित्रपट / मुलाखती सोडून इतर मराठी कार्यक्रमांची ओळख/ परीक्षण करून देण्यासाठी.
सध्या ललितलेखनात टाकला आहे कारण मला कुठे ठेवावा हे उमगलं नाही. कोणाला जास्त योग्य कॅटेगरी/ गट सुचल्या जरूर कळवावे. धन्यवाद!
***
अपूर्वाई, काव्य-स्वर-सुरांचा त्रिवेणी संगम!
नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच.
भारतीय संगीत मैफ़िलीत प्रमुख कलाकाराबरोबर साथीचे कलाकार असतात हे आपल्याला ठाऊक आहे. जसे गायकाबरोबर तानपुरा, संवादिनी, व्हायोलीन, तबला इ.इ. सादरकर्त्या कलाकारांच्या एकमेकांना पूरक अशा केलेल्या साथसंगतीमुळे मैफ़िलीतील रसिकांना अनेक अपूर्व, अविस्मरणीय असे क्षण लाभतात. भारतीय संगीतातली साथसंगत हा या लेखातला पहिला मुद्दा.
तानसेनाच्या काळातले भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत होते. इथे शब्द बापुडवाणे होत. संगीताच्या या दरबारात देखणे, रुबाबदार शब्द देखील गरीब बिचारे होऊन सेवकाच्या भूमिकेत जाऊन नतमस्तक होऊन जवळजवळ मूक होतात.
कितने दफे दिल ने कहा, दिल की सुनी कितने दफे!
वैसे तो तेरी ना में भी मैने ढूँढ ली अपनी खुशी,
तू जो गर हाँ कहे तो बात होगी और ही!
दिल ही रखने को कभी ऊपर ऊपर से सही,
कह देना हाँ... कहे देना हाँ... यूँ ही...
.
काय हळवी कल्पना आहे ही सुद्धा. की तुझा नकार पचवूनही मी जगात आनंद मिळवत राहीलो. आणि त्यात जर तू 'हो' म्हणालीस तर चार चांद लागतील माझ्या प्रेमाला. अगं इतकी देखील कठोर सत्यप्रियता दाखवु नकोस, कधी तरी खोटच बोल की माझं मन ठेवण्याकरता ...
.
स्वयंवर भरले सौंदर्याचे
विजा घेऊनी आले राजे
अंबर वाकून उतरले जिथे
चमचम नटव्या तारकांचे
कुणी पसरली भगवी वाळू
शुभ्र देखण्या वैराग्यावरती
हिर्या माणकांची श्रीमंती
लखलखली अलंकारांची
उमरावी आसमंती कंदील
उजळत गेले उत्तररात्री
त्या रेशमी मैफिलीमधले
सूर विहरले नदीच्या पात्री
त्या नदीतला फकीर कोणसा
एकतारीसवे बेभान गायला
त्यास नुरले भान कोठले
उमटले गाणे शब्दांबरीचे
एकतार्यासंगे नाचे फकिरी
स्वयंवर थबकले महालीचे
खुदकन हासले नटवे चांदवे
चांदणे बरसले अंतरीचे
चिनाब पार करायला तिने उडी टाकलीय कारण तो वाट बघतोय तिची, नेहमीप्रमाणे. कालमेघांनी दाटलेला अवकाश, नदी रोरावते आहे पण तिला चैन कुठली? आयुष्यभरासाठी साथ तर गमावलीच आहे, हे जे चार क्षण मिळतात प्रेमाचे, त्यावरच तर जगतेय ना ती.
ती हातातल्या घड्याला विनंती करते आहे “घेऊन चल मला.”
पण कच्चं मडकं करणार तरी काय? हा रौद्र प्रवाह त्याचं अस्तित्व विरघळवून टाकायला कितीसा वेळ लावणार आहे? स्वतःच्या जीवाची पर्वाच नाही त्याला. ज्याला स्वतःची खात्री उरली नाही, त्याचा काय भरवसा, हे तिला कुठं समजतंय?
मनोज मोहिते
व्हर्जन वन
जावेद अख्तरांची एक कविता आहे, ‘गली बॉय’ या सिनेमात. शीर्षक, ‘दूरी’. रणवीर सिंग याने ती गायली आहे. संथ... सावकाश. मनाला धीर देत. मनाला सांभाळत. ‘म्हणायला जवळ आहोत, पण किती दूर आहोत. किती ही घालमेल आहे. तुझ्याशी दु:खही वाटून घेऊ शकत नाही. माझ्या क्षमतेच्या परेच ते. वाहते अश्रू पुसण्याचेही बळ ते नाही. ‘मै भी यही हूं, तुम भी यही हो, पर सच ये है, मै हूं कही, तुम कही हो...’
कहने को हम पास है पर
कितनी दूरी है
ये भी कैसी मजबूरी है
म्हणायला जवळ आहोत, पण किती दूर आहोत. अशी कशी ही घालमेल...
गाण्यांत आलेल्या बोटॅनिकल उल्लेखांची यादी आपण पूर्वी केली.
मायबोलीकर ऋतुराज यांनी 'झाडंफुलं झाली, आता प्राणी/पक्षी/कीटक वगैरेही हवेत' असं सुचवलं. त्यावरून हा धागा काढत आहे, त्यामुळे या धाग्याचं श्रेय ऋतुराज यांचं. 
पडद्यावरचा अभिनेता / त्री आणि गायक - गायिका यांची भट्टी जमल्याची कैक उदाहरणे आहेत. मुकेश गेले तेव्हां राज कपूरने माझा आवाज गेला असं म्हटलं होतं. (मुकेश आणि राज कपूर यांची गायकी सुद्धा मिळती जुळती आहे). अनेक गाणी (विशेषत: मोहम्मद रफी) ऐकताना सुद्धा अभिनेता डोळ्यासमोर उभा राहतो. गायक त्या आभिनेत्याचा आवाज कॉपी करत नसत, तर त्याचं व्यक्तीमत्व जसं आहे त्याला अनुसरून आवाज देत.