पोएटचं हेड

Submitted by चौबेजी on 2 November, 2022 - 01:00

सिटीतल्या रोड्सवरून
पोएट भटकत जातो
तेव्हा टिपतो तो व्हेन्समधलं
कुठे वाहणारं कुठे गुठळलेलं ब्लड,
भिंतींमध्ये खोल एम्बेडलेला नॉईज,
सिमेंटच्या गॅप्समधून येणारा मल्टीलेयर्ड अरोमा,
स्कीनच्या पोअर्सना पाणी आणणारा सिटीचा फ्लेवर,
आणि पार्कापार्कांवर सेटल झालेली
अर्बनस्तानाची आफ्टरटेस्ट
पोएट टच करतो इतरांचे एक्स्पीरीयंसेस
आणि फील करतो स्वतःचे फीलिंग्ज

लोक त्याच्याकडे बोट दाखवून
व्हिस्पर करतात
'सगळंच अब्जाॅर्ब करतोय हा...
एखादे दिवशी हेड एक्स्प्लोड होईल.
हाऊ डेंजरस!'
जेव्हा मूल विचारतं मम्मीपप्पांना
'डेंजरस मीन्स फॉर हिमसेल्फ?'
तेव्हा लपत नाही
तिच्या प्रश्र्नातली होप
मम्मीपप्पा इग्नोर करतात क्वेश्चन
विथ अ टिंज ऑफ रिलीफ

पोएट आता पोएम्स रिसायकल करतो
जुने शब्द, जुन्या इमोशन्स
न्यू डान्स विथ ओल्ड मोशन्स
लोक एक्स्प्लोजन अंटीसिपेट करतात
'वेळ जवळ आलीये वाटतं...
एनी इन्स्टंट नाव!'
पोएट पुटपुटतो,
आवाजाचं चिन्ह काही बरं दिसत नाही...
आणि पोएटचं डोकं आकसायला लागतं
सिटीभर त्याने ट्विट केलेल्या सगळ्या पोएम्स
त्याच्याकडे परत यायला लागतात
विखुरलेल्या एलियन शिप्स
मदरशिपने कॉल केल्यावर
परत याव्यात तसे
त्याचा प्रेझेंस श्रिंक होत जातो
एका क्षणी पोएट इम्प्लोड होतो.

हे सगळं वाइड आईड विटनेस करणारे
व्हिस्पर करतात
स्ट्रेंजर थिंग्जपेक्षा स्ट्रेंजर
पोएटचं हेड फार डेंजर!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!