जानेवारी २०१५ मध्ये जेव्हा I-HRD या संस्थेने एक दिवसाचा रिक्रुटमेंट युजींग सोशल मिडीया असा एक दिवसाचा वर्कशॉप घेशील का म्हणुन मला विचारले तेव्हा या विषयाची खोली इतकी आहे मला ही माहित नव्हते. जस जसा वर्कशॉप चा दिवस जवळ येतोय तस तसे माहितीच्या जंजाळातुन काय घेऊ आणि काय नको घेऊ असे झाले आहे.
२००८ मध्ये मी जेव्हा एका कंपनीमध्ये एच आर मॅनेजर म्हणुन काम पाहु लागलो तेव्हा नुकतीच मंदीची लाट सुरु झाली. या लाटेत तोटा होऊ नये म्हणुन कंपन्यांनी रिक्रुटमेंट कन्सलटंट नकोत म्हणुन सांगीतले. यावर भर की काय म्हणुन नोकरी डॉट कॉम व मोनस्टर ह्या जॉब पोर्टलचे वार्षीक सबस्क्रिपशन सुध्दा गोठवले.
कुमार सप्तर्षींचा आणि माझा अनेक वर्षांचा परिचय आहे असे नाही. माझ्या आयुष्यात त्यांना मी दोन वेळा भेटलो. प्रसंग अत्यंत खाजगी. सुरवातीला जी त्यांच्या विषयीची जळमटे मनात होती ती या दोन भेटीत अगदी पुसली गेली. फार वेळा भेट झाली असती तर माझे परिवर्तन झाले असते इतके लोभस व्यक्तीमत्व डॉ कुमार सप्तर्षी आहेत यात शंका नाही.
कुमार सप्तर्षींना आणि त्याच बरोबर कै. मधु लिमये यांना जनता पक्ष फोडणारे समजले जाते. त्याकाळात या दोघांविषयी वर्तमान पेपरात वाचले होते. मी फक्त १५-१६ वर्षांचा होतो.
आजची म्हणजेच २१ एप्रील २०१५ ला आलेली अक्षय तृतीया साडेतीन मुहुर्तापैकी एक आहे. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा, दसरा आणि दिवाळी पाडवा हे तीन शुभ मुहुर्त मानले जातात. अक्षय तृतीया हा अर्धा मुहुर्त मानला जातो. अर्धा असल्याने याचे महत्व कमी होत नाही कारण अक्षय म्हणजे कधीही क्षय म्हणजे अंत न होणारे कार्य या मुहुर्तावर करायचे असते.
ज्योतिषविषयक लेखमाला काही काळ थांबली होती. १४ एप्रीलच्या निमीत्ताने पुन्हा सुरु होत आहे. १४ एप्रीलला कुणाचा वाढदिवस आहे? याच उत्तर महामानव बाबासाहेब आंबेडकर हे तर आहेच पण मायबोलीवर आणि मायबोलीच्या बाहेर असे अनेक लोक असतील ज्यांचा वाढदिवस १४ एप्रिल आहे.
काय विशेष आहे १४ एप्रील मध्ये ? हे जाणुन घ्यायला हा लेख वाचायला हवा.
ज्योतिषशास्त्रात ५ महत्वाचे राजयोग केवळ ५ महत्वांच्या ग्रहांचे विषीष्ठ राशीत विषीष्ठ अंशात असल्याने होतात. लग्न किंवा राशी कोणतीही असताना हे राजयोग फलदायी होताना दिसतात.
कोणते पाच ग्रह आणि कोणत्या राशी ज्यात ग्रह विषीष्ठ अंशावर असता राजयोग होतो ?
तो क्षणच मोठा खतरनाक होता. अस वाटल की मागुन येणारा ट्रकवाला बेभान झालाय. आपण उजवीकडे वळायचा इंडिकेटर दिलाय याच्याकडे त्याच लक्ष नाही. एखादाच क्षण बास झाला त्याला मला फुटबॉल सारख उडवायला. अॅक्टीवा सारखी दुचाकी मला कितीस संरक्षण देणार ? त्यात माझी मस्ती . मी हेलमेट घालत नाही. अगदी हायवे वर सुध्दा.
चमत्कार झाला शेवटच्या क्षणाला ट्रकवाल्याच्या लक्षात आले आणि त्याने शिताफीने मला चुकवले. त्या रस्त्यावर त्या क्षणाला आमची दोन वहाने होती म्हणुन त्याला दिशाबदलताना दुसर्या वहानाला ठोकर द्यावी लागली नाही. पुढच्या क्षणाला आम्ही आमच्या रस्त्याला लागलो होतो.
केजरीवाल २०११ मध्ये अण्णांचे सहकारी म्हणुन जनतेच्या समोर आले. प्रसिध्दीचे वलय चालुन आल्यावर भल्याभल्यांना त्यातुन बाहेर न पडण्याचा मोह होतो त्यातलाच एक प्रकार असावा.

केजरीवाल त्या वेळे पर्यंत तरी मै अन्ना हु म्हणुन वागत होते.
बराच काळ खल झाल्यानंतर त्यांनी जन आंदोलनाचा एक पक्ष असावा असा मत प्रवाह निर्माण केला तेव्हा टोपीवरची अक्षरे जाऊन टोपी फक्त राहीली.

कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.
हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.
पेट्रोल / डिझेल कॅन मधे मिळणार नाही अश्या आशयाच्या नोटीस पेट्रोल पंपावर लिहलेल्या असतात. जे उद्योजक असा व्यवसाय करतात जेथे पेट्रोल अथवा डिझेल वहाना व्यतिरिक्त अन्य कारणासाठी हवे असते.
उदा. जनरेटर चालवण्यासाठी डिझेल किंवा लॉड्री चालकांना हवे असलेले पेट्रोल.
पेट्रोल पंप मालक जा पोलीसांकडुन अश्या आशयाचे पत्र घेऊन या असे सांगतात.
खरे असे आवश्यक आहे का ?
कायदा नेमके काय सांगतो की हे सर्व डिस्क्रियेशन ऑफ पावर आहे ?
आज टी व्ही ९ या चॅनल वर एक सनसनाटी बातमी ऐकायला मिळाली. सोमाटणे फाटा देहुरोड - जुना मुंबई - पुणे रोड या ठिकाणी आकारला जाणारा टोल २००८ सालापासुन जे काम पुर्ण करुन आकारला जाणे आवश्यक होते ते काम पुर्ण न होताच आकारला जातोय.
निगडी चौक ते टोलनाका हा साधारण ६ किमी चा रस्ता चौपदरी होणे आवश्यक होते. हे काम पुर्ण न करताच आधीच्या सरकारने हा टोल आकारायला परवानगी दिली आहे अशी धक्कादायक माहिती याच भागात रहाणारे आर टी आय कार्यकर्ता श्री आगरवाल यांना या कायद्याच्या अंतर्गत मिळाली आहे.
यामागे स्थानिकांचा विरोध किंवा याच भागात असलेली डिफेन्स ऑफिसेस च्या परवानग्या ही कारणे असु शकतील.
गेले १० वर्षे राज्याचे गृहमंत्री आणि त्या आधी ग्रामविकास मंत्री म्हणुन आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आर आर उर्फ आबा पाटील यांची तब्येत चिंताजनक आहे.
टाइम्स ऑफ इंडिया च्या एक तासापुर्वीच्या न्युज प्रमाणे ते सध्या मुंबईला अॅडमिट असुन लाईफ सपोर्टवर आहेत.
त्यांच्या तब्येत सुधारावी यासाठी प्रार्थना.
MUMBAI: Former Maharashtra home minister and senior NCP leader RR Patil, who has been undergoing treatment for oral cancer, is in critical condition and on life support, a doctor attending on him said here on Monday.