कॅन मध्ये पेट्रोल /डिझेल मिळण्यासाठी

Submitted by नितीनचंद्र on 23 February, 2015 - 08:19

पेट्रोल / डिझेल कॅन मधे मिळणार नाही अश्या आशयाच्या नोटीस पेट्रोल पंपावर लिहलेल्या असतात. जे उद्योजक असा व्यवसाय करतात जेथे पेट्रोल अथवा डिझेल वहाना व्यतिरिक्त अन्य कारणासाठी हवे असते.

उदा. जनरेटर चालवण्यासाठी डिझेल किंवा लॉड्री चालकांना हवे असलेले पेट्रोल.

पेट्रोल पंप मालक जा पोलीसांकडुन अश्या आशयाचे पत्र घेऊन या असे सांगतात.

खरे असे आवश्यक आहे का ?

कायदा नेमके काय सांगतो की हे सर्व डिस्क्रियेशन ऑफ पावर आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितिन्चन्द्रजी,
योग्य प्रष्ण ,मला सुद्धा या प्रष्णाचे योग्य उत्तर हवे आहे.

चेतनजी,
पूर्वी केरोसिन खाजगीत मिळत असे,आता ते औषधाला सुद्धा मिळत नाही,घरी दोन गेस बाटले अस्ल्याने रेशन्वर सुद्धा मिळत नाही,त्यावर सुद्धा कायद्याने बंदी आणली आहे का?

अनिरुद्ध

कॅन मध्ये मिळत नसण्याचं कारण काय?
जनरेटर मध्ये घातलं किंवा वर म्हटलंय तसं लॉड्री चालकांनी पैसे देऊन वापरलं तर बिघडलं कुठे? का जे मिळतं ते सबसीडाइज्ड मिळतं म्हणून तो गैरवापर? मग त्यांना मिळवायला अधिकृत मार्ग काय?
आणि वाहनाच्या टाकीतून सायफन करून काढतीलच ना? मग कॅन मध्ये नेणं जास्त सुरक्षित तरी होईल. हा प्रश्न मला कायम पडतो.

<< पूर्वी केरोसिन खाजगीत मिळत असे,आता ते औषधाला सुद्धा मिळत नाही >>

निळं शिधापत्रिकेवर मिळतं, ते इतरत्र विकणं गुन्हा आहे. बिनरंगाचं बाहेर विकता येतं ते अनुदानित नाही पण बरंच महाग असल्याने त्याला मागणी नाही म्हणून कुठे विक्रीला ठेवत नाही.

ऐकिव माहिती नुसार :-

११९३ च्या मुंबई दंगली नंतर पेट्रोल, कॅन किंवा बाटलीत विकण्यावर बंदी आहे.

Most of the petrol pumps are equipped with cctv installations and the cctv footages are supervised / audited (don't know by whom). This was told by an attendant at a petrol pump.

गोव्यात मिळतं कॅन मध्ये पेट्रोल, पंपावर नाही पण बर्‍याच हॉटेल बाहेर टेबल लाउन विकताना पाहिलं आहे. तिथे दुचाकी रेंटवर मिळत असल्याने आणि पंप बर्‍यापैकी दुर असल्याने त्यांना गिर्‍हाइकं मिळतात. पंपापेक्षा १०-२० रुपये जास्त घेतात ते.