केजरीवाल -जनलोकपाल २०११ ते धुळवड २०१५

Submitted by नितीनचंद्र on 30 March, 2015 - 05:58

केजरीवाल २०११ मध्ये अण्णांचे सहकारी म्हणुन जनतेच्या समोर आले. प्रसिध्दीचे वलय चालुन आल्यावर भल्याभल्यांना त्यातुन बाहेर न पडण्याचा मोह होतो त्यातलाच एक प्रकार असावा.

Arvind 5.jpg

केजरीवाल त्या वेळे पर्यंत तरी मै अन्ना हु म्हणुन वागत होते.

बराच काळ खल झाल्यानंतर त्यांनी जन आंदोलनाचा एक पक्ष असावा असा मत प्रवाह निर्माण केला तेव्हा टोपीवरची अक्षरे जाऊन टोपी फक्त राहीली.

Arvind 3.jpg

२०११ मध्ये अनेक युपीए सरकारच्या मंत्र्यांनी तुमचा अधिकार काय ? तुम्ही निवडौन आलेले नाही हा मुद्दा महत्वाचा मानुन त्यांनी एका पक्षाची स्थापना केली. वातावरणच असे होते की अनेक बुध्दीवादी नेते त्यांच्या भजनी लागले आणि टोपीवर आम आदमी पार्टी आली.

Arvind1.jpg

मग दिल्लीत निसटती सत्ता आल्यावर आम आदमी पार्टी जाऊन संपुर्ण स्वराज्य आले. संपुर्ण स्वराज्य म्हणजेच निरंकुश सत्ता असे त्यांना म्हणायचे होते की काय कुणास ठाऊक ?

Arvind 2.jpg

तेही जाऊन मग विचार स्पष्ट झाला. आजादी म्हणजे हवा ति निर्णय सहकार्‍यांना न जुमानता. विरोध झालाच तर त्यांना लाथ मारुन बाह्रेर काढण्याची आजादी असा तो विचार असावा.

Arvind 4.jpg

लोकशाहीत एक वेगळा विचार, सामान्य माणसांचा पक्ष इ जाऊन केजरीवाल आता आम पक्षातले "खास" ( खोकणारे नाही - हिंदिमध्ये खासी म्हणजे खोकला म्हणतात. ) नेते बनले आहेत.

किरण बेदी, जनरल व्ही के सिंह, अ‍ॅडमिरल रामदास हे एकेकाळचे अधिकारी यांना नकोसे झाले आहेत.

मेधा पाटकर, अंजली दमानिया मयांक गांधी ह्या महाराष्ट्रातील मान्यवरांचा आता आम आदमीवर विश्वास राहिलेला नाही.

पुढे काय घडेल ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

( खोकणारे नाही - हिंदिमध्ये खासी म्हणजे खोकला म्हणतात. ) >>>> हा टोमणा आवडला नाही.

पहिला फोटो हा "मर्फिंग" केलेला आहे.>>> +१

पुढे काय घडेल ? >>
अरविंदला मी लहानपणापासून ओळखून आहे. तो लहान असताना मी त्याला खाऊ घेऊन द्यायचो. अंगाखांद्यावर खेळवायचो. लहानपणापासून त्याला धरणांची भारी आवड. मला म्हणाला अंकल अंकल भाक्रा नानगल लेके चलो ना. मग काय, घेऊन गेलो. नाही ऐकलं की भोकाड पसरायचा. तर म्हणाला की अंकल अंकल इस साईड का पानी उस साईड मे छोडो ना.. मी म्हटलं असे असं नाही करता येत. तर काय ऐकेच ना.. मग हळूच लपत छपत गेलो, एक गेट उघडलं आणि तसाच दबकत आलो. तर हा टाळ्या पिटत होता. म्हणाला अंकल अंकल मेरा हो गया, अब पानी फिरसे जहा था वहा वापस रखो. मी म्हटलं असं कसं करता येईल. तर म्हणाला की मी मोठ्याने रडेन. माझ्या छातीत धस्स झालं. म्हटलं सगळ्यांना कळलं तर. मग छोट्या अरविंदला म्हटलं की बाबा रे तुझ्यासाठी म्हणून मी कायदा मोडून पाणी सोडलं. तर याने भोकाड पसरलं... म्हणाला , आपने कानून तोडा है, बुरी बात है, आप हमेशा ऐसे करते हो... मग त्याला म्हटलं , अरे बाबा गप्प बसायचं काय घेशील, म्हणून त्याला लिमलेटच्या गोळ्या दिल्या तर हा पळत सुटला आणि बोंबलू लागला की अंकल मुझे रिश्वत दे रहे है .. मग मी घाबरून त्याच्या तोंडावर हात ठेवला हा गोंधळ ऐकून एक सुरक्षारक्षक आमच्याकडे आला, तर हा म्हणाला ये अंकल गंदे है, मुझे यहा पर भगाके लेके आये है, इनके इरादे ठीक नही है.. अरारारा... त्या दिवशी एव्हढा मार खाल्ला ना.. कसा बसा सुटलो आणि त्याल उचलून घेऊन जायला लागलो तर हा हाताला चावला आणि पळू लागला. मग पुन्हा पाठलाग करून पकडलं तर पुन्हा चावला.
तेव्हांच म्हटलं हे पोरगं मोठेपणी धरलं तर चावतंय ही म्हण खरी करून दाखवणार..

पहिला फोटो हा "मर्फिंग" केलेला आहे.>>> +१

अगदी बरोबर आहे. इंटरनेटवर मी अण्णा आहे अशी टोपी घातलेला केजरीवालांचा फोटो मिळाला नाही म्हणुन हे मी केले आहे.

इब्लीस,

कार्टुन चालते. ती अभिव्यक्ती असते. मी अण्णा आहे अश्या टोप्या त्यावेळेला होत्या.

एन डी टी व्ही वर - " सो सॉरी " नावाचे राजकीय कार्टुन गुन्हा असेल तर मी केलेले गुन्हा आहे असे फक्त माझ्या द्वेषापोटीच लिहले जाऊ शकते.

आपल्या विचारधारेशी सहमत असलेले लोक मायबोलीवरच थापाड्या, फेकु लिहतात त्यांचे काय कोण वाकडे करते?

गेली १० वर्ष आपल्या विचारधारेशी सहमत असलेले लोक मायबोलीवरच पप्पु मौनीबाबा इटालियन बाई टंच मुलगी लिहित होते त्यांचे काय वाकडे झाले ? नितिनभाउ ?

कबिर,

मात्र लिहितात त्यांच्याबद्दल काय विचार आहे सांगा जरा मी असल्या लिखाणावर कधीच आपले मत - स्मायली टाकलेली नाही.

वरच्या लिखाणात केजरीवाल यांचा कुठेही एकेरी उल्लेख नाही.

कबीर,

माझ्या वडीलांचे गुरु एक काँग्रेसचे सच्चे गांधीवादी कार्यकर्ते होते. माझे वडील त्यांचा शब्द कधी खाली पाडत नसत.

मी ज्या शहरात रहातो इथले अनेक काँग्रेस कार्यकर्ते माझे खास मित्र आहेत.

इतरांच काय मला माहित नाही पण काँग्रेसला मी शत्रु पक्ष मानत नाही.

भारतात दोनच राष्ट्रीय पक्ष असावेत. भ्रमनिरास झाला तर पर्याय असावा असे माझे मत आहे.

अतिरेकी व्यक्ती निष्ठा आणि अतिरेकी व्यक्ती द्वेष या टोकाच्या गोष्टी मी टाळतो.

माझी मत जाणुन घ्या वाक्प्रचार दुसर्‍या कुणासाठी तरी शिलकीत ठेवा.

नितीनचंद्र
खूपच चांगले आणि उच्च विचार आहेत तुमचे. पण इथे तुम्ही जसं हटकता तसं पप्पू, युवराज, मौनी बाबा, इटालियन बार डान्सर...........................................इ. इ. उल्लेखांबद्दल कधी कुणाला हटकले आहे काय ?

तिथे जसं तुम्ही स्मायल्या टाकत नाही म्हणता तसंच इथेही करा की.