पत्रीका समोर आली आणि जर पत्रीकेचे संपुर्ण आयुष्याचे कथन करायचे असेल तर पत्रीकेत राजयोग आहेत का आणि असतील तर ते किती आहेत व कसे व कुठल्या काळात फलदायी होतील याचे विवेचन करावे लागते.
राजयोग याचा अर्थ प्रत्येक वेळेला एखादी व्यक्ती राजासारखे आयुष्य घालवेल असे नाही. पण पत्रीकेत असलेला अधिकार योग नक्कीच महत्वाचा. या व्यक्तीची पत्रीका पाहिली असताना उत्तरोत्तर प्रगती असे एका वाक्यात वर्णन केले तर गैर ठरणार नाही.
उत्तम निर्णयक्षमता, सहजपणे यशस्वी होणे याच बरोबर चिकाटी आणि ध्येयासक्ती हे गुण या पत्रीकेत येतातच.
राजयोग दोन प्रकाराने पाहिले जातात.
आज लागलेल्या निकालाने राजकारणात अनेक अन्वयार्थ नव्याने दिसत आहेत. निकालाने नविन उच्चांक निर्माण झाले आहेत हा भाग आणखी वेगळा आणि आश्चर्यकारक आहेत.
१) आम आदमी पार्टी ५५ % मते आणि ९६ % जागा मिळवुन सत्तेवर येत आहे. आजकाल हे % प्रथमच पहाण्यात येत आहे.अश्याप्रकारे प्रथमच जागा आणि % या दोन्ही स्तरावर आम आदमी पार्टी विजयी झाली आहे.
२) ३३% मते मिळवुन भाजपला फक्त ४ टक्के जागा मिळवौन भाजप दिल्लीत हारला आहे.
३) दिल्लीला प्रथमच नविन पक्षाला एक वर्षाच्या अंतराने जनतेने पुन्हा कौल मिळाला आहे.
४) तिसरा पक्ष आणि अपक्ष या निवडणुकीत जनतेने संपुर्णपणे नाकारले आहेत.
माझ्याही खात्यातुन या कंपनीने रुपये १०० /- काढुन घेतले आहेत. इंटरनेट्वर अश्या अनेक तक्रारी सापडल्या आहेत ज्या खाली कॉपी /पेस्ट केलेल्या आहेत.
आपल्यालाही असाच अनुभव आलाय का ? नसेल तर खास करुन आपले अकाउंट चेक करा. तसेच असा अनुभव आलेला असेल तर कोणत्या बँकेच्या संदर्भात आलेला आहे ?
आपण हा व्यवहार रद्द करुन आपले पैसे परत मिळवु शकलात का ? असाल तर कोणत्या मार्गाने ?
१००/- रुपये महत्वाचे नाहीत. अश्या कंपन्यांना चाप बसायला हवा.
सल्ला आपला अनुभव असेल तरच द्यावा ही विनंती.
CCA AVENUES INDIA LTD.
India,
Orissa
Consumer complaints and reviews about CCA AVENUES INDIA LTD.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तु भारताने विकत घेण्याचे ठरवुन एक चांगला निर्णय घेतला आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जागतीक शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेला गेलेले असताना या संबंधीच्या काही तांत्रीक गोष्टी मार्गी लागल्या आणि केंद्र सरकारच्या वतीने लेटर ऑफ इंटेंड देऊन सरकारने ही वास्तु खरेदी करण्याचा निर्णय मार्गी लागला.
एखादे जोडपे लग्न करुन एका बालकाला जन्म घालते. स्त्रीच्या बाळंतवेदना संपतानाच आणि पुरुषाची संसारात आणखी एक जबाबदारी याची जाणिव होतानाच एक जबाबदारी येऊन पडते ती म्हणजे मुलासाठी शाळेचा शोध. लहान मुलाची वयाची दोन अडिच वर्षे संपतात न संपताच तोच कोणत्या प्ले ग्रुपला मुलाला पाठवावे म्हणजे ज्यु. केजीत सहज दाखला मिळुन किमान दहावी पर्यंतची अॅडमिशन ही समस्या संपेल अश्या विचारात पालक असतात.
राष्ट्रपती भवनामधुन जाहिर झालेल्या पत्रकानुसार आज अटलबिहारी वाजपेयी आणि पं. मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ डिसेंबर ला वाजपेयीयांचा ९० वा तर पं मदनमोहन मालवीय यांचा १५३ वा वाढदिवसाचे औचित्य साधुन हा निर्णय झाला.
अटलबिहारी राजनेते असुनही कवी आहेत हे जसे वेगळेपण तसेच पं मदनमोहन मालवीय राजनेते, शिक्षक आणि काही काळ वकिल म्हणुनही कार्यरत होते. पं मदनमोहन मालवीय यांनी सर्वात मोठी निवासी बनारस हिंदु युनीव्हर्सीटी ची स्थापना देशभरातुन देणग्या जमाकरुन निर्माण केली.
गुरुवार दिनांक १८ डिसेंबर २०१४. सकाळी ११.०० वाजता मुलाखतीला बोलावल होत. मुलाखत सुरु झाली. मुलाखत दुसरी होती त्यामुळे माझा अनुभव पडताळणे हा भाग नव्हता. मी हा जॉब करायला अनुकुल आहे का नाही याचा अंदाज मुलाखतकारिण घेत होती. माझे शब्द आणि बॉडी लॅग्वेज याचा मेळ घालत होती. आज मी स्वतंत्र व्यावसायीक सल्लागार आहे तर मला नव्याने टा़कलेली टर्म एमप्लॉयमेंट ही टर्म पसंत पडेल हे जाणणे मुलाखतीचा मुख्य विषय होता. लगेचच उत्तर देणे शक्य नव्हते म्हणुन मी चेहेरा हसरा ठेवत टाईम बाय केला आणि कळवतो असे सांगीतले.
काही लोक स्वत: गायक/वादक व अर्थातच संगीत प्रेमी असतात. काही गायक/वादक नसतात पण तांत्रीक अंगाने संगीताचा आस्वाद घेण्यात त्यांना आनंद मिळतो. मला जाता जात सहज म्हणुन कानावर पडेल ते फ़ारस शास्त्रीय / उपशास्त्रीय किंवा सुगम असे भेद न करता जे कानाला आवडेल ते ऐकण्याचा हेतु ठेऊन ऐकणे आवडते.
डेंग्युची साथ पसरली आणि रोग निवारणाचे स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागाचे नविनच तंत्र उदयास आले की काय असे वाटले.
डेंग्युचे डास म्हणे शुध्द पाण्यात वाढतात. त्यामुळे त्याचा प्रसार हा घरातुनच होतो या अर्ध सत्यावर हे तंत्र आधारीत आहे असे दिसते. याचा अर्थ शुध्द पाणी फक्त घरातच साठवले जाते असे ग्रुहीतक मांडुन त्यावर केंद्रित सर्व उपायोजना दिसतात.
शासनाने असे सामान्य जनतेला सांगीतले की आता आम्ही तुमच्या घरात येऊन पाण्याची तपासणी करणार आहोत. जर घरच्या पाण्यात या डासाच्या अळ्या सापडल्या तर पाच हजार रुपये दंड करण्यात येईल.
१४ नोव्हेंबर २०१४ रात्रीचे ८ वाजले आहेत. समोर मराठी टी व्ही ९ चॅनल सुरु आहे. मी पहात आहे सोलापुरच्या साक्षी मोरे हिची तिच्या वडीलासमवेत आणि मानसओपचार तज्ञ डॉ राजेद्र बर्वे यांच्या समोर टेस्ट चालु आहे.
साक्षी मोरे दोन्ही डोळे बांधुन पुस्तक वाचु शकते. रंग ओळखु शकते. ५२ पत्यातला एक समोरचा पत्ता अचुक ओळखु शकते.
टि व्ही ९ या चॅनलच्या टेस्ट हिने पार केल्या.
ही शक्ती जन्मजात नव्हती. तिच्या वडीलांनी १२ हजार फी देऊन काही महिन्यांपुर्वी मीड ब्रेन अॅक्टीव्हेशन नावाचा कोर्स केल्यानंतर ही कला अवगत झाली आहे.
अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.