सोमाटणे फाट्याच्या टोलवर आपण टोल भरता का?

Submitted by नितीनचंद्र on 23 February, 2015 - 00:28

आज टी व्ही ९ या चॅनल वर एक सनसनाटी बातमी ऐकायला मिळाली. सोमाटणे फाटा देहुरोड - जुना मुंबई - पुणे रोड या ठिकाणी आकारला जाणारा टोल २००८ सालापासुन जे काम पुर्ण करुन आकारला जाणे आवश्यक होते ते काम पुर्ण न होताच आकारला जातोय.

निगडी चौक ते टोलनाका हा साधारण ६ किमी चा रस्ता चौपदरी होणे आवश्यक होते. हे काम पुर्ण न करताच आधीच्या सरकारने हा टोल आकारायला परवानगी दिली आहे अशी धक्कादायक माहिती याच भागात रहाणारे आर टी आय कार्यकर्ता श्री आगरवाल यांना या कायद्याच्या अंतर्गत मिळाली आहे.

यामागे स्थानिकांचा विरोध किंवा याच भागात असलेली डिफेन्स ऑफिसेस च्या परवानग्या ही कारणे असु शकतील.

ही माहिती मिळवण्यासाठी त्यांना खुप झगडावे लागले व शेवटी ही माहिती मिळाली.

सध्याचे टोल धोरण हे कंत्राटदार धार्जीणे आहे यावर चर्चा करण्यात काही नवे नाही.

जर काम अपुर्ण आहे तर टोल आकारणीचा कालावधी किंवा टोल च्या रकमेत काही सुट नागरिकांना मिळाली आहे का हा प्रश्न निर्माण होतो. यावर जनहितार्थ याचिका दाखल होणे गरजेचे आहे.

महत्वाचे म्हणजे सध्याच्या शासनाने टोल मुक्त महाराष्ट्राचे आश्वासान देऊन निवडणुका जिंकल्या आहेत. सत्तेवर आल्यावर यावर आम्ही धोरण तयार करु असे मा. मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यात चार वर्षे गेल्यास काही उपयोग नाही याची ही आठवण मा. मुख्यमंत्री आणि केंद्रिय मंत्री मा नितीन गडकरी यांना वारंवार देणे गरजेचे आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी भाजपचा चाहता आहे आणि भाजपवर विनाकारण टीका करणार्‍यांचा विरोधक.

ही चुक आधीच्या सरकारची आहे हे आधीच नमुद केले आहे. भाजपने आपली आश्वासने पाळावीत यासाठी आग्रही आहे.

ही चुक आधीच्या सरकारची आहे हे आधीच नमुद केले आहे. भाजपने आपली आश्वासने पाळावीत यासाठी आग्रही आहे.>>+१२३४५६७८

आधीच्या डॉ़टर्ने चुकीची गोळी दिलि तीच मीही चालु ठेवली हे उत्तर योग्य आहे का ?

आधीचे सर्कार मेले.

आता तुम्ही दुरुस्त करा.

हे लिहीण्यामागे जनजाग्रुती आहे. ती सध्याच्या सरकारच्या बाबत आग्रही रहाण्यासाठी सुध्दा आहेच.

कोणी आहे का मायबोलीवर जो जनहितार्थ याचिका दाखल करेल? ज्याला स्वतःला या मार्गाने कधीतरी / नेहमी प्रवास करावा लागतो तसेच जनहितार्थ याचिका चालवण्याचे ज्ञान असलेला.

मायबोलीकरांचे म्हणणे आपण सरकारच्या कानावर लेखी घालु शकतो. हा धागा वहायचा संपला की माझ्या खर्चाने याची प्रिंट काढुन मा. मुख्यमंत्री आणि केंद्रिय मंत्री यांच्या ऑफिसवर पाठवेन.

आपले अनुमोदन आवश्यक आहे.

टोलच्या निमित्ताने एक लूटारु जमात उदयास आली त्यात नेत्यापासून रस्ते बांधणारे आहेतच. सामन्य जनतेचे लचके तोडत तोडत हा प्रकार वाढीस गेला कारण त्यातला काळा पैसा फार मोठ्या प्रमाणावर आहे. सरकार काँग्रेस असो किंवा भाजपचे दोन्ही .......... आणि लूटणारेच आहे याची खात्री पटते.

रस्ते बांधायल पैसे नाही म्हणायचे आणि बीओटी (बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा ) याचे टेंडर काढायचे , यातले बांधणे आणि वापरणे होते मात्र हस्तांतरीत करायच्या वेळी प्रत्येक वेळी मुदत वाढविली जाते कारण ..... जनतेचा पैसा सहज खाता येतोय मग कशाला सोडायचा.. टोलनाक्यावर होणा-या तोडफोडीचे मी समर्थनच करेल , पण फक्त तिथे तोडफोड न करता टेंडर वाढवून देणारे अधिकारी आणि नेते यांचेही थोबाड फोडायला हवे.
भाजप सरकार टोल बिल बंद करणार नाही, आधीच अनेक वर्षे उपाशी असल्याने तेही पहिले खिसे भरुन घेतील आणि मग नावाला एखादा दूसरा टोल बंद करुन स्वतःचा उदो उदो करुन घेईल.

एम एच १२ आहे.. मी तळेगावला जाताना रीटर्न ४५ रु. टोल भरतो.
"दाबात" म्हणजे कसे जायचे असते? मनसेचा झेंडा/स्टिकर घेउन गाडीवर लावायचा विचार करत आहे.. त्याने फायदा होइल का?? Happy

mansmi18

आधीच्या पावत्या जपुन ठेवल्यात का ? जास्त भरला असेल तर तो परत कसा मिळवायचा याचा विचार जास्त जरुरी आहे.

किरणकुमार,

आधीच अनेक वर्षे उपाशी असल्याने तेही पहिले खिसे भरुन घेतील आणि मग नावाला एखादा दूसरा टोल बंद करुन स्वतःचा उदो उदो करुन घेईल.

हेच होऊ नये म्हणुन जनमताचा रेटा आवश्यक आहे. अण्णा उपोषणाला बसणार म्हणल्यावर जमिन अधिग्रहणाच्या अध्यादेशात आवश्यक बदलाचे वारे कसे वाहु लागले ?

दर वेळेला अण्णा नकोत आता आपणच अण्णा होऊयात.

मनसेचा झेंडा/स्टिकर घेउन गाडीवर लावायचा विचार करत आहे.. त्याने फायदा होइल का??>>.
एवढ्च पुरेसं नाही..
आमदाराचा फोटो, नाव, पक्षाचा झेंडा लावा...आणि गाडी बी तसली भारी पाहिजे, स्कूटी, नॅनो, ८००, अशा अतिसामान्य वाहनांऐवजी, बुलेट (किंवा थंडरबर्ड),झायलो,स्कॉर्पियो बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, त्यावर पितळेची नक्षी केलेली आणि नंबर प्लेटवर नंबर सोडुन बाकी सगळं काही उदा. महाराजांच रेडियम चित्र, किंवा आमदाराचा फोटो, "राजे" "वाघच" असली काहितरी लिहिलेलं..
मग तुम्हाला अखिल म्हाराष्ट्रात कोण्बी टोल भरायला लाउ शकत नाही..
(वरिल वर्णनात बसणारी वाहने पाहिली नसतिल तर एकेवेळ पिंपरी चिंचवडला आवश्य भेट द्या...)

दर वेळेला अण्णा नकोत आता आपणच अण्णा होऊयात.+१०००

नक्कीच विरोध व्हायलाच हवा, पण टोल न भरणे हा एकमेव मार्ग असू नये याचे कारण आपण फार हुज्जत घातली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही कारण टोल वसूल करण्यासाठी गूंड ठेवलेले असतात (सर्रास सर्व नाक्यावर)

आपण स्वतःच माहिती अधिकर कायद्याच्या मदतीने अजून माहिती मिळवू शकतो. भूगाव टोलनाक्याला ग्रामस्थांचा कडाडून विरोध झाला , तोडफोडही झाली आणि मग तो बंद झाला , एक्स्प्रेस वेचे घसघशीत उत्पन्न असताना जूना पुणे मुंबई रस्त्यावर टोल आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता , रस्ते दूरुस्त केले म्हणून सरकारने जनतेवर उपकार केले अशा अविर्भावात जगणा-या मंडळींना धडा शिकविलाच पाहिजे.

मग तुम्हाला अखिल म्हाराष्ट्रात कोण्बी टोल भरायला लाउ शकत नाही..
>>>>> हो का ?? खेड शिवापुरचा टोल नाका ओलांडुन दाखवा एकदा टोल न भरता !
तसचं, कराडच्या पुढे १ टोलनाका आहे तोही...

कारण टोल वसूल करण्यासाठी गूंड ठेवलेले असतात>>>>> हे मात्र खरं आहे, याचा अनुभव गेल्याच महिन्यात आला. आम्ही अष्टविनायक दर्शन सहल आयोजित केली होती. सर्वजण आपआपल्या कुटुंब कबिल्यासह असे एकुण ४५ जण ज्यात स्त्रियांचा एक ग्रुप होता.

सहलीचा पहिला दिवस, सुरवातीच्या दोन गणपतींचे दर्शन झाले तिथुन आळंदीला मुक्काम करण्याचे ठिकाण होते त्याठिकाणी गेलो आणि आचारी व जेवणाचे सामान वगैरे उतरविल्यानंतर पुढील रांजणगावच्या महागणपतीच्या दर्शनासाठी निघालो. शिक्रापुर टोल नाक्याजवळ गाडयांची ही भली मोठी रांग लागलेली. अर्धा तास झाला तरी पुढच्या गाड्या एक इंचसुध्दा हलल्या नाहीत. रात्रीचे साडे आठ वाजत आलेले उशीर होत होता म्हणुन आम्ही खाली उतरून काय झाले ते बघायला पुढे गेलो. तर एक स्कॉर्पियोवाला टोल देत नव्हता त्यांतील प्रवाशांची आणि टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांची बाचाबाची चालू होती. आम्ही त्यांना सांगितले की जर तो टोल देत नसेल तर त्याची गाडी बाजुला घ्या आणि इतरांकडून टोल घेऊन त्यांना जाऊ द्या, तर दोघे-तिघे एकदम अंगावर धाऊन आले आणि तुम्ही आम्हांला शिकवु नका जा आपल्या गाडीत जाऊन बसा असा दम द्यायला लागले. आमच्या गाडीतील दोन स्त्रियासुध्दा आमच्या बरोबर होत्या त्यांनी त्यांना भाषा नीट वापरायची समज दिली तर एकजण त्यांच्या अंगावर धाऊन गेला. मग काय तुफान हाणामारी झाली, आपल्यावर हे भारी पडताहेत हे पाहिल्यावर त्यांनी ज्या बसमध्ये बायका आणि लहान मुले होती त्यावर दगडफेक सुरू केली. तेवढ्यात पोलिसांची गाडी आली, त्याबरोबर ते पळून गेले. आम्ही नंतर रितसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.
दगडफेकीत जरी कोणाला लागले नसले तरी गाडीची मागची काच फुटली. बायका आणि लहान मुले तर भीतीने थरथरत होती. गणपतीचे दर्शन झाल्यावर सर्व बायका आणि लहान मुले आता परत त्याच टोलनाक्यावरून जायचे म्हणुन घाबरली होती. आमच्या गाडीच्या चालकाने त्यांना समजावले की आता त्या रस्त्याने न जाता दुसर्‍या रस्त्याने गाडी घेऊन जाऊ, तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला. बायका आणि लहान मुले ज्या बसमध्ये आहेत त्यावर दगडफेक करणारे असे गावगुंड बहुतेक टोलनाक्यावर असतात.

यावर जनहितार्थ याचिका दाखल होणे गरजेचे आहे.

>>

हो हो, कधी करताय? त्याला कशाला ज्ञान पाहिजे . वकील गाठायचा त्याला फी द्यायची की झाली ज.हि. याचिका तयार. कराच राव तुम्ही.

यावर जनहितार्थ याचिका दाखल होणे गरजेचे आहे.

>>

हो हो, कधी करताय? त्याला कशाला ज्ञान पाहिजे . वकील गाठायचा त्याला फी द्यायची की झाली ज.हि. याचिका तयार. कराच राव तुम्ही.
>>एव्हढ पण सोप्प नाहिये ते.. आजकाल RTI कार्यकर्त्यांचे 'RIP' कार्यकर्ते व्हायला लागलेत. Sad
दाभोळकर, पानसरे, आणि बरेच आर्टीआय कर्यकर्ते.. कोठे चाललाय महाराष्ट्र माझा Uhoh

नरेश माने शॉकिंग आहे, एवढे हे लोक सोकावलेत, म्हणजे स्थानिक गुंडाना हाताशी धरून थोडासा पैसा त्यांच्याही घशात कोंबून सरळसरळ लुटालूटच आहे. पोलिस तक्रारीचे काही झाले नसेलच!

मघाच्या पोस्टीत लिहिणार होतो पण वेगळं वळण लागेल म्हणुन लिहिल नाही. पण नरेश मानेंनी विषय काढलाच आहे तर मी मागे वाचलेलं खेड शिवापुर टोलनाक्यावर तर एका आमदाराला मारहाण झाली होती

याबाबतीतला एक किस्सा लैच भारी आहे नगर कल्याण रस्त्यावर नगर शहराच्या बाहेर रेल्वे लाईनवर ओव्हर ब्रिज बांधला व त्याचा टोल सुरू झाला. ओव्हर ब्रिज फार मोठा नसल्याने कंत्राटाप्रमाणे दोन चार वर्षात त्याचे पैसे फिटले आणि कम्पनी ने टोल बन्द केला आणि त्यांचा स्टाफही निघून गेला. मात्र त्या टोलचा केबीन वगैरे नेपथ्य तसेच होते. त्यावर स्थानिक गुंड पुढार्‍याने त्याची गुंड पोरे बसवून टोल वसुलीला सुरुवात केली टोलही फार नव्हता म्हनजे १०-१५ रुपये. त्यामुळे तसे कुणी कटकट करीत नसे. ज्याना हा टोल बन्द झाल्याचे माहीत होते ते स्थानिक दम देत कशाचे रे पैसे. मग अशा लोकाना जाऊ दिले जायचे. मात्र कल्यान , बीड अशी लाम्बून येणारी वाहने त्याना हे माहीत नसे ते निमूटपणे टोल देत. स्थानिकाना टोल द्यावा लागत नसल्याने त्याची काही बोम्ब झाली नाही. शेवटी अण्णा हजारेंच्या आंदोलनात त्याचीही चौकशी झाली आणि हा टोलनाकाच अनधिकृत असल्याचे लक्षात आले आणि शेवटी तो बंद झाला Happy

टोल नाके एटिएम आहे नेते मंडळींची.

कोणाला आवडत नाही एटिएममधुन कॅश आलेली?

इथे पोस्टी टाकणा-या एखाद्याला जर त्याच्या बँकेत शिल्लक नसतानाही एटिएममधुन कॅश आली तर तो जाईल का बॅकेत ती कॅश परत करायला? १०००० मधले ९९९९ जण जाणार नाही, एखादाच जाईल. मग बॅकेत शिल्लक ठेवायचे बंधन नसलेली एटिएम बंद करायचे मनावर घेतील का नेते मंडळी? यथा प्रजा तथा राजा, कारण इथे सगळे राजे हे कधीकाळी प्रजाच होते.

डोंबिवली MIDC टोल ची मुदत केव्हाच संपली आहे. पण मनसे चे लोक ते चालवत आहेत. जाऊ द्या हो . त्यांना बाकी काय आहे खायला ?

मी मागच्या महिन्यात ऑलमोस्ट ४५०० हजार किमी रोड् वे प्रवास केला. सगळ्या टोल च्या पावत्या जपून ठेवल्या होत्या.

टोटल टोल १९५०/- लागला Uhoh
सगळ्यात जास्त टोल मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर लागतो. ८४ किमी च्या रस्त्याकरता १९५/- सिंगल
एन्ट्री. एक्स्प्रेस वे च्या क्वालिटीबद्दल + डायवर लोकांबद्द्ल तर बोलायलाच नको.
त्यापेक्षा गोल्डन क्वाड्रँगल (दहिसर - सुरत; अमरावती - नागपूर) मधले रस्ते कैक पटीनी चांगले आहेत.

त्यानंतर वैताग टोल नाके म्हणजे मुंबईतले. ऐरोली + मुलुंड.
असोच... Sad

सगळ्यात जास्त टोल मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर लागतो. ८४ किमी च्या रस्त्याकरता १९५/- सिंगल
एन्ट्री. एक्स्प्रेस वे च्या क्वालिटीबद्दल + डायवर लोकांबद्द्ल तर बोलायलाच नको.
<<
खारघरचे ३० रुपये अ‍ॅड करा त्यात.

Pages