आर आर उर्फ आबा पाटील यांचे निधन

Submitted by नितीनचंद्र on 16 February, 2015 - 07:07

गेले १० वर्षे राज्याचे गृहमंत्री आणि त्या आधी ग्रामविकास मंत्री म्हणुन आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आर आर उर्फ आबा पाटील यांची तब्येत चिंताजनक आहे.

टाइम्स ऑफ इंडिया च्या एक तासापुर्वीच्या न्युज प्रमाणे ते सध्या मुंबईला अ‍ॅडमिट असुन लाईफ सपोर्टवर आहेत.

त्यांच्या तब्येत सुधारावी यासाठी प्रार्थना.

MUMBAI: Former Maharashtra home minister and senior NCP leader RR Patil, who has been undergoing treatment for oral cancer, is in critical condition and on life support, a doctor attending on him said here on Monday.

Dr Sanjay Ugemoghe, who is monitoring his treatment in Lilavati Hospital, told reporters that 57-year-old Patil is responding to treatment.

"We are trying our level best to bring him out of it. He is responding to the treatment," he said.

Party leaders Ajit Pawar, Supriya Sule, Sunil Tatkare, Chhagan Bhujbal were among the visitors to the hospital to inquire about Patil's health.

Patil, the prominent NCP leader from Sangli in western Maharashtra, was operated last December at Breach Candy Hospital and undergoing treatment at Lilavati Hospital.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्चा होत होती पण शासकीय दुजोरा इंटरनेटवर नव्हता म्हणुन उपलब्ध् बातमीवर लिहले.

आबांना श्रध्दांजली.

डान्स बार बंदी हा आबांच्या कार्यकारी कारकीर्दीच्या सुरुवातीचा एक महत्वाचा टप्पा! ह्या निर्णयामुळे जेथे हजारो बारबाला अचानक बेकार झाल्या, तेथेच लाखो कुटुंबांची होरपळही थांबली. दुर्दैवाने अनेक राजकीय व स्तुत्य निर्णय हे वादग्रस्त ठरतात त्याप्रमाणे हाही निर्णय वादाच्या कचाट्यात सापडला होता. पण पैशांसाठी होणारे खून, घरादारांची राखरांगोळी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काळ्या पैश्यांचे सुलभ हस्तांतरण ह्या सर्व बाबी बारबालांच्या पुनर्वसनापेक्षा अधिक प्राधान्याच्या आहेत हे समाजाने व विविध संस्थांनी शेवटी मान्य केले.

आबा पाटील अमर रहे!

Sad

आबांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा घरची गरीबी होती. गरिबी किती टोकाची होती ती आबांना जवळून अनुभवायला मिळालं...

एकदा आबांचा शर्ट खूप फाटला होता, एकच होता. आबा सकाळी सुईदोरा घेऊन आईकडे गेले व म्हणाले, ''हा कसातरी शिवून दे.''
वैतागलेली आई म्हटली, ''आता कुठं शिवायचं..?''
...म्हटलं घालायचं काय? सहज वर नजर गेली. वडिलांच्या मुत्युनंतर त्यांचे जुने झालेले कपडे एका गाठोड्यात बांधून वर ठेवलेले होते. आईची नजर चुकवून ते सगळे जुने कपडे काढले. वडील जे मृत झाले होते, आणि मृत व्यक्तीचे कपडे वापरत नाहीत. पण, वडिलांचे जुने कपडे घेऊन मी टेलरकडे गेलो. कपडे शिवतानां टेलरने ओळखले की, हे माझ्या वडिलांचे कपडे आहेत... त्रयस्थ, लिंगायत समाजाचा टेलर; पण माझ्या अंगावरचा शर्ट आणि वडिलांचे कपडे बघून त्यांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलं...
त्यावेळी अल्टर करुन, ती कापडं घालून मी घरात गेलो... त्यावेळी वडिलांच्या मृत्युनंतरसुध्दा न रडलेली माझी आई त्या दिवशी मला छातीशी धरुन इतकी रडली.. नि मीही भरभरुन रडलो. आयुष्यातील तो दिवस सगळ्यात वाईट दिवस होता. पण, तशाही परिस्थितीत आम्ही शिकलं पाहीजे, ही तिची जिद्द कायमची होती... मी रोजगार हमी योजनेवर शिकत राहिलो... अन आज महाराष्ट्र राज्याचा ग्रहमंञी म्हणून तुमच्या समोर खंबीरपणे उभा आहे...

''कोशिश करनेवालों की कभी हार नही होती''...

'मी कसा घडलो'
(या आर. आर. पाटील यांच्या जीवनचरित्रातून संपादित, साभार)

गरीबीतुन घडलेले कर्तुत्ववान व्यक्तीमत्व नेहमीच पूजनीय. आबांना श्रद्धांजली...

आर. आर. आबांना श्रद्धांजली ! Sad
असा कार्यकर्ता आणि नेता दुर्मिळच.

मुंढेंच्या प्रमाणेच महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंतच्या प्रश्नांची उत्तम जाण असणारे, खुप चांगला लोकसंपर्क असणारे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अती महत्वाच्या पदांवर राहून देखील मायेत न अडकलेले असे एक चांगले व्यक्तिमत्व होते आबा.

बाळासाहेब, महाजन, विलासराव, मुंढे आणि आबा असे महत्वाचे लोक एका मागोमाग एक अस्ताला गेले.
तसे तर नवीन कार्यकर्ते, नेते हे येतच असतात, काळ थांबत नसतो. पण तरी या लोकांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती सहजी भरून येणे नाही.

आबांना श्रद्धांजली. Sad

डान्सबार बंद करणे, पोलिस दलाविषयी माणुसकीने विचार करणे, तन्टामुक्ती गाव योजना ह्या सर्व कारणांसाठी आवडलेले नेता.

आठवण साधारण २००५ सालची आहे. आर आर आबा त्यावेळी मंत्री होते ते सांगलीहून आपला सरकारी ताफा घेऊन मुंबईकडे निघाले होते. गाड्या शेंद्र्यावरून जाताना आबांना बस stop वर एक वृद्ध ग्रहस्थ दिसले आबांनी गाड्या थांबवायला सांगितल्या खाली उतरले आणि चालत बस स्तोप कडे निघाले. सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली त्यांना आबा अचानक गाडीतून उतरून कुठे नेघाले? आबा बस स्तोप वर उभ्या असलेल्या वृद्धाकडे गेले आणि त्या वृद्धाचे पाय धरून त्यांना वंदन केले. त्या वृद्धाना कळेना कि हा एवढा मोठा माणूस त्यात मंत्री आपले पाय का धरतो आहे? आबा म्हणाले सर ओळखलेत का? मी सातवीत तुमचा विध्यार्थी होतो. मी तुम्हाला लगेच ओळखले. तिथून आबांनी त्यांना आपल्या बरोबर गाडीत घेतले. त्यांना सातारला त्यांच्या घरी घेऊन आले. चहा घेतला पुन्हा पाया पडले आणि बाहेर पडले. साधेपणा आणि संस्कार असे रक्तात असावे लागतात. हे वैभव देवदत्त असते. ते मागून मिळत नाही देतो म्हणून संपत नाही.

- फेसबुकवरुन साभार.