नातीगोती

लहान मुलांचे वजन

Submitted by मी अमि on 26 June, 2015 - 06:16

माझ्या मुलाचे वय पावणे दोन वर्षे आहे आणि वजन ९.८ किलो आहे. इतके दिवस डॉक ना विचारले तेव्हा ते त्याचे वजन ठिक आहे वगैरे म्हणायचे. दुसर्‍या डॉक ना दाखवले तेही तसेच म्हणाले होते. यावेळच्या व्हीजीट मध्ये मी डॉक ना परत सांगितले की त्याचे वजन बरेच दिवसांपासून स्थिर आहे. तेव्हा ते म्हणाले की त्याचे वजन १ वर्षे ते २ वर्ष या काळात १.५ किलो वाढायला हवे होते. सध्या ते फक्त ६०० ग्रॅम वाढलय.

त्याचा आहार असा आहे: - सकाळि ७.३० ते ८ - नाचणी सत्व (दुध घालून)
सकाळी ११ ते १२ - पोळी भाजी, भात, अंड्याची बुर्जी/ ऑम्लेट, वरण/ ताक
दुपारी ३ ते ४ - रव्याची खीर/ गव्हाच्या पीठाची खीर/ फळांचा मिल्क शेक

तडका - हे सत्य आहे

Submitted by vishal maske on 16 June, 2015 - 11:53

हे सत्य आहे

ज्यांनी पराक्रम केले
ते मागे राहिले जातात
अन् पराक्रम शुन्यांचेही
कधी वारे वाहिले जातात

पात्रतेच्या नियमांनाही
कुठे तडा दिला जातो
अन् कधी निकृष्ठांचाही
इथे गौरव केला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

प्रेम

Submitted by सुमुक्ता on 12 June, 2015 - 06:25

जाब तुला देणार नाही
विवरणे पुसणार नाही
प्रश्न आणि उत्तरांच्या
व्यूहात मी शिरणार नाही

वचने तुला देणार नाही
वायदे ऐकणार नाही
आश्वासनांची भूल मी
स्वत:स कधी देणार नाही

बंधनात अडकणार नाही
कैद तुला करणार नाही
स्वातंत्र्यात आहेस तू
परतंत्र मी होणार नाही

कबुली मागणार नाही
प्रमाण तुला देणार नाही
प्रेम आहे माझे तुझ्यावर
ते सिद्ध मी करणार नाही

आमची मालवणी

Submitted by नवनाथ राऊळ on 10 June, 2015 - 05:23

कुठेतरी वाचलेला हा लेख छान वाटला म्हणून येथे प्रकाशित करत आहे.. चूकभूल देणे घेणे..
▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁▁

गोयाची कोंकणी नि आमची मालवणी, दोघीव सख्ख्यो भैणी.. दोघीव प्रेमळ..!

शब्दखुणा: 

बेफिकीर…पण काही क्षणापुरताच

Submitted by गणेश पावले on 5 June, 2015 - 02:11

कागदावर रेखाटलेलं आयुष्य, ओरबडलेलं लेखन आणि कित्येक कागदांचा चुरा करून हिरमुसून सांडलेले अश्रू सारं काही तुझ्यासाठीच…
तुझ्या सवयी, गोड आठवणी जपताना साऱ्या जखमां पुन्हा भळभळत ताज्या होतात, तीव्र वेदनेत त्या कळा नकोशा झाल्या कि अबद्र ते सारे शिव्या शाप मीच मला देत कुडत बसतो.
मनाची कवाडे केंव्हाच बंद केली पण त्यावरील तुझी दस्तक अजूनही तशीच. रोज तीळ तीळ तुटताना मगरमिठीत गवसल्याची जाणीव होते या भाबड्या जीवाला. नकोसा होतो हा देह, नकोसा वाटतो जीव. मी जगतो ते फक्त तुझ्या निशाणीसाठी.

प्रेमा, माया आणि जिव्हाळाभौजी स्नेहसंम्मेलन

Submitted by सिंडरेला on 2 June, 2015 - 10:22
तारीख/वेळ: 
20 June, 2015 - 11:30 to 21 June, 2015 - 17:30
ठिकाण/पत्ता: 
6 Market Street, Suite 904 Plainsboro, New Jersey 08536 (609) 799-3100

प्रेमा आणि माया यांनी जिव्हाळाभावोजी यांच्या सन्मानार्थ एक कौटुंबिक स्न्हेहसंमेल्लन बागराज्यात ठेवले आहे. तर बागराज्यकरांनी आपल्या (तळ)घराची दारं उघडावित, बागेत खुर्च्या मांडाव्यात किंवा ठिकाणं सुचवावीत अशी प्रेमळ गळेपडू विनंती.

http://www.jhopri.menu/ContactUs.aspx

माहितीचा स्रोत: 
टिपापा
शब्दखुणा: 

विडंबन - मेरा जूता है जापानी

Submitted by आशूडी on 21 May, 2015 - 02:34

राज कपूरच्या जागी झी मराठीवरच्या "का रे दुरावा" मधल्या आदितीला ठेवून (हा हंत हंत!) खालील गाणे मेरा जूता है जापानी च्या चालीवर म्हणावे.

माझी चप्पल तुटलेली
विरार लोकल चुकलेली
जयची मी सिक्रेट पत्नी
तरी मागे लागली रजनी...

टिं.. टिणीणी णी.. णी णी.. णिणिणी..

शोभावैनींचा स्वैपाक करूनी
गोळीसह देते आण्णांना पाणी..
कुणाला काय थाप मारलेली
असते सदैव माझ्या ध्यानी...

टि...टिणीणि ...

नवरा नशीबी भोळा सांब
बापाला आहे पैशाचा दंभ..
ओ....ओओओ
केतकरकाका उपटसुंभ
माझी नेहमी बोलती बंद!

टि..टिणीणीणि णी...

मॉन्स्टर, टाईम्स आणि नौकरी
आमची करती हकालपट्टी
आख्ख्या मुंबईत एकच चाकरी

... And he 'said' I Love You !

Submitted by Mother Warrior on 8 May, 2015 - 21:58

सर्वांना येऊ घातलेल्या मदर्स डेसाठी शुभेच्छा!! मी जी गोष्ट सांगत आहे ती तशी झाली १५ दिवस जुनी. पण ह्या मदर्स डेच्या निमित्ताने लिहीत आहे. तुम्हा सर्वांना सांगावे असं वाटले. मदर्स डेच काय मला तर आयुष्यभराची गिफ्ट मिळाली!!

शीर्षकात लिहील्याप्रमाणे हो! he 'said' I Love you! हा ही म्हणजे अर्थातच माझा मुलगा. माझा, ऑटीझम असलेला, अजुन एकही शब्द न उच्चारणारा कसा काय म्हणाला आय लव्ह यू?

शब्दखुणा: 

जिथे रस्ता तिथे एस् टी

Submitted by स्वीट टॉकर on 5 May, 2015 - 05:59

मी पांचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो. घर मुंबईला. त्यामुळे वर्षात चार मुंबई-पांचगणी चकरा एस्टीने व्हायच्या. तेव्हां एशियाड देखील नव्हत्या त्यामुळे वोल्वो वगैरे कौतुकांचा प्रश्नच नाही. बॉम्बे सेन्ट्रल डेपो ते महाड मार्गे पाचगणी सात तासांचा प्रवास.

पैसोबा पुराण

Submitted by निमिष_सोनार on 29 April, 2015 - 01:31

माझ्या अल्प ज्ञानानुसार आणि अल्प अनुभवानुसार मी लिहिलेले पैसोबा पुराण-
माणसे जिंका. माणसे जोडा. पण ती पैशांनी नव्हे! आपल्या चांगल्या कृत्यांनी. चांगल्या स्वभावाने!

Pages

Subscribe to RSS - नातीगोती