someone

Submitted by Abhiram ramdasi on 18 November, 2015 - 11:35

तो द्विधा मनस्थितीत तासाचा प्रवास करुन त्या जागी आला."बऱ्याच दिवसांनी आलास" असा खोचक प्रश्न मरीन ड्राइव्हच्या खड़काने त्याला विचारला.दोन मिनिट अवाक् झाल्यावर जोरात आलेल्या लाटेने जणू कानफडात मारली आणि पुन्हा त्या प्रश्नाची आठवण करुन दिली!बाजुच कपल जरा जास्तच रसिक झालेल. तिथल्या वाऱ्याचं हे एक फार भारी असतं,स्वत: सगळयाशी एकटा भिड़तो पण तिथल्या जोडप्यांना एकमेकांशी अंतर्मुख भिडवतो!"काय रे इतक्या दिवसांनी आलास तरी माझ्याशी अजून काहीच बोलला नाहीस",खवळलेल्या समुद्राने शांत पणे विचारलं! काय बोलाव हे त्याला खरच कळत नव्हतं.दूर पसरलेल्या अथांग समुद्रात पाहून त्याने मोठा श्वास घेतला.गहिवरलेले शब्द बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. "मी आले" अस म्हणत ती त्या कठडया वर चढली आणि त्याच्या अगदीच बाजूला बसली.खवळलेला समुद्र किंचितसा शांत झाला,तो आज बऱ्याच दिवसांनी इथे का आला याचं उत्तर कदाचित तिच्या तोंडून निळ्या समुद्राला मिळाल होतं.ती आज थोड़िशी लाजत होती,पहिलीच भेट होती तशी.आणि ती तशीच होती म्हणूनच त्याला भेटावस वाटलं होतं तिला.पहिली भेट आणि पहिला पाऊस यात एक छान साम्य असतं,वेळ कधीच ठरलेली नसते सगळ आपोआप बदलत जातं.अगदी Unpredictable! एव्हाना आडोसा शोधताना दोघेही चिंब भिजले होते.एकमेकांना सावरायचा प्रयत्न सुरू होता.वारा पावसाला आणि तो तिला सावरत होता.आपल्याला सावरायला कोणीतरी आहे हे जाणवल्यावर तिच्या गालावर लाजेच्या खळया उमलत होत्या.तिथला वारा अचानक गुलाबी झालेला.लाटा खड़कावर जोरात आदळत होत्या बारीक थेंब दोघांच्या अंगावर येत होते. तिथल्या गुलाबी हवेत ती आणखी सुंदर दिसत होती."तू छान दिसतेस आज" असं मनोमन म्हणून त्याने तिची बट बाजूला केली आणि समुद्र - वारयासारखे दोघे बोलू लागले होते.माणसाचं एक बरं असतं त्याला हव ते तो निवडू शकतो,उलट सोबत आलेला वारा जसाच्या तसा समुद्राला Accept करावा लागतो.अधून मधून पडणाऱ्या सरी दोघांना चिंब भिजवत होत्या.दोघेही आजच्या पावसाने खुश झालेले.अनेक दिवसानंतर मनातल वादळ शांत झालेलं.त्याच्या अंतरंगातलं मळभट तिने फुंकर मारुन घालवल होतं,हे तिलाही समजलं होतं.मिठी मारून तिने दुजोरा दिला.आजच्या दिवसाची सुरुवात मनमोहक झाल्यामुळे,एकूणच जोर वाढला होता.तिने आणि समुद्राने पुन्हा एकदा त्याचं आयुष्य टवटवीत केलं होतं! क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users