ग़ज़ल : छटा वेगळ्या
मतला:
मजकूर तोच, छटा वेगळ्या।
साध्य तेच, तर्हा वेगळ्या।।
शेर २:
गुलाब सारे सुवास भरती।
पाकळ्यांच्या रचना वेगळ्या।।
शेर ३:
जिवनाच्या लाटांमधुनी।
सुख-दु:खांच्या कथा वेगळ्या।।
शेर ४:
आभाळ तेच, तारे तेचि।
चांदण्यांच्या दिशा वेगळ्या।।
शेर ५:
धर्म एक, जगी आदर तो।
धर्माचरणी कथा वेगळ्या।।
मकता:
‘मेघ’ जाणतो सत्य एकच।
पाहणाऱ्यांच्या दृष्ट्या वेगळ्या।।
शुक्रवार,५/९/२५ , २:५२ PM
अजय सरदेसाई -मेघ
गोष्ट एका प्रेमाची!
पुस्तक बदलण्यासाठी वाचनालयात जाण्यासाठी प्रिया घराच्या बाहेर पडली आणि काही अंतरावरूनच तिला मोटरसायकलवरून राजा येताना दिसला. तिचा चेहरा एकदम खुलला. राजा जसा थोडा जवळ येऊ लागला तसं त्याच्या मागे बसलेली सोनाली प्रियाला दिसली आणि प्रियाचा चेहरा एकदम पडला. तिच्या अगदी जवळ येऊन राजाने मोटरसायकल थांबवली.
“काय लायब्ररीत का?” त्यानं हसत तिला विचारलं.
“होss येतोस का?” आपण काहीतरी वेड्यासारखा प्रश्न विचारला आहे, हे प्रियाला तो प्रश्न विचारताच लक्षात आलं.
“अगंs आम्ही पिक्चरला चाललोय.” राजा अगदी सहज तिला म्हणाला.
एकदा वेताळाने राजा विक्रमादित्यला आपल्या खांद्यावर घेऊन जाताना विचारले, "हे राजा, मी तुला एक कथा सांगतो आणि त्यावर आधारित एक प्रश्न विचारतो. जर तू त्याचे उत्तर जाणूनही दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याचे शंभर तुकडे होतील. आणि जर तू उत्तर दिले आणि ते चुकीचे असेल, तर मी परत माझ्या झाडावर जाऊन बसेन."
विक्रमाने वेताळाचे म्हणणे ऐकले आणि त्याला घेऊन पुढे चालू लागला. वेताळ कथा सांगू लागला:
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…
बाहेर टीव्हीच्या कुठल्यातरी चॅनेलवर गाणं सुरू होतं.
“आई…, जेवण तयार झालं का?” पायातल्या चपला काढत दारातूनच मी आवाज दिला. “माझं ताट कर लवकर. उशीर झालायं, गाडी चुकेल.”
“आत तर ये आधी. का दारात उभा राहून जेवणार आहेस?” माझी आई बोलण्यात माघार घेणारी नव्हती.
मी गडबडीनं आत आलो, कपडे बदलले आणि हात धुवायला गेलो.
संध्याकाळचे सात वाजले होते. आठला शहराकडे जाणारी शेवटची गाडी होती. ती चुकवून चालणार नव्हतं. नाहीतर उद्या कामावर जायला उशीर झाला असता आणि मग बॉसची बोलणी खावी लागली असती.
समोर पसरलेला मोठा कोरा कागद.. त्याशेजारी कोरून ठेवलेली पेन्सिल, पांढराशुभ्र खोडरबर.. आणि कागदावर काय चित्र काढावं याचा विचार करत तिथेच अडकून पडलेलं तिचं मन.
आनंदाची बातमी
दारावरची बेल वाजली तसं मी घड्याळात बघितलं.
रात्रीचे पावणेअकरा वाजले होते. नेटफ्लिक्सवरचा चालू असलेला कार्यक्रम मी pause केला आणि उठलो. प्रिया आली असावी. महिन्यातून एकदा या मैत्रिणी कुणा एकीच्या घरी पार्टी करतात, तशी आज एकीच्या घरी पार्टी होती. नेहमी अशा पार्टीवरुन परत येताना बऱ्यापैकी दमलेली प्रिया आज खूपच उत्साहात आणि वेगात घरात शिरली.
“परेशss आनंदाची बातमी आहे.”
तिचा उत्साहाचा धबधबा अगदी ओसंडून वाहताना कळत होता.
कहाणी निळ्या डोळ्यांच्या रवीची!*
दहावी झाल्यावर शाळा सोडल्यानंतर २० वर्षांनी आम्ही सर्व मित्र आज भेटणार होतो. पस्तीशीला आलेले सगळे मित्र आता कसे दिसतात, हे पाहायची उत्सुकता मनात होती. Whatsapp वगैरेचा जमाना नसलेला तो काळ होता. त्यामुळे अगदी निवडक मित्र आता संपर्कात होते. नोकरी-व्यवसायासाठी पुण्याबाहेर किंवा पुण्यातच दूरवर गेलेले अनेक मित्र आज २० वर्षांनी भेटणार होते.
मी बऱ्याच वेळा काही गोष्टी घडल्या की त्यासाठी मराठीतील एखादी म्हण वापरत असतो. मला म्हणी आवडतात त्या इंग्रजीतले असो की मराठीतल्या, आपल्या बोलण्याला एक शोभा दिल्यासारखं त्यांचं स्वरूप वाटतं.
बऱ्याचशा म्हणीमागे मस्त मजेशीर कथा असतात. जसे 'काखेत कळसा गावाला वळसा' या म्हणीसाठी जी कथा आहे ती अशी:
एकदा एक मुलगा, जो बराच विसरभोळा आहे, घरी पाणी आणण्यासाठी कळशी तर घेतो, पण वाटत जाताना काहीतरी दुसराच विचार करत असल्यामुळे काखेतच कळशी आहे हे विसरतो आणि पाण्याजवळ गेल्यानंतर सगळ्यांना आपली कळशी कुठे आहे, हे विचारत सैरावैरा धावत सुटतो.