नाती

रिचार्ज

Submitted by जाई. on 14 May, 2025 - 09:31

आणि मग एके क्षणी मेंदूने तसेच डोळ्यांनीही शिणवटा आल्याचा निर्वाणीचा इशारा द्यावा . स्क्रीनवरच्या घड्याळ्याकडे पाहून चॅक आवाज काढत आवाराआवर करावी. 24 अवर्स सेन्टरलाईज्ड एसी ऑफिसच्या लिफ्टमध्ये शिरावं. मध्येच भेटलेल्या ऑफिसबडीजच्या " ओ ! लिटिल अर्ली लिव्हिंग टुडे ? " खोचक प्रश्नाला हॅ हॅ हॅ करत " सडनली , आय चेंज माय प्लॅन टू होम टुडे " असं कूल (!) उत्तर द्यावं. लोकलच्या प्लॅटफॉर्मवर पोचताच शिंग फुंकले रणी पवित्रा घ्यावा आणि तितक्याच उत्साहाने सज्ज होऊन लोकलमध्ये घुसावं.

दहाव्या वाढदिवसाचं पत्र: मस्ती की पाठशाला!

Submitted by मार्गी on 17 September, 2024 - 12:36

हिमालयातून सुरू झालेली माझी गोष्ट. . .

Submitted by मार्गी on 3 May, 2024 - 04:45

माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी. शिवाय आम्ही जिथे राहायचो तिथे खूप बकर्‍या सोबत असायच्या. मी बकर्‍या आणि गायी- बैलांसोबत खेळायचो. माझे दिवस खूप मजेत जात होते. आजूबाजूला असलेले डोंगर- झाडं मला ओळखीचे वाटायला लागले होते.

शब्दखुणा: 

आत्या नावाची जिव्हाळ्याची स्पेस

Submitted by मार्गी on 15 February, 2023 - 08:21

✪ प्रखरता नव्हे शीतलता
✪ पूर्वाश्रमीची वासंती वेलणकर अर्थात् सौ. सुमित्रा भांडारी
✪ परभणी ते देवगड व्हाया बस्तर
✪ "छांदसी आणि सुमित्रा"
✪ पतझड़ है कुछ, है ना?
✪ मृत्युसाठी आपण काय करू शकतो?
✪ मै अहम हूँ यही वहम था

शब्दखुणा: 

रघु अण्णांचा उद्योग!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 7 February, 2021 - 08:04

रघु अण्णांचा उद्योग!

कोकणच्या एका आडबाजूच्या वाडीतील, रघु नाईकचा वाडा आज मोठा प्रसन्न दिसत होता. अन का दिसू नये? चार दिवस झाले होते, त्याची लेक, जावई आणि बिट्ट्या, गोड नातू आले होते. एरवी गोदाआक्का आणि रघुआण्णा दोघेच रहायचे. त्यामुळे एक उदासवाणी शांतता तेथे नांदायची.

हिरव्या पोपटी शालूवर, एखादी केशरी आंगठी ठेवावी तस वाड्याचं कौलारू छत, लांबून दिसत होत.

विषय: 

संकोच

Submitted by मोहना on 21 December, 2019 - 10:37

"तोच तोच विनोद तू मला का सांगतेस?" आईवर मी चिडले आणि दाणदाण पाय आपटीत माझ्या खोलीत आले. खोलीचं दार धाडकन बंद केलं.
"दार मोडेल. हळू आपट." घ्या, माझ्या रागापेक्षा आईला दाराची काळजी. पुन्हा एकदा दार उघडून जोरात आपटावं असं वाटलं मला; पण तसं केलं तर संपलंच. आईची बडबड जी चालू होईल ना ती थांबणं कठिण. मी पलंगावर अंग टाकलं आणि माझा राग हळूहळू शांत होत गेला. हो, आता मी चौदा वर्षांची आहे तर आई गेल्यावर्षीपासून तिच्या कामाच्या ठिकाणी पोनीटेलने केलेला विनोद सांगते दरवेळेस. कधी मला, कधी सर्वांना. इतकी लाज आणते ना. सगळे हसतातही तिच्या या विनोदावर. मूर्ख नुसते. आजही तेच म्हणाली,

रगताची नाती

Submitted by अर्मोह on 3 September, 2019 - 07:14

इसरु लागली कशी ही नाती,
कधी काळी रगताची जी व्हती,
मायबापानं ज्यानला आपल मानलं,
तिच नाती बघ निघाली खोती,
तिच नाती बघ निघाली खोती ..

फोडा परीस बघ जपल हो जीनं,
बोट धरुन चालाया शिकिवलं ओ तीनं
तीच माय आता रडाया लागली,
भिताड धरुन बघ चालाया लागली ..

इसरु लागली अशी ही नाती ..

खाऊसाठी रोज रुपाया दिला हो जीनं,
हिशेब प्रेमाचा न्हायी मागितला ओ तीनं,
आतुरलेली माय ती नातवांच्या भेटीसाठी,
महाग झालीय बघ साद्या औषिदासाठी ..

इसरु लागली अशी ही नाती ..

शब्दखुणा: 

आभाळमाया

Submitted by T. J. Patil on 3 May, 2019 - 12:35

आभाळमाया..।

सात पावलं सोबत चालून
ती तुमची होते
तुमच्या संसार वेलीवर
फुलं फुलवीत रहांते..
एव्हढं सर्व तुम्ही
सोईस्करपणें विसरतां
सदा सर्वकाळी तिच्यावर
विनोद करत रहतां

रोज गरमागरम जेवण
तिनेच खावू घालावे
दिवसभर राबूनही पुन्हां
हसून स्वागत करावे
मोलकरीण सारखं तिने
दिवसभर खपावं
आणि तिच्या विनोदांवर
तुम्ही हसत बसांव..?

शब्दखुणा: 

दरी

Submitted by मोहना on 7 June, 2018 - 22:08

"सर" लांबून कुठूनतरी लहान मुलीचा आवाज कानावर पडल्यासारखं वाटलं त्याला. फळा पुसता पुसता त्याने मागे वळून पाहिलं. मुलांच्या नजरा फळ्यावर होत्या. भास झाला असेल असं वाटून पंकजने हाताने खडूची पावडर झटकली. तो हात पाठीमागे बांधून बाकांच्या मधून फिरत राहिला. मुलांच्या चेहर्‍यावरचा कोवळेपणा निरखून पाहता पाहता त्याला बिल्वाची आठवण येत होती. कशी दिसत असेल? १४ वर्षाची असेल आता. म्हणजे जवळजवळ याच मुलांएवढी. ओळखेल? स्वीकारेल? तिला मुळात आपल्याबद्दल काही माहीत असेल? मनात येणार्‍या प्रत्येक प्रश्नाबरोबर त्याच्या फेर्‍यांचा वेग वाढत होता. आपण वर्गात आहोत. बाकांच्या मधून फेर्‍या मारतोय.

शब्दखुणा: 

पैलतीर ... 

Submitted by तेजूकिरण on 22 November, 2016 - 10:25

"एक मिनिट वेळ आहे का?", फोन वर मोना विचारत होती. खरतर मी जरा घाईतच होतो. लवकर काम संपवून मित्रांना भेटायचं होतं.

"Urgent?" मी वैताग लपवायचा प्रयत्न करत विचारलं. 

" Yes, it's personal. Please?" मोना जरा गंभीरच वाटत होती. काहीतरी तसच कारण असणार. 

"OK. Come "
आता मात्र मला थोडी काळजी वाटायला लागली. मोना घाईतच आत शिरली आणि लगेच दरवाजा बंद करून माझ्या समोर बसली. तिचा चेहरा बघून मला जरा टेंशनच आलं. काय असेल बरं? हीचा काही प्रॉब्लेम? पण मग ही शमा कडे, माझ्या बायकोकडे का नाही बोलली? मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत असतानाच माझी नजर चुकवत मोना बोलायला लागली. 

विषय: 

Pages

Subscribe to RSS - नाती