टॅहॅ

Submitted by जव्हेरगंज on 16 November, 2015 - 11:08

"वैनी, पोरगं रडतयं"
"आरं बसकी थोडं खेळवत त्येला, यीवढी भांडी घासुन हु दी माजी"
"आवं पण म्या कायचं क्येलं नाय, तरीबी रडतयं"
"तसच करतयं रं, आण की थोडं फिरवुन"
"बाला, खुलकुला दीव का तुला"
"ई~या, ई~या"
"मोठ्या आय पशी न्हीवुन दी रय"

"मोठ्या आयं, बाळ रडतयं"
"हा~ड, तेव्हड कुत्रं हाण रं, मगाधरनं दारात बसलयं"
"च्तु च्तु च्तु, छौ छौ"
'काय जालं आमच्या बालाला, आगं व्हयं, आगं व्हयं, पाजलयं कागं ह्येला? आरं हा~ड की"
'मुंगी बिंगी आसल तर बगावयं कुटं"
"काय बाई, ह्या बायांचं आजिबात ध्यान नसतयं गय"
"ई~या, ई~या"
"भया, आण्णा हायतं का बघ रं कुटं, त्येंच्याकडं गेल्यावर ऱ्हायलतरी"

"आण्णा मोठी आय बुलीवतीय"
"हाईक हो~~ हाईक, बादली ठिवरं तीवढी म्हशीम्होरं"
"हायक~ च्यॅक, च्यॅक, च्यॅक, पाणी पी बंडे पाणी"
"कशाला बुलीवतीयरं"
"आवं पोरगं रडतयं कवाधरनं"
"आरं मग मोकळ्या पटांगणातनं फिरवा रं त्यला, आगं आयक्ल का? जरा भाईर पटांगणात आणा त्यला"
"जावा की घीऊन'
"ये भया आण जा रं त्यला"
"ऊं, लय जड हाय"
"मग बस त्यला खेळवत, आलु मी म्हस धुन, हाईक हो हाईक"

"मोठ्या आयं, मी चाल्लू खेळाय"
"थांबै जरा बाबा, ह्या दोडक्याला काय झालयं बघु दी, फळीवरली बाटली दी मला तेलाची"
"धाडधडांग~तडांग~खुळ्ळ्ळ"
"आरं दमानं, बाटली घी मनलं सगळा पसारा केला कडुनं" "धपाक"
"माज्या हाताला येत नवती, ऊ~ऊ~ऊ, फुर्रर"
"गप बसतू का आता, तुजंबी भोकाड नगु पसरु"
"काय कालवा लावलाय रं? तिथं आल्यावर समद्यास्नीच बडवीन आता"
"तुमी बसाकी म्हैस ध्वत, तुमाला कोण बोलवतयं'
"वैनी~~"

"भया गप रड नकु, आण त्येला हिकडं, काय देवा, एक काम करु दी ना पोरगं"
"फुर्रर, तुमाला बगीतलं की लगीच गप बसलं बगा फुर्रर"
"व्हय त्येला सारखी आयच लागती"
"दादा कुटं गेला वं?"
"कुटं पालता पडलाय बाबा, कुणासठाव"
"कुटुक खुटूक खुर्रर"
"तसं नगु रं करु, कुडाचं पापुडं ऊडत्यातं"
"हु...."

"भया तीवढी सतरंजी हातरं रं, झोप लागलीय बग ह्येला, हितच झोपवती आता"
"सावलीत टाक गय त्येला, तोंडावर पांघरुन नगु घालू"
"वैनी, मी जावका खेळाय?"
"आरं बसकी ह्येज्याजवळ, हातानं वारं घाल, आलीच मी यीवढी भांडी धुन"
.
.
.
.
.
.
"झोप लागली का बाला तुला"
"उ~..उ~"
"आयवं, झोप झोप झोप"
"अीही ~ अीही ~ अीही..."
"....."
"ई~या, ई~या, ई~या"

"वैनी, पोरगं रडतयं"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users