नातीगोती

आधुनिक स्त्रियांचा स्त्रीवाद

Submitted by सुमुक्ता on 20 February, 2015 - 03:29

जागतिक महिला दिन जवळ आला आहे त्यानिमित्ताने काहीतरी लिहू असे वाटत होते!! म्हणून स्त्रीवाद म्हणजे फ़ेमिनिझम वर काहीतरी लिहावे असे ठरवले. विषयाला अनुसरून निरीक्षण करायला मी चालू केले आणि प्रश्न पडला की स्त्रीवादाचा झेंडा मिरविणाऱ्या आम्ही शहरी आधुनिक स्त्रिया खरोखरच स्त्रीवादी आहोत का?

जुन्या कपड्यांचे काय करावे?

Submitted by मी अमि on 16 February, 2015 - 00:52

घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.

जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.

१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.
२. रद्दी प्रमाणे जुने कपडे विकत घेणारी दुकाने असतात का? कृपया माहीत असल्यास सांगा.

हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

Submitted by dipak.vichare on 2 February, 2015 - 05:51

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो..
मला माझ्या मित्राने ही कविता पाठवली होती. मला ही कविता आवडली म्हणुन मी इथे अपलोड केली आहे. सध्याची परिस्थिति ही अशीच आहे.

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

जुगलबंदी चालू होती दोघांची..
आता वेळ कमी तेव्हा पैसे कमी..
आनंदी आता आहे का तेव्हा होतो ?
आठवता आठवता दुखी होतो....

तेव्हा रोड साइड जीन्स वापरायचो...मित्रांच्या
आता CK, Diesel धूळ खात पडल्या आहेत माझ्या...

तेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची....
आता पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....

नायजेरियन विचित्र कथा - २ - बाबूल मोरा..

Submitted by दिनेश. on 1 February, 2015 - 09:40

हि घटना आहे १९९६ ची. मी त्यावेळी नायजेरियामधल्या पोर्ट हारकोर्ट या भागात होतो. हा भाग खनिज तेल समृद्ध आहे. पुढे हे शहर अपहरणासाठी कुप्रसिद्ध झाले. मी होतो त्या काळातही ते सुरक्षित नव्हतेच.

मी एका फ्रेंच कंपनीत नोकरीला होतो. आमच्या कंपनीत मी सोडल्यास दुसरा कुणीही भारतीय नव्हता. ४० फ्रेंच, १ इतालियन, १ जर्मन, १ ब्रिटीश आणि एक साऊथ आफ्रिकन होता. माझ्यासोबत ब्रिटिश आणि इतालियन माणूस रहात असे. आम्ही रोज एकत्रच कामावर जात असू.

घर ते ऑफिस अंतर फार नव्हते, पण तिथल्या "गो स्लो" ( गो स्लो म्हणजे नायजेरियन ट्राफिक जाम ) मूळे

हिंजवडी चावडी

Submitted by mi_anu on 31 January, 2015 - 02:57

(ही जेवणानंतरची चावडी, त्याचे ठिकाण, पात्रे, गप्पा सर्व काल्पनिक आणि कैच्याकै आहे.याचा वस्तुस्थितीशी संबंध असल्याशी शंका आल्यास दोन तीन शिंका देऊन सर्व शंका झटकून टाकाव्या.)

"काय म्हणाला गं तुझा मांजर अप्रेझलला?"

तू पण मी पण

Submitted by मिल्या on 29 January, 2015 - 05:10

विरहामध्ये झुरतो कणकण, तू पण मी पण
घेत राहतो श्वास तरी पण, तू पण मी पण

रात्र घेउनी आली अगणित स्पर्श-सुयांना
करायचे का चांदण-गोंदण, तू पण मी पण

सहवासाची लज्जत तेव्हा वाढत जाते
श्वास ठेवतो जेव्हा तारण, तू पण मी पण

माझ्यामध्ये बिंब तुझे अन् तुझ्यात माझे
तरी भोगतो एकाकीपण, तू पण मी पण

लाट किनारी आल्यावरती लाट न उरते
कधी न केले तसे समर्पण, तू पण मी पण

सोबत असुनी मुक्कामाचा थांग न पत्ता
करत राहिलो नुसती वणवण, तू पण मी पण

मिठीत होतो तरी आपल्यामधे दुरावा
बसलेलो कवटाळत 'मी' पण, तू पण मी पण

- मिलिंद छत्रे

आमच्या मुलींचे पालक ( इथे पुन्हा टाईप केलेले. लिंक नव्हे)

Submitted by स्वीट टॉकर on 13 January, 2015 - 05:47

आमच्या घरी हॉलमध्ये बर्‍यापैकी मोठ्या साइझचा एक फोटो आहे. मी, माझी पत्नी शुभदा आणि तिच्या हातात आठ महिन्यांची आमची कन्या पुनव. मूळ फोटो पंचवीस वर्षें जुना. एकदम ordinary.

आमची एक मानसकन्या देखील आहे. तिचं नाव दीपाली. तिच्याकडे हा जुना छोटासा धूसर फोटो होता. फोटोशॉप सॉफ्टवेअरची उत्तम माहिती आणि बरीच मेहनत यांच्या जोरावर तिनी या फोटोला नवजीवन दिलं, एनलार्ज केला, चांगल्या फ्रेममध्ये लावून एक महिन्यापूर्वी आम्हाला भेट दिला. अर्थातच आम्ही कौतुकानी तो हॉलमध्ये टेबलावर ठेवला.

आता उत्तरार्ध.

पाचपोच

Submitted by कोकणस्थ on 13 January, 2015 - 00:13

माझ्या आजोबांचा लोकसंग्रह बर्‍यापैकी होता. ते गेले तेव्हा अनेक जण आजीला भेटायला येऊन गेले. काहींनी आजोबांच्या चांगल्या आठवणी सांगितल्या, काहींनी त्यांचे गुणवर्णन केले, तर काहींनी नुसत्या मौनानेच आम्ही तुमच्या दु:खात सामील आहोत हे सांगितले. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत त्यांनी पत्र पाठवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आजोबा गेल्याचे दु:ख काही प्रमाणात का होईना अशा लोकांमुळे कमी व्हायला मदत झाली.

हिंदी चित्रपटगीतांवरील विडंबन काव्य हवे आहे. Urgently !

Submitted by स्वीट टॉकर on 31 December, 2014 - 03:03

आमच्या मरीन इंजिनियरिंग कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये प्रोफेसरमंडळी काहीही सादर करायला कचरतात. (यात 'मरीन' हा शब्द इंग्रजी वाचावा. मराठी नव्हे.) लोक हसतील की काय असं वाटत असावं. ते बदलण्याचा मी आणि माझी पत्नी शुभदा प्रयत्न करंत आहो त. गेल्या वर्षी आम्ही जे सादर केलं होतं ते आता यू ट्यूबवर अपलोड केलेलं आहे. त्याची लिंक आता माझ्याकडे नाही पण एक दिवसात माबोवर टाकीनच.

मात्र या वर्षीसाठी आम्हाला हिंदी चित्रपट गीतांवर केलेले विडंबन काव्य हवे आहे. नेटवर शोधले पण मिळाले नाही. वेळ कमी आहे. प्लीज कोणीतरी लवकर सांगा.

Pages

Subscribe to RSS - नातीगोती