गणपती, नवरात्र आणि दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.
यंदाचे दिवाळी अंक प्रकाशित व्हायला सुरवात झाली आहे.
कोणकोणते दिवाळी अंक घेतले आणि त्यात काय काय वाचले याबद्दलची चर्चा करायला हा धागा.
तसेच, इथे असणाऱ्या मायबोलीकरांचे साहित्य (लेख, कविता) एखाद्या दिवाळी अंकात छापून आले असेल तर त्याची माहिती पण इथे देऊयात.
छापील अंकांबरोबर आता डिजिटल ई अंक पण येऊ लागले आहेत. त्याबद्दल देखील इथे माहिती देऊयात.
यंदाचे दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागलेत. कुठे काय वाचण्यासारखं वाटतंय , वाचल्यावर कसं वाटलं याची नोंद करूया.
आज दुपारी "चित्रलेखा" कार्यालयातून मला फोन आला की तुमच्या उरलेल्या वर्गणीचे पैसे आम्ही परत करत आहोत कारण आम्ही चित्रलेखा साप्ताहिक बंद करतो आहे.
आजकाल छापील ऐवजी ईबुक वाचनात रस असल्याने क्षणभर असे वाटले की, फक्त छापील चित्रलेखा बंद झाले. पण नाही! डिजिटल चित्रलेखा पण बंद झाले आहे. म्हणजे काय की थोडक्यात चित्रलेखा मासिकाचे प्रकाशन पूर्ण बंद झाले आहे.
चित्रलेखा स्वतःची अशी एक वेगळी ओळख टिकवून होते. रंजक पद्धतीने आणि वेगळ्या धाटणीचे लेखन करून वाचकांना किचकट माहिती सोपी करून सांगणे हे चित्रलेखाचे वैशिष्ट्य होते, असे माझे मत आहे.
यावर्षीचे दिवाळी अंक प्रकाशित व्हायला सुरवात झाली आहे. कोणते अंक घेतले, घ्यायचे आहेत आणि वाचले याबद्दल चर्चा करायला हा धागा.
नेहेमीप्रमाणे यावर्षी सुद्धा बऱ्याच मायबोलीकरांचे साहित्य दिवाळी अंकांमध्ये असेल / आहे. त्याची सुद्धा इथे माहिती द्यावी.
महामारी
जगात पसरली जेव्हा कोरोणाची सावली,
पोलींसांच्या रुपात तेव्हा उभी ती माऊली !
डोक्टरांच्या सेवेची किंमत पण सगळयांना गावली,
बाळासाठी आई जशी मदतीस धावली !
भुकेल्या पोटांची स्वप्ने पण तेव्हाच गाठली,
शेतकऱ्यांचे मोती जेव्हा बाजारात थाटली !
सरकारच्या नावाखाली आपल्यांनीच घरे साठली,
कर्जात बुडालेल्या देशाला तरी कुठून वाचवेल ती बाटली !
गरीबांची थट्टा त्यांनी हवेसारखी उडवली,
कुठे गेली माणुसकी जेव्हा ताईची वाट अडवली !
भीती पोटी मरणाच्या काहींनी शक्कल लढवली,
शहरांच्या गर्दीने मग खेड्यात मैफिल सजवली!
हा धागा यावर्षीच्या दिवाळी अंकांबद्दल चर्चा करण्यासाठी आहे.
आपण कुठले दिवाळी अंक वाचले, त्यातील कुठलं साहित्य वाचलं, काय आवडलं, काय नाही आवडलं इत्यादी गोष्टींबाबत आपली मतं इथे मांडता येतील.
दिवाळी अंकांविषयीचा कुठलाच मुद्दा इथे वर्ज्य नाही.
आपले बरेच मायबोलीकर वर्षभर उत्तमोत्तम लिखाण करत असतात. शिवाय विविध दिवाळी अंकांमध्येसुद्धा त्यांचं साहित्य प्रकाशित होत असते. ओळखीच्या, आवडत्या आणि दर्जेदार लिहीणार्या मायबोलीकरांचे दिवाळी अंकांमधील लेखन वाचायची उत्सुकता आहे. या वेळेस कुणाकुणाचे साहित्य कोणकोणत्या दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे बरे !! ते कमेंटीमध्ये येऊ द्या.
=============
विनिता.झक्कास यांनी सुचवल्याप्रमाणे मूळ लेखात दिवाळी अंक - लेखक पेष्टवीत आहे :
-------
मुशाफिरी : पूनम, आनंदयात्री, अनया, आतिवास, अस्चिग, अॅस्ट्रोनॉट विनय, फूल, शाली