माहेर

सौंदर्यलक्ष्यी रामानुजन

Submitted by भास्कराचार्य on 25 October, 2020 - 12:36
रामानुजनचा पुतळा

तुम्ही गणित करता म्हणजे काय करता बरं? असा प्रश्न मला नेहमी लोक विचारतात. 'आता कुठले प्रश्न राहिलेत सोडवायचे बुवा?' असं प्रश्नचिन्ह भल्याभल्यांच्या चेहर्‍यावर उमटलेलं दिसतं. "Τι κάνεις όταν κάνεις μαθηματικά;" अर्थात 'जेव्हा तुम्ही गणित सोडवता तेव्हा काय करता' असा ग्रीक भाषेत प्रश्न २५०० वर्षांपूर्वी युक्लिडलाही विचारत होते म्हणे. "तात, त्वं गणिते किं करोषि?" असा प्रश्न भास्कराचार्यांनी लीलावतीच्या बाळमुखातून ऐकला असल्याचे कळाल्यास मला नवल वाटणार नाही.

विषय: 

माहेर, सासर

Submitted by पाषाणभेद on 7 December, 2019 - 18:10

माहेर, सासर

नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा
कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा

अल्याड गाव माझे त्यात मी राहिले
पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले

चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर
नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर

मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते
त्याचाकडची वाट नजरेला खुणावते

मनी लागली हुरहुर कसे असेल सासर
कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर

- पाषाणभेद
०८/१२/२०१९

शब्दखुणा: 

यंदाच्या (२०१४) 'माहेर', 'मेनका', 'जत्रा' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका

Submitted by चिनूक्स on 8 October, 2014 - 07:16

दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोलीच्या खरेदीविभागातून तुम्ही दर्जेदार दिवाळी अंक विकत घेऊ शकता.

कुठले अंक विकत घ्यायचे, हे ठरवणं सोपं जावं, म्हणून काही महत्त्वाच्या अंकांच्या अनुक्रमणिका आपण मायबोलीवर प्रसिद्ध करणार आहोत.

१. यंदा 'माहेर'च्या अंकात -

Maher-Diwali-2014 anu.jpg
विषय: 

साळुंकी

Submitted by संतोष वाटपाडे on 23 February, 2014 - 21:36

का साळुंकी दारावरती ओरडते ही मला ठाव ना,
का थांबावी डोळ्यावरती आज अनावर भावना...

माहेराचे कुणी अजुनही आले नाही फ़ार दिसाचे,
ए आभाळा आता एकदा आईचा चेहरा दाव ना....

लागे उचकी ठसक्यासरशी सय कुणाची येतसे,
दादा पडला गुडघ्यावरती हळद त्याला लाव ना....

रोज दिसे या झाडावरती घरटे भरले कबुतरांचे,
एकटीच मी दुर कशी मज दिसेच माझा गाव ना...

घरात सारी इथे असूनही नातीमाती आपुलकीही,
तरी उरातुन आजही पुसले माहेराचे नाव ना.....

सांज वितळता माळावरती बसुन रहावे असे वाटते,
वाट जरी ती रोजंच दिसते सरली माझी हाव ना....

कधी कावळा परसामध्ये ओरडला की धावतेच मी,

स्थित्यंतर

Submitted by भानुप्रिया on 8 July, 2013 - 06:40

पाउल टाकलंय उंबरठ्याबाहेर,
मन अजून घरातच रेंगाळतंय..
नव्याच्या लखलखटात बावरून,
माजघरातला अंधार शोधतंय..

'माझं' घर आता 'आईचं', 'माझी' माणसं 'माहेर'
संदर्भ बदलतायत भोवतीचे, मी ही बदलतेय बहुतेक
पण खरंच, बदलेन का मी?
स्वतःचे स्वतःशी चाललेले अखंड संवाद..मध्यच अडखळतेय, सावरतेय.
स्वतःचं सामान आवरताना, एकट्यानेच रडतीय.

आनंद की हुरहुर अधिक, सांगता येणं कठीण आहे,
आठवांचे सारे बंध, असं सोडून जाणंही कठीण आहे!

नवं जोडायला जमेल का?
जुनं सोडायला जमेल का?
माहिती नाही..कळेलच लवकर!

बावरलेलं मन, येईल मग माजघर सोडून!

आठवण

Submitted by santosh watpade on 25 February, 2013 - 10:11

का साळुंकी दारावरती ओरडते ही मला ठाव ना,
का थांबल्या डोळ्यावरती आज अनावर भावना...

माहेराचे कुणी अजुनही आले नाही फ़ार दिसाचे,
हे आभाळा आता एकदा आईचा चेहरा दाव ना....

लागे उचकी ठसक्यासरशी सय कुणाची येत असे,
दादा पडला गुडघ्यावरती हळद त्याला लाव ना....

रोज दिसे ते झाडावरती घरटे भरले कबुतरांचे,
एकटीच मी दुर कशी मज दिसेच माझा गाव ना...

घरात सारी भरुन इथेही नातीमाती आपुलकीची,
तरी उरातुन आजही पुसले माहेराचे नाव ना.....

सांज होता माळावरती बसुन रहावे असे वाटते,
वाट जरी ती रोजंच दिसते सरली माझी हाव ना....

कधी कावळा परसामध्ये ओरडला की धावतेच मी,

शब्दखुणा: 

माहेरी जायची मला झाली आता घाई

Submitted by पाषाणभेद on 9 September, 2011 - 21:40

माहेरी जायची मला झाली आता घाई

डायवर दादा रं
डायवर दादा जोरात गाडी चालीव की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

गेले व्हते मी बाई मागल्या दिवाळीला
पुरं व्हत आलं आता वर्ष त्या सणाला
आखाजी संपून आता दसरा आला की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

बा माझा कसा आसलं शेतात राबूनी
थकला आसंल घाम कष्टाचं गाळूनी
यिचारपुसं त्याची समक्ष करू दे की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

आयी माझी हाये जनू बाभळीचं लाकूड
सौंसाराच्या आगीसाठी जळतीया भुरभुर
कधी मिठी मारतीया तिला आसं मला झालं रं

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

किती दिवस झाले माहेराला गेले नाही

Submitted by पाषाणभेद on 17 February, 2011 - 00:51

मंडळी, आज वेळ मिळाला म्हणून लगोलग दोन कविता डोक्याला दोन कवीता सुचवू दिल्यात. (आपल्यावर होणार्‍या अन्यायाबद्दल क्षमस्व.)

किती दिवस झाले माहेराला गेले नाही

किती दिवस झाले माहेराला गेले नाही
किती वेळ करू सासराची सरबराई ||धृ||

तो नदीचा काठ अन आंबा मोहरलेला
हाळात जनावरं येती पाणी प्यायला
धुनं धुतल्यानंतर सावलीला तेथेच जाई
किती दिवस झाले माहेराला गेले नाही ||१||

ते उतारावरचं सटूबाईचं मंदीर
त्याच्याबाजूलाच मातीची गाढंवं
जनू कुंभाराकडे माठ पणती घ्यायला जाई

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माहेर