सध्याच्या दारूमिश्रीत पेट्रोलमुळे माझी जुनी अॅक्टिव्हा त्रास द्यायला लागली आहे. तशी १४ वर्षांची पण झाली आहे म्हणा..
तर मुद्दा हा, की दिवसाकाठी ३-४ किमी फिरणे असलेल्या 'अधेड उम्र के नौजवान' को चालेल अशी विजेवर चालणारी कोणती गाडी घेता येईल? तुमच्याकडे आहे का? तुमचा अनुभव काय?
नौजवान असल्याने मोटरसायकल सारखी दिसणारी देखिल चालेल. स्कूटरच हवी असे नाही.
ओला नको. कुणाल कामर्याने घाबरवलं आहे बरंच.
 
  
      
  
  
      
  
  
    हल्ली हॅण्ड हेल्ड स्टीम वाल्या इस्त्रीची सारखी जाहिरात दिसते आहे. (मी गुगल वर सर्च केल्यानेही असेल). मल घ्यावी वाटते आहे. पण कोणाकडेच बघितली नाही. फक्त ब्रँडेड कपड्यांच्या दुकानात बघितली आहे. हँगर ला कपडे लावून तिथल्या तिथे इस्त्री करता येते. पट्कन होते वगैरे खूप ऐकले आहे.
तर इथल्या कोणी वापरली आहे का? कोणत्या ब्रँड ची? 
इंस्टा वर टेकी मराठी म्हणून एक पेज आहे ते शाओमी ची रेकमेंड करत आहेत. पण साधारण सेम किमतीत (३ हजार) फिलिप्स ची पण दिसते आहे ऑनलाईन.
 
  
      
  
  
      
  
  
    हल्ली पूर्वी कधीही नव्हती एव्हढी गॅझेट्स उपलब्ध होत आहेत.   आपण यातली गॅझेट्स वापरली असतील. अॅक्सेसरीज वापरली असतील.  इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल अविष्कार वापरले असतील.    त्याची माहिती इथे शेअर करूयात.
हा ग्रुप वाहनांशी संबंधित असला तरी वाहन आणि मोबाईल यांचे नाते वाढत चालले आहे.  त्यामुळे वाहनात वापरायचे मोबाईलशी संबंधित गॅझेट, अॅक्सेसरीज ( मोबाईल  होल्डर इत्यादी) याच्याशी संबंधित माहिती सुद्धा इथे शेअर करता येईल.
सायकल साठी सुद्धा अनेक वस्तू उपलब्ध आहेत.  
 
  
      
  
  
      
  
  
    तुम्ही विचाराल कोण हा डेव्हिन? कोण ही सोरा? आणि ते आलेत म्हणून आम्ही का थांबायचे?
या दोघांबद्दल जाणून घेण्याआधी एआय म्हणजे काय ते बघू. 
 
  
      
  
  
      
  
  
    मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. मुख्य उद्देश प्रवासादरम्यान किंवा फिरायला गेल्यावर सहज आणि सुलभ व  चांगल्या दर्जाची फोटोग्राफी करता येणे हा आहे. दर वेळेस कॅमेरा सोबत नेणे शक्य नसते. अशा वेळेस एखादे सुंदर दृश्य टिपता येत नाही. 
कृपया 30 हजार पर्यंत बजेट असणारा फोटोग्राफी साठी उपयुक्त असा मोबाईल सुचवा.
Thanks in Advance !
 
  
      
  
  
      
  
  
    माझ्याकडे चार वर्षांपूर्वी घेतलेली अॅमेझाॅनची फायरस्टीक आहे. 
त्याच्या रिमोटच्या बॅटरीच अगदी चारपाच दिवसांत संपायच्या म्हणून रिमोटचं मोबाईल अॅप घेतलं.
मात्र हल्ली डिव्हाईस नाॅट फाऊंड अशी एरर वरचेवर येते. थोड्या वेळानं ती आपोआप जातेही आणी फा. स्टी. चालू होते. 
तर..वरचेवर असं होत असेल तर फा. स्टी  बदलायला हवी का?
नवी घ्यायची तर कुठली घ्यावी? अॅमेझाॅनमधेही खूप ऑपशन्स दिसतायत्. नक्की कुठली घ्यावी समजेना. 
कुणी माहिती देऊ शकेल का?