मला दिवाळी अंक वाचायला आवडतात. कित्येक लेखांनी माझे विचार आणि आयुष्याची दिशा बदलली. ( उदा. स्लो लिव्हिंग लेख, लोकमत दीपोत्सव दिवाळी अंक, 2020)
साधारण 2020 नंतर फेसबुक वर काही लोक आवर्जून वाचावे असे दिवाळी अंक, लेख याबद्दल लिहीत. लोकसत्ता वृत्तपत्र सुद्धा साधारण दिवाळी जवळ आली की, बाजारातील निवडक अंकांचे ट्रेलर स्वरूपात छोटे लेख अंकाच्या फोटो सह दुसऱ्या तिसऱ्या पानावर छापते.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०२४ सालच्या सॅन होजे येथे भरणाऱ्या अधिवेशनाचे वारे आता सर्व उत्तर अमेरिकेत वाहू लागले आहेत. या अधिवेशनातील ‘ड्रीम्स UNLIMITED’ हा शुभारंभाचा कार्यक्रम कसा असणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना आहेच. त्या संदर्भात कार्यक्रमाच्या रचनाकार निर्मल गोसावी यांच्याशी केलेली बातचीत:
BMM म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ. ही अमेरिकेतील १९८१ पासून कार्यरत असलेली संस्था आहे. बृहन महाराष्ट्र मंडळ वेगवेगळ्या ५२ महाराष्ट्र मंडळांना एकत्र आणून अमेरिकेतल्या मातीत मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आणि मराठी समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रातले प्रकल्प राबवते. याच BMM चा एक भाग असतो द्विवार्षीक अधिवेशन.
नमस्कार,
आपल्याला माहीत असेलच की ह्या वेळचे, २०२४चे, BMM अधिवेशन बे एरिया मध्ये होत आहे. या अधिवेशनाची आठवण म्हणून एक विशेषांक काढला जातो, तो म्हणजेच स्मरणिका. यंदाची स्मरणिका नेहेमी सारखी फक्त छापील स्वरूपातच न काढता, ई-बुक आणि ऑडिओ बुक ह्या स्वरूपातही काढली जाणार आहे. त्यामुळे ती जगाच्या कानाकोपऱ्यातून वाचता आणि ऐकता येईल.
मराठी माणसाने साता समुद्रापार येऊन अमेरिकेत रुळताना स्वतःचे मराठीपण आणि परंपराही जपल्या. त्यालाच मध्यवर्ती ठेऊन या वेळच्या स्मरणिकेचा विषय आहे,
"मराठी माणसाला अमेरिकेचा रंग: अमेरिकेला मराठी माणसाचा रंग".
माबो वर बरेच मराठी पालक, वाचक, आणि लेखक आहेत. अमेरिका आणि कॅनडा मधील जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हे पोहोचवायचे आहे, त्यामुळे इकडे टाकते. धन्यवाद!
नमस्कार,
बे एरिया कॅलिफोर्निया इथे होणाऱ्या BMM2024 अधिवेशनाच्या निमित्ताने आपण एक स्मरणिका तयार करत आहोत!
त्यातील बाल विभागासाठी कविता, चित्रं, किंवा भाषणं इत्यादी मुलांनी तयार केलेला मजकूर आम्हाला पाठवा. त्यासाठीचे विषय, नियम, आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर वाचा https://bmm2024.org/smaranika-childrens-section/
आज शेवटचां दिवस, हो नाही करता करता रात्री अकराला ठरवले, कसही करुन उद्या जायचच.
सकाळी सातला रिव्हरव्ह्यू पार्कला पोहोचले. अपेक्षेप्रमाणे तिकडे मेळा जमला होता. लांबूनच दिसणारे उंचावलेले भगवे, साड्या, पंजाबी ड्रेस, पांढरे-भगवे कुडते आदी पारंपरिक पोषाखातील बायामाणसे, झांजांची किणकिण, आसमंतात पसरलेला उत्साह लगेच तुम्हाला आपल्यात सामावून घेत होता. त्यातच स्वागताला लावलेल्या चंदनाच्या टिक्याने पुढील ३-४ तासांची नांदीच मिळाली.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २० वे अधिवेशन यंदा अॅटलांटीक सिटी कन्व्हेंशन सेंटर, न्यू जर्सी येथे ११ ते १४ ऑगस्ट या दरम्यान भरणार आहे.
यंदाच्या अधिवेशनात आमच्या अभिव्यक्ती लॉस एंजलीस संस्थेला एक कार्यक्रम करायची संधी मीळाली आहे. या कार्यक्रमाला यायचं हे आग्रहाचं निमंत्रण. तुमचे कोणी मित्र किंवा नातेवाईक जाणार असतील तर त्यांनाही कळवा. आमचा कार्यक्रम शुक्रवार १२ ऑगस्ट संध्याकाळी ४:३० वाजता हॉल ३०३ मध्ये आहे.
कार्यक्रमाची झलक पहा.
महाराष्ट्र देश माझा
(ह्या कवितेत महाराष्ट्रातील किती गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख आलेला आहे ते कृपया मोजावे).
सातपुडा सह्याद्रि अन दख्खन
विदर्भ मराठवाडा खानदेश अन कोंकण
कृष्णा गोदावरी तापी भीमा अन कावेरी
काटक राकट पवित्र बनवी भूमी भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी १
ऊस कापूस हापूस अन पायरी
कांदा नारळ केळी द्राक्ष अन संत्री
गहू धान ज्वारी नाचणी अन बाजरी
धनधान्य फळांची इथे रेलचेल भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी २