सेवाभावी संस्था

वेणुपुत्राची गाथा

Submitted by झुलेलाल on 20 May, 2021 - 13:45

आपल्या वाटणीला आलेलं भाग्याचं संचित नियती कशी क्रूरपणे हिरावून घेते... सुनील देशपांडे यांच्या आनंदी सहवासाचं भाग्य मला गेल्या काही वर्षांत लेखनाच्या निमित्ताने लाभलं. आज सुनीलजी आपल्यात नाहीत, ही दु:खद बातमी कळली. शरीरातल्या रक्ताची एक थंडगार शिरशिरी शिरापासून पायापर्यंत सरसरत सरकली, आणि मन सुन्न झालं...

अनाथ , गतिमंद मुलासाठी संस्थेची चौकशी

Submitted by पीनी on 22 April, 2021 - 07:27

आमचे एक नातेवाईक काही दिवसांपूर्वी अचानकपणे वारले. आता त्यांचा मुलगा एकटा पडला आहे. (वडील काही वर्षांपूर्वी गेली, आई नुकतीच गेली, हा एकुलता एक आहे)

तो साधारण 28-30 वर्षांचा आहे. पण थोडा गतिमंद प्रकारचा आहे. अपंग नाही, मतिमंद नाही, 10 वी झालेला आहे. व्हाट्सअप्प वापरता येते, गूगल सर्च करता येते. पण व्यवहार ज्ञान नाही. नोकरी केली नाही, लोकांमध्ये मिसळला नाही. तब्येत बरीच नाजूक आहे.

त्याच्या एका नातेवाईकांकडे त्याची राहण्याची व्यवस्था करावी असा विचार सुरू आहे. आणि त्याच्या आईवडिलांच्या पैशाचे ट्रस्ट करावे, ज्यात इतर काही नातेवाईक असतील असे ठरत आहे.

ये दुख काहे खतम नही होता बे? -2

Submitted by सिम्बा on 30 March, 2021 - 10:56
migrant with a child

नमस्कार,
मध्यंतरी बराच काळ मायबोलीवर येणे झाले नाही, त्यामुळे "ये दुख काहे खतम नही होता" लेखाचा दुसरा भाग इकडे टाकायचे राहून गेले होते. (या लेखाचा पहिला भाग इथे वाचू शकता)

मैत्री उपक्रम माहिती आणि आवाहन - २०२१

Submitted by हर्पेन on 14 January, 2021 - 07:31

ह्या धाग्याद्वारे मैत्रीच्या ह्या वर्षातील (२०२१) उपक्रमांविषयक माहिती आणि आवाहन एकाच ठिकाणी संकलित करण्याचा मानस आहे.

ये दुख काहे खतम नही होता बे?

Submitted by सिम्बा on 30 July, 2020 - 06:03

लॉकडाऊन जाहीर झाला, रांगा लावून लावून खरेदी झाली, FB वर चॅलेंज रंगले, आपण मध्यमवर्गीय आपापल्या परिघात सुरक्षित होतो, जॉब चे काही वरखाली होईल का? , दूर असणाऱ्या प्रियजनांची तब्येत ठीक असेल ना? असे काही भुंगे सोडल्यास तसा बहुतेकांचा लॉक डाऊन सुरळीत पार पडला.

शब्दखुणा: 

शुभंकराविषयी सर्वकाही - डॉ. अमित करकरे यांनी शुभंकरांशी केलेले जिव्हाळ्याचे हितगुज

Submitted by अतुल ठाकुर on 9 June, 2020 - 04:10

CIUD557Q_400x400_0.jpg

शब्दखुणा: 

अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे- अनिल अवचट

Submitted by प्रकाश घाटपांडे on 19 April, 2020 - 02:16

'अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे'
अनिल अवचट

चला आपण यांना मदत करूया.

Submitted by हर्पेन on 13 April, 2020 - 07:40

मैत्रीचा लढा करोनाशी

टाळेबंदीच्या परिस्थितीमुळे अनेक जणांचा रोजगार बुडतोय, आणि ज्यांचे हातावर पोट आहे अशा अनेक जणांना उपाशी दिवस काढावे लागत आहेत.

मैत्रीचे सांगोल्याचे मित्र शाम पवार अशा अनेक कुटूंबांच्या संपर्कात आहेत.

आवाहन क्र. १

राजस्थान, डोह येथील रहिवासी असून एकूण 57 लोकांचा कबिला आहे यामध्‍ये 13 कुटुंबीय, ज्यामधे पंधरा मुली आणि 17 मुले आहेत, डोंबारी काम व औषध विक्री हा त्यांचा व्यवसाय आहे. जत शहराच्या बाहेर चार किलोमीटरवर पाल टाकले आहे. अजून यांना कसलीही मदत मिळाली नाही.

आवाहन क्र. २

सामाजिक उपक्रम वर्ष ११ वे आवाहन धागा

Submitted by कविन on 8 March, 2020 - 14:49

सामाजिक उपक्रमाचे हे आपले ११ वे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली १० वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.

मैत्री उपक्रम माहिती आणि आवाहन - २०२०

Submitted by हर्पेन on 17 February, 2020 - 07:06

मैत्री स्वतःशी, मैत्री सर्वांशी.

'मैत्री' ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था मेळघाटातील अगदी दूरच्या गावांमधे आरोग्य , शिक्षण व शेती या करता काम करते. स्वयंसेवी माध्यमातून गेली अनेक वर्षे सरकारी मदत न घेता आपले काम सुरू आहे. प्रत्येक माणसाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि उर्मी असते यावर आमचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि संधी उपलब्ध करून देणे आम्ही आनंदाने करतो.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - सेवाभावी संस्था