गोठा

बब्या

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 May, 2018 - 14:15

बब्या
आज अचानक सामानाची आवराआवर करताना माझा एक लहानपणीचा जुना फाटका निळा शर्ट पत्नीच्या हाती लागला . काही जुन्या रोजनिश्या आणि हा शर्ट एका ट्रंकेत तिला मिळाला .

पत्नी म्हणाली " हे काय आठवणीत चिंध्या पण " .
मी म्हणालो " जीर्ण आठवणी सुध्दा मनाला तजेला देतात . "
जीर्ण वाडा किंवा किल्ला आपलीच कहाणी आपल्यालाच कथन करतो आणि हरवतो गत काळच्या भल्याबुर्या आठवात. मनाची भटकंती अगदी लहानपणी जत्रेत पाहिलेल्या जादुई सिनेमा पेटीसारखी .
आपलाच जीवनपट आपल्यासमोर उलगडू लागतो .

शब्दखुणा: 

ताण - तणाव (टेंशन) – एक बोधकथा

Submitted by प्रमोद् ताम्बे on 20 April, 2014 - 05:05

ताण (टेंशन) – एक बोधकथा
Tension.jpg
बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेकर्यााला घरकामासाठी, गोठ्यातील कामासाठी व गुरांची राखण करण्यासाठी एक नोकर हवा होता.
एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला व त्याने त्याच्याकडे नोकरीची याचना केली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले.
मुलगा म्हणाला, "वादळीवार्‍यासह गडगडाटी धुवांधार पाऊस पडत असताना व वीजांचा कडकडाट होत असतांनाही मी रात्री शांतपणे गाढ झोपू शकतो !'

Subscribe to RSS - गोठा