अभिषेक

विषय क्रमांक २ - आदूस ...

Submitted by तुमचा अभिषेक on 5 July, 2014 - 04:53

तुला म्हणून सांगतो बे आभ्याs, या दारूच्या व्यसनात दोनच स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये आपण दारू पितो, तर दुसर्‍या स्टेजमध्ये दारू आपल्याला. या आदूची पहिली स्टेज तर केव्हाच पार झालीये. आता हि दुसरी कुठवर नेते हे बघायचय." .. कालपरवाच बोलल्यासारखे आदूचे हे शब्द कानात घोळत होते, अन इतक्यात दादरावरचा कोलाहल अचानक शांत झाला. कल्पना असूनही काळजात धस्स झाले. पाहिले तर चार टाळकी आदूच्या घराबाहेर जमताना दिसली. मी काय ते समजून चुकलो. आदू दुसरी स्टेज ओलांडून तिसर्‍या स्टेजला गेला होता. कधीही न परतण्यासाठी, कायमचाच!

*****

आदूस ! एकेकाळचा आमचा आदू मामा ..

विषय: 

विषय क्रमांक २ - "ती" दोघं

Submitted by तुमचा अभिषेक on 29 June, 2014 - 02:47

महाबळेश्वर प्राईड हॉटेलच्या काऊंटरपाशी घुटमळताना ती मला पहिल्यांदा दिसली. तेव्हा तिचा "तो" तिच्या बरोबर नव्हता. जर हि आमची पहिलीच भेट नसती तर मला नक्कीच आश्चर्य वाटले असते की तिला एकटीला सोडून तो गेलाच कसा. पण त्या क्षणी तरी ती एकटीच तिथे चुळबुळ करत उभी होती.

विषय: 

चॉकलेट डे .. खळ्ळं फट्ट्याक !

Submitted by तुमचा अभिषेक on 21 May, 2014 - 09:32

आयुष्याने दिलेल्या पचपचीत अनुभवांमध्ये मीठमसाला टाकून त्या किस्सेकहाण्या लोकांना सुनवतोय ! हसतोय आणि हसवतोय ! येण्यार्‍या आयुष्यात काही तरी सुरस आणि चमत्कारीक घडेल, बस्स या आशेवर जगतोय ! पण आज मात्र मी जे सांगायला जाणार आहे त्यात असत्याचा अंश कणभर सुद्धा असणार नाही. जेवढे पिळाल तेवढी त्यातून सत्याचीच धार बाहेर निघेल. आयुष्याने दिलेला एक अनुभव जसाच्या तसा मी आज तुमच्याबरोबर शेअर करायला जात आहे... का? ते मला स्वतालाही ठाऊक नाही...

तर हि गोष्ट आहे इसवीसन ..,,.. चला राहूद्या थेट प्रसंगावरच नेतो

**********************************************************

विषय: 

पाककृती - रावडाचिवडा (पाककौशल्यात "ढ" असलेल्यांसाठी)

Submitted by तुमचा अभिषेक on 11 May, 2014 - 04:45

शीर्षकावरून समजले असेलच की हि पाकृ केवळ आणि केवळ जेवण बनवण्याच्या कौशल्यात निपुण नसलेल्यांसाठी आणि काहीही पचवण्याच्या कौशल्यात पारंगत असलेल्यांसाठीच आहे.

विषय: 

ए टी एम मशीन !

Submitted by तुमचा अभिषेक on 4 April, 2014 - 13:04

माणसाची किंमत जिथे पैश्यात मोजली जाते तो हा जमाना. तिथे एटीएम मशीन म्हणजे वजन काटा. त्यातून खडखड आवाज करत बाहेर पडणार्‍या कोर्‍या करकरीत नोटा तुमचे आजचे वजन. पाठोपाठ तुमची समाजातील पत लिहून येणारी बॅंकबॅलन्स स्लीप. आठ हजार रुपये मी काढले होते आणि शिल्लक जमा तिच्यावर दाखवत होती तब्बल चार लाख, चौसष्ट हजार, आठशे सतरा रुपये. आजची तारीख तेवीस. पगाराला आठवडा बाकी. तो झाला की हा आकडा सव्वापाचच्या घरात. महिन्याभरात मोठा खर्च न आल्यास पुढच्या महिन्याअखेरीस मी पाच लाखाच्या क्लबमध्ये हक्काने विराजमान होणार होतो. हा हिशोब लावतच मी बाहेर पडलो तर समोर तोच तो मगासचा रखवालदार.

विषय: 

सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय !

Submitted by तुमचा अभिषेक on 23 March, 2014 - 04:52

शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती.

विषय: 
शब्दखुणा: 

मॉर्निंग वॉल्क ! माझगावचा डोंगर !!

Submitted by तुमचा अभिषेक on 16 February, 2014 - 12:23

आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्‍यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले.

ड्रिमगर्ल !

Submitted by तुमचा अभिषेक on 21 January, 2014 - 12:11

गेले तीन दिवस ती ऑफिसला आली नाही. अन आज चौथ्या दिवशी जाणवू लागले की काहीतरी चुकतेयं. पाणवठ्यावर बाटली भरायला जाताना वाटेतले एक प्रेक्षणीय स्थळ नाहिसे झालेय. त्यामुळे बाटली पाण्याने पुर्ण भरली तरी तहान भागेनाशी झालीय. आज मला समजले की तिला तिथे बसलेले बघण्याची मला सवयच लागली होती. वाढलेली तहान आणि बाटलीचा छोटा होत जाणारा आकार याला तीच जबाबदार होती. जरी तिने ती घेतली नाही तरी तीच होती. तिने मात्र कधीही मान वर करून समोरून कोण जातेय ते पाहिले नसावे. मग आमच्याकडे बघण्याचा योग तरी कुठून यावा. कदाचित येणारा जाणारा प्रत्येक जण आपल्याकडेच नजर टाकत जातो याची तिला जाणीव असावी.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अभिषेक