मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
वादळ
तुझी आठवण
मनाच्या फांदीवर आलं तुझ्या विचारांचं पान
माझ्या नकळत त्याचं झालं घनदाट रान
कसं थांबवू तुझ्या आठवणींचं हे वारं
एक छोटीशी झुळूक तरी सैरावैरा सारं
झालं सुरु हे वादळ, आता ह्याला नाही थारा
डोळा पावसाची साद, हा नेहेमीचा इशारा
काही खोल जखमा वरच्या वर जगायच्या
काही तरल वेदना पुन्हा पुन्हा भोगायच्या
कधीतरी हा चंद्र जाईलच ढगांच्या मागे
सुटतीलच कधीतरी हे गुंतलेले धागे
कधीतरी ओसरेल हा मोगऱ्याचा वास
तेंव्हातरी घेता येईल मला मोकळा श्वास
तोपर्यंत मला ह्या चंद्रप्रकाशात भिजू दे
तोपर्यंत मला ह्या फुलांजवळ निजू दे
जन्म ताऱ्याचा
ताण - तणाव (टेंशन) – एक बोधकथा
ताण (टेंशन) – एक बोधकथा
बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेकर्यााला घरकामासाठी, गोठ्यातील कामासाठी व गुरांची राखण करण्यासाठी एक नोकर हवा होता.
एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला व त्याने त्याच्याकडे नोकरीची याचना केली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले.
मुलगा म्हणाला, "वादळीवार्यासह गडगडाटी धुवांधार पाऊस पडत असताना व वीजांचा कडकडाट होत असतांनाही मी रात्री शांतपणे गाढ झोपू शकतो !'
येती संत अॅना / आमुच्या पॅसॅडेना
पॅसॅडेना म्हणजे crown of the valley. आपल्या नावाला जागणारे हे टुमदार शहर वसले आहे संत मारीनो या गर्भश्रिमंताच्या खेड्याच्या उत्तरेला व संत गॅब्रीआल पर्वतरांगेच्या पायथ्याशी (विश्वाचा पसारा वाढवणाऱ्या हबलच्या शोधाची दुर्बीण असलेल्या माऊंट विल्सन फेम).
शल्य..
हुंदके गिळूनी टाळतो
आता शल्य हे मनीचे,
पार भेटता अडवळणी,
घेई झोके आठवणींचे
कोसळताच सरी बेभान,
उडते छप्पर ओसरीचे,
आसर्याला थारा देण्या,
थरथरते पान आभाळाचे
दुर भेटता क्षितीज मग,
पाऊलवाट सोडून जाते,
खुणा झाकण्यास सार्या,
समई विझूनी रात्र होते..
काळाची हि रित अघोरी?
भावना सार्या गोठवते,
क्षणांची फुले वेचण्याआधी,
अंगणी वादळ ऐसे का भेटते?
- सूर्यकिरण
वादळवेडी
ही कविता २००२ च्या माबो गणेशोत्सवाच्या कवितास्पर्धेसाठी लिहिली होती. मग अचानक आम्हा तिघांवरच परीक्षकपदाची जबाबदारी आल्यामुळे आमच्या तिघांच्या कविता डिबार झाल्या. त्यातली ही माझी. आतल्यासहित माणूस या प्रयोगात ही कविता होती. पेशव्याची 'प्रिय' ही कविता आणि माझी 'वादळवेडी' अश्या दोन्ही कविता एकत्र गुंफून तो बीट तयार केला होता. 'प्रिय' ने सुरूवात व्हायची मग 'वादळवेडी'चा पहिला भाग मग परत 'प्रिय' चा उरलेला भाग आणि 'वादळवेडी'च्या पुढच्या भागाने शेवट. रंगमंचावर १० एक मीटरचं गुलबक्षी रंगावर सोनेरी अक्षरं असलेलं पत्र अनफोल्ड होत जायचं आणि दुसर्या विंगेत ते विरून जायचं.
मौनाचं वादळ
काहीतरी खुपतंय, सलतंय आत
कुठंतरी खोलवर दुखतंय आज
उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
जयश्री अंबासकर
