वर्षाविहार २०१७

Submitted by ववि_संयोजक on 27 June, 2017 - 10:31

GST AD1.jpgपरवा पावसाने
मला रस्त्यातच गाठलं
वविच्या आठवणीने त्याच्या
डोळ्यात, पाणी की हो दाटलं

सांग माबोकरांना
आलोय मी देशात
गटग करुया मिळून
लोणावळ्याच्या घाटात

मलाही व्हायचंय चार्ज
करायचेय मजा मस्ती
बघायच्यात माबोवरच्या
आयडी मागच्या हस्ती

मग काय म्हणता लोकहो? पावसाला निराश नको ना करायला? जायचं का मग लोणावळ्याला? कधी? कसं?
ते सगळं उलगडायलाच आलोय हा पावसाचा संदेश घेऊन...

समस्त मायबोलीकरांसाठी घेऊन आलो आहोत 'वर्षाविहार २०१७'!
मायबोली ही आजपर्यंत हजारो मायबोलीकरांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाली आहे. मायबोलीवरचे लेखन, इतर अनेक उपक्रम, चर्चा, गप्पा, चेष्टा-मस्करी, विनोद (आणि येथेच झडणारी तात्विक चर्चावादळे वा मतभेद) यांबद्दल मायबोलीच्या सभासदांचे कुटुंबिय रोज काहीतरी ऐकत असतातच. मायबोलीच्या वर्षाविहार उपक्रमाद्वारे त्यांनाही ती खमंग चर्चा, धमाल-मस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळते आणि तीही इतर मायबोलीकरांसोबत!
वर्षाविहाराचे (ववि) निमित्त साधून आंतरजालाच्या या आभासी जगातील अनेक आभासी आयडीज् प्रत्यक्ष रूपात एकत्र येतात, नव्या ओळखी होतात, जुन्या ओळखींचे पुनरुज्जीवन होते, काही ओळखी मैत्रीत बदलतात तर आपल्या नित्य परिचयाच्या असलेल्या मायबोलीकरांचीही एक वेगळी ओळख होते. नेहमीचे वाद, स्पर्धा, समज-गैरसमज, मतभेद इत्यादी बाजूला सारून नवीन ओळखी होतात व नवे मैत्र जुळते.
यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे रविवार, ३० जुलै २०१७ या दिवशी, "United -21 Hotels & Resorts, Lonavala" च्या साथीने. पाऊस तर दरवर्षीचा सांगाती आहेच!

United -21 Hotels & Resorts, Lonavala ची थोडक्यात माहीती:
http://www.united21retreatlonavala.com/
अंतर - पुण्यापासून ६० किमी. मुंबई पासून १०० किमी.
* स्वच्छ आणि देखभाल केलेला परिसर
* पार्किंग साठी पुरेशी जागा
* थोडेफार अ‍ॅड्व्हेंचर गेम्स
* दोन - तीन प्रकारच्या वॉटर स्लाईड्स
* लहानग्यांकरता वेगळा पूल
* वेव्ह पूल
* सांस कार्यक्रमांसाठी वेगळा हॉल
* नेहेमीप्रमाणेच उत्तम भोजन व्यवस्था
मंडळी, हा दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणे गरजेचे आहे.
त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्यांची नावनोंदणी.
वविला रजिस्टर्ड मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/ पत्नी/ मुले/ आई - वडील) येऊ शकतात. आपले इतर नातेवाईक/ मित्र-मैत्रिणी यांनाही वविला यायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे मायबोलीचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी mbvavi2017@gmail.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.

नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती ई-मेलमध्ये देणे आवश्यक आहे.
१. नोंदणी करणार्याचे पूर्ण नाव
२. मायबोलीचा युजर आयडी
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (शक्यतो भ्रमणध्वनी क्रमांक)
४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला इमेल पत्ता
६. सहभागी होणार्या एकूण व्यक्तींची संख्या, स्त्री, पुरुष, त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांचे वय
७. लहान मुले (वय १२ वर्षांखालील) असल्यास त्यांचे पूर्ण नाव आणि वय
८. मायबोली ग्रुपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. बरोबर असलेल्या लहान मुलाला/ मुलांना बसमध्ये स्वतंत्र सीट हवी आहे का?
१०. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनला‌ईन?
११. वविला काढण्यात येणार्या छायाचित्रासंदर्भात खाली इंग्रजीत दिलेले डिस्क्लेमर वाचा आणि तुम्हाला कोणता पर्याय हवा आहे तो इथे द्या.
१२. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर + नाव
- नावनोंदणीची अंतिम तारीख आहे शनिवार, २२ जुलै २०१७
- नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.

वर्षाविहार २०१७ ची वर्गणी खाली दिल्याप्रमाणे आहे :
मुंबईसाठी
प्रौढ : रु. ११५०/- प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ९००/-, बस : रु. २५०/-)
पुण्यासाठी
प्रौढ : रु. ११५०/- प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु ९००/-, बस : रु. २५०/-)
मुले
उंची तीन फुटापेक्षा कमी : काहीही चार्जेस नाहीत
उंची तीन फुटापेक्षा जास्त पण वय बारापेक्षा कमी : रु. ८००/-
उंची तीन फुटांपेक्षा आणि वय बारापेक्षा जास्त : रु. ९००/-
या व्यतिरिक्त बसमध्ये बसायला स्वतंत्र जागा हवी असल्यास बसचे वर दिल्याप्रमाणे मुंबईसाठी रु. २५०/- आणि पुण्यासाठी रु. २५०/-
- रिसॉर्ट च्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा/ स्नॅक्स यांचा समावेश आहे.
- वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ५० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या कमी झाली तर प्रवास खर्च कदाचित जास्त येऊ शकेल.

- पुणे आणि मुंबई इथे रविवार, २३ जुलै २०१७ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.
- पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: संध्याकाळी ५.०० ते ७.००
- मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: संध्याकाळी ५.०० ते ७.००
- समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केले तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
- स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
- ऑनला‌ईन पैसे भरणार्यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ई-मेलने कळविली जाईल. जे बँक डिटेल्स ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दिले जातील, त्या अकाऊंटमध्ये कॅश डिपॉझिट करु नका.
- ऑनलाईन पैसे भरण्याकरता २३ जुलै २०१७ या तारखेपर्यंत वाट पाहायची गरज नाही.
- प्रत्यक्ष पैसे भरणार्यांपैकी कोणाला पैसे भरायला येणे शक्य नसेल तर त्यांनी आधीच संयोजकांशी संपर्क साधून तसे बोलून घ्यावे.
- मुंब‌ई आणि पुणे सोडून इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

वर्षाविहार २०१७ संयोजन समिती :
पुणे -
योगेश कुळकर्णी (योकु) (भ्रमणध्वनी ९९३००५६९६३)
दिप्ती जोशी (दक्षिणा) (भ्रमणध्वनी ९०७५०९७३१६)
मल्लीनाथ करकंटी
विवेक देसाई
मुंबई -
निलेश वेदक (नील) (भ्रमणध्वनी ८१०८९३७७६४)
कविता नवरे (कविन) (भ्रमणध्वनी ९०२९४७१२३५)
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) (९७६९४५४४२९)
मुग्धा कुळकर्णी (मुग्धानंद)
मिनल गोडबोले (मिनू)
संदीप खांबेटे (घारूअण्णा)
अमित देसाई (बागुलबुवा)

-http://www.united21retreatlonavala.com/ या दुव्यावर United -21 Hotels & Resorts, Lonavala बद्दल अधिक माहिती मिळू शकेल.
- आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा mbvavi2017@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.

वविची रुपरेषा साधारण अशी असेल...
सकाळी ९.०० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी
१०.०० ते १०.३० कपडे बदलणे
१०.३० ते १२.३० पाण्यात खेळणे!
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३० - ४.३० मनोरंजन, सांस कार्यक्रम
५.०० वाजता चहा
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्या बसमधून प्रयाण.
तेव्हा, भेटू या २०१७च्या वविला!

- वविचे अंतीम बस मार्ग सोमवार, २४ जुलै २०१७ या तारखेनंतर स्वतंत्र धाग्यावर देण्यात येतील.

सूचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/ नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील). पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही.

मायबोलीकरांनो हा सोहळा चुकवू नका, मुंबई पुण्याचे मायबोलीकर एकत्र भेटण्याचे हमखास ठिकाण म्हणजेच वर्षा विहार...!
================================================
Disclaimer:-
Let us respect everyone (both female and male members) who may or may not like their picture posted here or anywhere. The same rule applied to picture sent through email , as once it is sent there is no control anyway who sees it.
For those of us who do not want their picture posted, please write here your wish.
A) I do not want my pictures to be posted at all
B) I don't mind my pictures posted only after my approval. So send pictures only to me, and I will post it myself if I choose.
C) I don't mind my pictures to be posted at all,(No prior permission required) but if I don't like one, please respect my wish take it down
D) Post only the big group picture of me (with everyone)
Everyone, Please respect these wishes. And maayboli administration is committed to respect this for everyone to communicate to us.
In the Hindsight , this should have been announced before the start of VAVI, but we learned and we want to acknowledge. Better late than never. Thank you for your support.
Writing this from Organizers point of view too.
1. It is very difficult for organizers to police this. All of them are very busy organizing the event and if they keep focusing on this, the event won't happen. So it is responsibility of all people to present and respect their wish. The question everyone should ask, if this was a picture of my mother, father, brother, sister, daughter, son, wife, husband do I feel comfortable posting this.
2. Organizers can understand the objection if the picture was taken without permission of the person. But if the person has specifically posed for picture (e.g group photo) to be taken, it is difficult to understand the reason why you don't want to be in the picture now. It also applies to photos of 3-4 people specifically posing to get their picture taken. Once you are in a group picture, it is very impossible for organizers to prevent its spread. Even if it is not posted here, it still spreads (without anyone's knowledge) from people to people through emails. So preventing posting of a group picture on the public forum gives only a false sense of security.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Yey!!!

चांगले ठिकाण
रेल्वे स्थान का पासून चालत जाता येईल

मजा करा .मी त्या काळात घाटमाथ्यावर ट्रेकींग ला चाललो आहे.नायतर मी आलो असतो .

ज्यानी नाव नोंदवले आहे ते इथे लिहूया का ? म्हणजे इतरानाही उत्साह येईल कदाचित Happy

१. दक्षिणा
२. केदार , कविता ,ओवी
३. अतुल पटवर्धन

Pages