पहीला पाऊस-एक आठवण

Submitted by र।हुल on 8 June, 2017 - 16:34

"लगी आज सावन की फिर वो झड़ी है।
वही आग सीने में फिर जल पड़ी है।

कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे।
चमन में नहीं फूल दिल में खिले थे।

वही तो है मौसम मगर रुत नहीं वो..
मेरे साथ बरसात भी रो पड़ी है।"

दरवेळेस पाऊस येतो आठवणी घेऊन तिच्या सोबतीच्या. मनांत फुलवतो पुन्हा एक नाजूकसा धागा प्रितीचा..कुठं असेल बरं ती आज? तिलाही येत असेल का आठवण माझ्यासारखीच?.कदाचित..

पहिला पाऊस तिच्या सोबतीतला! कामानिमित्त आपापल्या घरापासून, गावापासून लांबवर असलेलं दोघांचं वास्तव्य..मग सहज म्हणून झालेली ओळख आणि पुढं जाऊन बहरलेली मैत्री..त्यातून फुललेलं अव्यक्त प्रेम.. त्याचाच एक सुंदर प्रवास..कधी हसवतो कधी रडवतो..

हातात हात गुंफून निर्वेध भटकताना पहील्या पावसात आणि पहील्यांदाच चिंब भिजलेलो आम्ही दोघंच! तिचं ते बघतच रहावं असलं मुर्तीमंत ओलेतं सौंदर्य. गालातल्या गालांत हसत एकदुसर्यांकडे बघताना दोघांच्याही मनांत फुललेल्या त्या नाजूक 'कोमल' भावना..तिच्या डोक्यावरून खांद्यावर निथळणार्या पाण्याचे नितळ थेंब आणि केसांवरती वरतून पडलेल्या पाण्यामुळे तयार झालेले सप्तरंगी तुषार कसे आजही डोळ्यांसमोर नाचतात! सोबतीला अंगावर शहारा आणणारा थंडगार वारा आणि त्यामुळे हवाहवासा वाटणारा सहवास आमच्यातील प्रेमबंध आणखी दृढ करत होता. चिखलात पाय घसरून पडायला लागलेली ती..आणि तिला सावरायला मी पुढं केलेला माझा हात आपल्या हातात घेताना तिच्या चेहर्यावर आविष्कारलेली स्त्रीसुलभ ऋजुता आणि त्यामुळे तिनं खाली झुकविलेल्या तीच्या नाजूक पापण्या कसलं वेड लावून गेल्या! एरवी बरोबर असताना अखंडपणे नुसती बडबड करणारी ती पावसात भिजत हिंडताना मात्र काहीसं अबोल झालेली अशा स्थितीत मुद्दामहून एकदुसर्यांकडं टाकले जाणारे मोहक चोरटे कटाक्ष आणि त्यामुळं दोघांच्याही चेहर्यांवर फुलणारं अकारण हसू आमच्यामधील अनामिक असल्या नात्याची विण आणखीनच घट्ट करत होतं. कितीतरी वेळ आम्ही दोघं त्या पहिल्यावाहिल्या पावसात दिशाहीन भटकत होतो..अगदीच निर्विकारपणे!

आता आहेत फक्त बेचैन करणाऱ्या काही आठवणी. मी अजूनही तिची वाट बघतोय. ती येईल कारण माझा तिच्या शब्दांवर आजही विश्वास आहे. तीनं म्हटलं होतं, "मी फक्त तुझीच आहे; वाट बघ मी नक्की परतून येईन."

―₹!हुल ३१मे १७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

chan...

वा:!! मस्तं लिहिलंय. लेखनातून प्रसंग अगदी सुंदर डोळ्यांपुढे उभा केलात. असं वाटलं तुमच्या भेटीचे आम्हीसुद्धा साक्षीदार आहोत. आपली प्रतीक्षा लवकर संपावी ही इच्छा!

सुंदर लिखाण, अलंकारीक शब्द वापरून सुद्धा लेख उगिचच शब्दबंबाळ वाटला नाही.
गोड वाटला वाचताना. मला खात्री आहे की प्रत्येकाने हा लेख स्वतःशी पडताळून पाहिला असेल.

धन्यवाद! Happy
असं वाटलं तुमच्या भेटीचे आम्हीसुद्धा साक्षीदार आहोत. ―Submitted by सचिन काळे & सुंदर लिखाण, अलंकारीक शब्द वापरून सुद्धा लेख उगिचच शब्दबंबाळ वाटला नाही.
गोड वाटला वाचताना. मला खात्री आहे की प्रत्येकाने हा लेख स्वतःशी पडताळून पाहिला असेल. ― Submitted by दक्षिणा
...
असं जर होत असेल तर नक्कीच मी लिहिण्याचा चांगला प्रयत्न करतो आहे. Happy

अहाहा ! काय लिहिलं भाऊ. चलो गले मिलो.

क्या बात है.... चांगलं लिहिलंय.. गाणं पण भारी आठवलं. हे गाणं, थेट भिडतं. बाकी, सालं ज्यानं प्रेम केलं आणि आपल्या प्रेयसीला घेऊन तो जर पावसात भिजला नसेल तर अशा प्रियकर आणि प्रेयसींना पोकळ बांबूनं भर पावसात धु धु धुतलं पाहिजे. असं माझं पाऊस मत आहे.


पहील्यांदाच चिंब भिजलेलो आम्ही दोघंच! तिचं ते बघतच रहावं असलं मुर्तीमंत ओलेतं सौंदर्य. गालातल्या गालांत हसत एकदुसर्यांकडे बघताना दोघांच्याही मनांत फुललेल्या त्या नाजूक 'कोमल' भावना..तिच्या डोक्यावरून खांद्यावर निथळणार्या पाण्याचे नितळ थेंब आणि केसांवरती वरतून पडलेल्या पाण्यामुळे तयार झालेले सप्तरंगी तुषार

अहाहा ! कसंला रोमँटीक पाऊस सुरु आहे तुमच्या लेखनात. इथून पुढे अजून काही खास ' पावसाळी' आठवणी पाहिजे होत्या राव. चुंबन बिंबन. घट्ट मिठी-बिठी. प्रेम आणि त्यातल्या भावना शुद्ध असतात. बाकी या गोष्टीही तितक्याच शुद्ध असतात. कारण आपण जे काय वागतो ते चुक - बीक काय नसतं. बस तुझ्या ओंजळीने मला दे आणि माझ्या ओंजळीने तू घे.... अजून तिचं बाईकवर घट्ट बिलगून बसणं इत्यादि. तिच्या आठवणी झड लागलेल्या पावसा सारख्या आणि तो पाऊस कसा मुक्कामी आलेला. मग तर मेलात तुम्ही. बाकी, आठवणींचा पाऊस आयुष्यभर पुरतो. आपल्याला ...भिजा आता, सॉरी भोगा आता.

आणि ती बोलली ना येईल म्हणुन....मग नक्की येईल. अहो, लै मजबुर्‍या असतात विवाहितांच्या . आपल्या पोरांचं काम आहे वाट पाहणं. पोरी कधी वेळेवर पोहोचल्यात का ? त्याही पावसासारख्या कुठे बुरबुर, तर कुठे धो धो...तर कुठे वाट बघायला लावतात.

कोणी तरी म्हटलं आहे -

कुछ अहसास तो बाबस्ता रहने दो,
दिल के कोने मे ही सही, जुस्तजु रहने दो...!

-दिलीप बिरूटे
( पाऊस वेडा)

धन्यवाद डॉ. Happy
अहाहा ! कसंला रोमँटीक पाऊस सुरु आहे तुमच्या लेखनात. इथून पुढे अजून काही खास ' पावसाळी' आठवणी पाहिजे होत्या राव. चुंबन बिंबन. घट्ट मिठी-बिठी. प्रेम आणि त्यातल्या भावना शुद्ध असतात. बाकी या गोष्टीही तितक्याच शुद्ध असतात. कारण आपण जे काय वागतो ते चुक - बीक काय नसतं. बस तुझ्या ओंजळीने मला दे आणि माझ्या ओंजळीने तू घे.... अजून तिचं बाईकवर घट्ट बिलगून बसणं इत्यादि.
भावना पोहोचल्या आणि शेवटच्या लाइन्स सुद्धा आवडल्या. Happy