धो धो पावसात रान
तग धरुन उभं ठाकलं
पीकाला म्हणालं भिऊ नको
पडू देणार नाय एकलं
पीकही घट्ट बिलगलं रानाला
पण तिरीमिरीत एखाद्याला
विनाकारण ठोकावं अगदी तसच
ढगानं झोड झोड झोडलं रानाला
एरवी ढग सबागतीनं
रानाची विचारपूस करायचे
हळुवार सोसेल तेवढंच
पाणी बरसायचे
जेव्हा वाहला झाड झाडोरा
रानाचा पाय झाला कापरा
रान बिलगले तालिला
पण निसटला दरडीचा कोपरा
रानही पुरात गेलं वाहत
त्याचं काहीच नव्हत चालत
याद फाटक्या धन्याची आली
टचकन रानाची पापणी गढूळली
चांदोमामाने ओढली छान ढगांची दुलई
घास भरवते बाळा, मग गाईन अंगाई
चिऊताई ही पिलांस चोची दाना भरवूनी
गोष्ट घरट्याची सांगे वर पंख पांघरूनी
मनीमाऊची ही बाळे दुध चुटुचुटु पिती
त्यांचे निळेशार डोळे हळूहळू पेंगुळती
उड्या मारून दमले शुभ्र वासरू गाईचे
दुध पिऊनच झोपे, ऐके आपुल्या आईचे
कसे बाबाही जेवती, त्यांना वाढे त्यांची माय
हात मऊसूत तिचा, जणू दुधावरली साय
तू ही ऐकतोस सारे, गुणी बाळ आहे माझे
संपवून भात सारा, येई पापण्यांवर ओझे
- रोहन
येताना ढग दाटून यावे तशी आलीस
जाताना धो धो पावसासारखी नाचून गेलीस
उदासीचे मळभ पांघरून येत जाऊ नकोस
आलीस तर संजीवनीचे कोंब
देऊन जात जाऊ नकोस
चितस्थधि
परवा एक माणूस ढग डोक्यावर घेऊन विकायला निघाला होता. मला बुकित बातोक MRT स्टेशन जवळ भेटला. '5 सेंटला एक कला ढग. कुठला हि घ्या' म्हणत त्याने ओझं खाली ठेवल.
छोटा ढग, मोठा ढग, काळा ढग, पंधरा ढग, बरेच ढग त्याने कच कचून बांधून ठेवले होते. त्यातूनच एक छोटासा ढग निसटू पाहत होता. वळवळून वळवळून त्याचे अंग सोलवटले होते. ढग पूर्ण काळा न्हवता... त्याची किनार काहीशी गुलाबी होती.
जूनच्या सुरवातीलाच भिमाशंकरला जाण्याचा योग आला. कित्येकदा ठरवूनही जाणे जमले नव्हते. अखेर अगदी दिड दिवसांसाठी जाता आले.
पुण्यातून निघालो तेव्हा ब-यापैकी ऊन होते परंतू वाटेत हवा बदलत गेली. मधूनच लांबवर ढगांनी दर्शन द्यायला सुरुवात केली.
वाटेतल्या या देवळाने मन वेढून घेतले. चालत्या गाडीतूनच क्लिक करण्याचा मोह आवरला नाही
परवा चेन्नईला उडत उडत जाताना दिसलेले हे मेघदूत ...
०१.
०२.
वाई येथे, गणपतीच्या देवळाकडून टिपलेला सुर्यास्तानंतरचा नजारा...
चराचराला पोटात थिजवून
हा राखाडी ढग स्थिर - नक्षीदार पेपरवेट सारखा.
आगगाडीच्या वाऱ्याने
नाईलाजाने अंग घुसळवणारी ही चिंब ताठर झुडुपं,
ढगाला बोचकारत.
तितक्याच स्तब्धपणे
हे न्याहाळणारी मागची झाडांची रांग
हिरव्या पानांवरची राखाडी बुरशी सोसत.
त्याहीमागची
डोळ्यांवर ढग ओढून निश्चल
ढगाच्या आरपार बघण्यातला फोलपणा जाणवून.
ढगाला थोपवण्यासाठी
जमून आलेलं नदीचं घट्ट पाणी,
पृष्ठभागावरचा दाब, सतत इकडून तिकडे सरकवत, पेलणारं.
चराचराला व्यापून
फक्त अवाढव्य श्यामल ढग आहे.
अवाढव्य श्यामल ढग - फक्त आहे.
सृष्टीने बहुधा
पावसालाच कलाकार केलं
दारावरच्या पागोळ्यात
माझं एकटेपण विरुन गेलं!
पुन्हा एकदा बालपण आलं
नकळत पावसात चिंब चिंब भिजणं झालं!
विजेच्या डोळ्यात माझा आनंद उतरला
ढगाने सुद्धा ढोल बडवला
पाऊस अखंड बरसत राहिला
माझ्या साथीने गातच गेला....!