धो धो पावसात रान
तग धरुन उभं ठाकलं
पीकाला म्हणालं भिऊ नको
पडू देणार नाय एकलं
पीकही घट्ट बिलगलं रानाला
पण तिरीमिरीत एखाद्याला
विनाकारण ठोकावं अगदी तसच
ढगानं झोड झोड झोडलं रानाला
एरवी ढग सबागतीनं
रानाची विचारपूस करायचे
हळुवार सोसेल तेवढंच
पाणी बरसायचे
जेव्हा वाहला झाड झाडोरा
रानाचा पाय झाला कापरा
रान बिलगले तालिला
पण निसटला दरडीचा कोपरा
रानही पुरात गेलं वाहत
त्याचं काहीच नव्हत चालत
याद फाटक्या धन्याची आली
टचकन रानाची पापणी गढूळली
आलं भराला भराला असं कवितेचं रान
कणसा कणसात भरलं सब्दाचं गं दाणं
सबूददाणा भरघोस असा भरला भरला
कागूद रानाचा लिवाया नाही पुरला पुरला
माझ्या अडाणी ववीचा हाय बाणा रांगडा
कव्हा मिरच्याचा तोडा, कव्हा रस ऊसाचा गोडा
तिचं रापल्यालं त्वांड पण मन हिरवंगार
पाटाच्या गं पाण्याला ओली मायेची धार
बोरीबाभळीचं काटं तिच्या पुजलं पाचवीला
दैवगतीचं फेरं नाही चुकलं गं रामाला
पानाफुलांनी सजला देह तिचा झिजलेला
हिरव्या बोलीचा सबूद रानोमाळ गुंजलेला
© दत्तात्रय साळुंके
कडक हिवाळ्यानंतर येणार वसंत ऋतू नेहमीच चैतन्य घेवून येतो. यावर्षी तर या चैतन्याची मनाला फारच गरज होती. सुदैवाने ही चैतन्याची उधळण शोधायला फार लांब जायचे नव्हते. आमच्या काउंटीतल्या निसर्गप्रेमी आणि उदार कुटुंबाच्या द्र्ष्टेपणामुळे ४८ एकराचे रान मौल्यवान निसर्गठेवा म्हणून जपले गेले आहे. दिड्शे वर्षांपेक्षाही जास्त काळ कसलीही मानवी ढवळाढवळ न झालेले रान - ओल्ड ग्रोथ फोरेस्ट . १८५७ मध्ये जॉन मेल्तझर यांनी शेती करण्यासाठी १६० एकराची जागा खरेदी केली. पुढे त्यात त्याच्या मुलाने आणि नातवाने भर घालून जागेची मालकी २८० एकरापर्यंत विस्तारली.
शोधायाला फूल सुगंधी गेलो होतो रानी
दगडावरती बसलेला तो दिसला डोडो ज्ञानी
मला पाहुनी हळूच हसला, "बैस इथे" वदला
आनंदाने मीही सादर वंदन केले त्याला.
(डोडोचा प्रश्न)
. . . "देशिल मजला उत्तर जर तू एका प्रश्नाचे,
. . . फूल सुगंधी देईन तुजला सुंदर रंगाचे.
. . . उंच फेकले फळ हे जरी मी, खाली ते येते,
. . . सांग मला तू झटकन आता, असे कसे ते होते ?"
(माझं उत्तर)
"नियम असती ठाऊक मजला सगळे न्यूटनचे,
गुरुत्वीय ते बल रे आहे कारण ह्यामागचे."
अचूक माझे उत्तर ऐकुनि प्रसन्न डोडो झाला,
झाडावरचे फूल सुगंधी मजला देता झाला...
. . . . . (डोडो हा मॉरिशसचा राष्ट्रीय पक्षी आहे.)
सर सर शिवार
हिरवं रान
भिजली जमिन
रानोमाळ
गंध पसरे
चोहिकडे
फिरत राही
काही वेडे
उनाड वारा
भरभरारा
कुठं राहिला
गांव माझा...!
गोदेय १६
अक्रेलिक. हे कागदावर काढलं आहे. मूळ आकार ९" बाय १२".

पावसांच्या सरी चालू झाल्या की निसर्ग आपली ही संपत्ती उधळायला सुरुवात करतो. त्या संपत्तीपैकीच ही काही रान फुले व झाडे. निसर्गाकडू आपल्याला ही संपत्ती विनामुल्य, विनाकष्ट मिळत असते. ही छोटी मोठी रानफुले, झाडे आपल्या नजरेला, मनाला अगदी गारवा देउन जातात. मनाचा, शरीराचा थकवा ह्यांच्या सहवासाने कुठे दुर पळतो त्याचा पत्ता लागत नाही. फक्त आपण त्यांच्याकडे डोळसपणे पाहील पाहीजे. निसर्गाने दिलेल्या ह्या संपत्तीची नजरेने लूट करुन पहा.
हे गोंडे नेहमीच कोणत्याही रानात, रस्त्यावर स्वागतासाठी ताठ सज्ज झालेले असतात.
