कला

पपेट्सच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 November, 2010 - 10:55

''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद!

शब्दखुणा: 

समीप रंगमंच - प्रयोग - २

Submitted by storvi on 21 October, 2010 - 01:12

ह्ल्ली अनेकदा मला आपण पुण्यात रहात असल्याचा भास होतो. पुणेकर कलेच्या बाबतीत जरा 'elitist' असतात, तसेच बे एरियातही आता आढळुन येतं. निव्व्ळ मनोरंजना पेक्षा विचारंना चालना देणार्‍या कलाकृती इथल्या रसिकांना जास्त प्रीय असतात. 'कला' च्या 'समीप रंगमंच' चा दुसरा प्रयोग त्याच पठडीतला.

समीप रंगमंच म्हणजे 'theater-in-a-room'. कमीतकमी props/नेपथ्य वापरुन नाटके सादर करायची. त्यामुळे यात मोठे सेट्स, मेकप वगैरे फार काही

नसतं. थोड्क्यात, मैफिल का अंदाज आणि नाटकाचा बाज. अशा वातावरणात गेल्या शनिवारी, 'छुनेसे प्यार बढता है' आणि 'स्वामी', समीप रंगमंच च्या उपक्रामात 'कला' ने सादर केल्या.

नळ :

Submitted by भूत on 9 October, 2010 - 03:21

काही काही लोक्कांना भांडायला फार आवडंत ( अन माझ्या सारख्या काहींचचा टाईम पास होतो म्हणुन मजा येते!!).

..कट्टा , गप्पागोष्टी , कुठे मिळेल तिथे जाउन भांडत बसतात !

काही काही तर अगदी एखादाच्या सुंदर लेखावरच्या प्रतिसादात जाउन भांडत बसतात ...

काही काही सभ्य लोक विपुत जाउन भांडतात .

आणि लोकांची शैली ही काय भन्नाट असते !! अगदी नळावर येवुन बायका भांडतात त्याची आठवण येते ....

त्या सार्‍यांसाठी ...इतरत्र घाण करु नका :राग:...हे घ्या नवीन व्यासपीठ :फिदी:!

" नळ : या भांडा "

विषय: 
प्रांत/गाव: 

किलबिल :- श्रेयानचा दगडुशेठ बाप्पा

Submitted by डॅफोडिल्स on 18 September, 2010 - 06:34

छोट्या मुर्तीकाराचे नाव : श्रेयान माळवदे.
वय : साडेपाच वर्षे
मुर्ती : खेळायच्या क्ले ने बनवली आहे.
आमची मदत : फक्त फोटो काढणे.
shrey_ganesh.jpg

आणि ही दगडूशेठ सारखी बप्पांची सोंड Happy
shrey_ganesh_sond.jpg

किलबिल : राहुलचा बाप्पा

Submitted by लालू on 13 September, 2010 - 22:39

नाव - राहुल
वय - साडेसात वर्षे

बाप्पाचे चित्र दुसरे चित्र पाहून काढले आहे. पेन्सिल आणि क्रेयॉन्सचा वापर केलाय. छोटा उंदीर, बाप्पाला वाहिलेली फुले आणि नैवेद्याचे लाडू (मोदक नव्हे) ताटात दिसत आहेत.
कार्य सिद्धीस नेण्यास मदत केल्याबद्दल बाप्पाचे आभार. Happy

zbappa_0.jpg

निकिताची चॉकलेट स्टोरी (माझा छंद, माझा व्यवसाय)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 September, 2010 - 09:45

''असावा सुंदर चॉकलेटचा बंगला'' असं स्वप्न लहानपणी सगळेच बघतात. पण त्यातली एखादीच निकिता असते, जी वयाच्या पंधराव्या वर्षापासून ह्या स्वप्नातल्या चॉकलेट्सना मूर्त स्वरूप देऊ लागते, छंद म्हणून चॉकलेट्स बनवता बनवता केवळ सतरा वर्षे वय असताना चॉकलेट्सचे आणि फक्त चॉकलेट्सचे दुकानही सुरू करते! ज्या वयात इतर मुले-मुली कॉलेजला बुट्ट्या मारून स्वच्छंद जगणे, पार्ट्या, मित्रमैत्रिणी यांच्यात मश्गुल असतात त्या वयात अवघ्या एकोणिसाव्या वर्षी निकिता आपल्या तिसऱ्या ''चॉकलेट स्टोरी''च्या दुकानाचे मोठ्या दिमाखात अनावरण करते!!

जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज - पं. शिवकुमार शर्मा / इना पुरी

Submitted by चिनूक्स on 1 September, 2010 - 08:35

एक लाकडी पेटी आणि काही तारा असं रूप असलेलं संतूर हे सुंदर वाद्य म्हणजे वैदिक काळापासून प्रचलित असलेल्या शततंत्री वीणेचं एक सुधारित रूप. हे वाद्य पर्शियातून आपल्याकडे आलं, असंही काहींचं मत आहे. तसं असलं तरी काश्मीरच्या खोर्‍यांत प्रचलित असलेल्या या संतूरचे सूर गेली अनेक शतकं लोकांना भुरळ घालत आले आहेत.

निसर्गचित्रे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

यंदाच्या उन्हाळ्यात अमेरिकेच्या दोन टोकांना असलेल्या दोन निसर्गरम्य राज्यांना भेट देण्याचा योग आला. तिथली ही काही निसर्गचित्रं.

Maui (Hawaii) - हालेकाला पर्वतशिखरावरून दिसणारा सूर्योदय
4. Maui - sunrise.jpg

Maui (Hawaii) - हालेकाला पर्वतशिखरावरून परत खाली उतरायला लागतानाचे दृश्य.
6. Maui - Clouds.jpg

Maui (Hawaii) - समुद्र

विषय: 
शब्दखुणा: 

मायबोली गणेशोत्सव २०१० स्पर्धा घोषणा

Submitted by संयोजक on 22 August, 2010 - 10:43

aikaGaneshDevaNew.jpgसांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा घोषणा:

मायबोली गणेशोत्सव २०१० घेऊन येत आहे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, श्राव्य कार्यक्रम आणि अवांतर बरेच काही.

ज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी जाहीर करत आहोत. तसेच लहान मुलांच्या कलागुणदर्शनाच्या तयारीस आवश्यक वेळ देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे नियम आधी जाहीर करत आहोत.

Pages

Subscribe to RSS - कला