इलॅस्टिक वापरलेला मास्क, सतत वापरून हळूहळू सैल होऊ लागतो, आणि नाडीवाला खाली घसरू नये म्हणून शिवताना जरा घट्ट शिवला, जास्त वेळ ठेवावा लागला तर नकोसा होतो म्हणून हा अजून एक प्रकार शिवून पहिला 'रुमाल मास्क'
साहित्य-
शिलाई मशीन, दोरा, कात्री, कापड
लेकीला नकोसा झालेला शर्ट वापरला आहे, मऊसूत कॉटन कापड आणि फिका रंग..अजून काय हवं!

मॅक्रमे म्हणजे दोरींच्या गाठी मारून त्यातून नक्षी निर्माण करणे. यंदाच्या गणपती उत्सवासाठी मी या कलेचा उपयोग करून बुकमार्क केला आहे. मॅक्रमे करण्याची ही माझी दुसरीच वेळ आहे आणि हे डिझाईनही जरा गुंतागुंतीचं आहे त्यामुळे अनेक तृटी असतीलच. पण ही कला गणरायाच्या चरणी अर्पण करण्याचं समाधानही आहे.
बुकमार्क संपूर्ण लांबी - १२ इंच, मधली आडवी नक्षीची पट्टी - ६ इंच, रुंदी - दीड इंच
क्र. १

घराला रन्ग द्यायच्या वेळेस नमुना म्हणुन आणलेल्या कलर कार्ड वर वारली आर्ट केल आहे.
.
|| श्री गणेशाय नम: ||
ब गट - मोठयांसाठी
हा मी बनवलेला ओरिगामी बुकमार्क. काल काही शोधाशोध करत असताना जुनी डायरी सापडली . ती चाळत असताना तिच्यात असलेले पेपर डिव्हायडर चांगलेच जाड आहेत अस लक्षात आलं आणि मायबोलीवरील बुकमार्क स्पर्धा आठवली.
हा ओरिगामी बुकमार्क पूर्णपणे त्या जाड कागदाचा बनवला असून बाकी सजावटीसाठी घरात असलेले रंगीत कागद आणि स्केचपेन वापरलेले आहेत . ह्या प्रकारच्या बुकमार्क्सना पेपर कॉर्नर बुकमार्क्स असेही म्हणतात .
हा ओरिगामी बुकमार्क
लॉकडाउनमधे सगळ बन्द असल्याने फॅमिली टाइममधे करायला आउटडोअर अशा वॉकिन्ग्,बायकिन्ग अशा लिमिटेड अॅक्तिव्हीटि उरलया आहेत तर आम्ही रोज वॉक करायला जात असताना पाइन कोन दिसायचे एरवी पण वासाला आणि दिसायला छान म्हणुन शॉप्स मधुन हौसेने आणले होते पण रोजच्या रुटला दिसणारे पाइन कोन न्याहाळायचा छन्दच लागला अस करता कारता रोज एखादा छानसा पाइन कोन जमा करायचा अस सुरु झाल
अस करत १-२ विक मधे बरेच जमा झाले.
काल रविवारी स्वीटकॉर्नचे कणीस सोलत असताना माझी लेक (वय वर्षे १८ महिने) एकदम excite होऊन म्हणाली. फ्लोक... फ्लोक (फ्रॉक).. आणि हट्ट धरून बसली की आताच्या आत्ता मला काणसाची डॉल बनवून पाहिजे.
मग काय जरा आयडियाची कल्पना लावली
मग कणीस उलवून एका पेल्यात उभं केलं. त्यावर डोकं म्हणून एक कांदा बसवला. काणसाचेच केस लावले. आणि दोन छोटे छोटे लवंगीचे डोळे.. कमरेला रिबीन डोक्यावर टोपी असा थाट केला..
आणि तयार झाली ही छोटीशी भावली..

एक दिवस इंटरनेटवर असेच काहीबाही करता करता मला ‘क़्विल्ट’ या प्रकारचा शोध लागला. सुरवातीला ‘हा सगळा अमेरिकेतल्या ज्येष्ठ बायकांचा प्रांत, आपल्याला काय त्याचं?’ असं म्हणत मी मनात निर्माण होणारी आवड दाबून टाकत होते, पण जसजसे क़्विल्टचे वेगवेगळे पॅटर्न माझ्यासमोर उलगडू लागले, तसतशी मी या नव्या कलाप्रकारच्या प्रेमात पडू लागले. क़्विल्ट विषयीच्या वेगवेगळ्या साईट बघताना माझ्या लक्षात आले की क़्विल्टचे इथे अमेरिकेत ठिकठिकाणी क्लासेस असतात, फक्त क़्विल्टचेच सामान मिळेल अशी खास दुकाने असतात, त्यांचे आंतरराज्यीय स्तरावर प्रदर्शन आणि स्पर्धा होतात, टीव्हीवर शोज असतात.
नमस्कार मायबोलिकर,
माझ्या पहिल्याच धाग्याला इतका छान प्रतिसाद मिळाला कि दुसरा धागा काढल्यावाचुन रहावेना.
पुन्हा एकदा सर्वान्चे आभार!!!
हि टोपी,

आणी हि टोपी घातलेली साची (माझी मुलगी)....

पेपर क्विलिंग बद्दल बरिच उत्सुकता होती. सहप्रवासी, ऑफिसमधल्या मैत्रिणी पेपर क्विलिंगचे दागिने घालीत तेव्हा तर पेपर क्विलिंग शिकायची फारच ओढ लागली.
मागचा आठवडा सुटी घेतली. काही घरगुती कामांमुळे माझा घरी बसून बैठा सत्याग्रह होता. सर्वात प्रथम पेपर क्विलिंगचे सामान आणले.... रंगीत पट्ट्या आणि सुई. मग गुगलून पाहिले, यु-ट्युबवर शिकवणी घेतली.
पहीला धडा गिरवला...


साधारण दोनेक वर्षांपूर्वी ही कल्पना मनात उगम पावली. आजूबाजूला अनेक मित्र मैत्रीणी छान छान कलापूर्ण आणि कौशल्यपूर्ण वस्तू करत असताना बघत होते. त्याचवेळी अशा वस्तूंना मागणीही खूप असते असं लक्षात आलं आणि मग यासाठी एक वेबसाईट सुरू करावी असा विचार डोक्यात घोळायला लागला. मग काही महिन्यांपूर्वी खरंच पावलं उचलली आणि आनंदाची बातमी ही की मी नुकतीच सर्व प्रकारच्या कला-कौशल्याच्या वस्तू विकण्यासाठी एक वेबसाईट सुरू केली आहे. www.skillproducts.com