अचानक भेटलेली कला, कल्पकता, सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28

आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.

तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्‍यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रान्समध्ये फिरत असताना अशा चिक्कार जागा दिसल्या. त्यातल्या काही :

हे नीसमधल्या ओल्ड टाउन मध्ये फिरताना एका रेस्टॉरंटच्या बाहेरचं म्युरल. टेबल, त्यावर चहाचा सरंजाम मांडलाय, बाजूला तीन पिवळ्या खुर्च्या आणि टेबलावर भलीमोठी फुलदाणी - फुलांसकट.

जवळून बघितलं तर थक्कच झाले. तुटलेल्या क्रोकरीचे तुकडे लावून केलेल्या कपबशा आणि किटली. काचांच्या तुकड्यांनी बनवलेली फुलदाणी आणि फुलं. त्यात एक लालबुंद नेकलेस. किती ती सौंदर्यदृष्टी.

याच छोट्याश्या रेस्टॉरंटच्या दाराच्या शेजारी हे एक सुरेख चित्रं होतं. खालच्या कुंडीचा आकार वगळता अगदी आपल्या वारली पेंटिंगची आठवण करून देणारं :

सुंदर.
अशी रंगीत दगडांच्या तूकड्यांनी मोठी मोठी चित्रे करायची कला युरपमधे प्राचीन आहे. मी ती चित्रे प्रत्यक्ष बघितली नाहीत, पण ओमानमधे, त्यांच्या सुलतानाचे त्या शैलीत काढलेले चित्र बघितले आहे.

कधी कधी तर भाजीवाल्याचे ढीगही सौंदर्यपूर्ण असतात. पेणच्या पुढे एका टोलनाक्यावर काही बायका कापलेली काकडी विकतात. त्यांच्याकडची काकडी फार सुबक आकारात कापलेली असते.

माझ्याकडे पण असे काही नमुने असतील.

हॉटेलच्या लिफ्टचा दरवाजा. तशी पाहिली तर किती दुर्लक्षित गोष्ट! पण नीसच्या हॉटेलात इथेही एका कलाकारानं आपली मोहोर उमटवली होती आणि एक सौंदर्याचं बेट तयार केलं होतं. स्टीलच्या दरवाज्यांवर वेगवान रेषांनी कोरून काढलेल्या आकृती. त्यातला वेग आपल्यापर्यंत सहज पोहोचतोय :

गोव्यात पण असले काही अस्सल नमुने आहेत कलाकुसरीचे..... आता सगळीकडे जाताना कॅमेरा फिरवला पाहिजे....... मस्त ग मामी....... सुपिक डोक्यातली सुपिक कल्पना Happy

मला आधी वाटलेलं की तुला भेटलेल्या एखाद्या "कला" नावाच्या व्यक्तीवर काही लिहिलेस की काय Happy

हो मामी, अशा कला भेटतात नेहमी आणि मी अधूनमधून माझ्या कॅमेर्‍यात साठवतेसुद्धा. आता सगळं कलेक्शन एकदम कुठल्याकुठल्या फोल्डरमध्ये दडलंय, ते एकदम आठवणार नाही. सध्या एक शेअर करते. अ‍ॅम्स्टरडॅमला गेले असतांना एका रेस्टॉरन्टच्या छतावर हे दिसलं... Happy अर्थातच खोटे मासे आहेत. बाकी तू शेअर केलेली 'कला'ही भारीच. Happy मी शेअर करतेय, त्यात हस्तकलेपेक्षा कल्पकता जाणवली. असंही चित्र इथे चालू शकेल, हो ना?
Fish.jpg

बेष्टेस तू मामी..आम्हा सर्वांतील कलादृष्टी जागृत करायला प्रवृत्त करणारी मस्त, आगळीवेगळी कल्पना मांडलीस......
जियो!!!!

लेकीच्या शाळेतल्या आर्टएक्झिबिशनमधली एक कलाकृती. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वापरून केलेली.

ही एक वाळूपासून बनवलेली कलाकृती. हाय स्ट्रीट फिनिक्समध्ये हा कलाकार ती एक आठवडा बनवत होता. एका शनिवारी मी गेले तर फक्त वरचा भाग तयार होता आणि तो कलाकार अत्यंत तन्मयतेनं आणि जीव ओतून बारीक सारीक तपशील भरत होता. त्या छोट्याछोट्या वीटांचा आकार, झरोके किती बारीक काडीने कोरून काढत होता. मग पुढच्या शनिवारी गेले तर कलाकृती पूर्ण झाली होती. तो कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी देणगी गोळा करत होता.

यात जे जे वाळूच्या रंगाचं दिसतंय ते वाळूपासून बनवलंय. अगदी तो साखळदंडसुध्दा आणि खालची कॅन्सरची पाटी सुध्दा!

आमच्या लायब्ररीमध्ये मुलांकडून रिकाम्या दुधाचे कॅन्स मागवून केलेला इगलू. ह्यामध्ये बसून छोटी मुलं पुस्तकं वाचतात.

Igloo.jpg

मस्तच!! Happy

लिफ्टच्या दरवाज्यांवरची कला क्लासच!

आर्च, इग्लु ची आयडिया भारीच!

मस्तच कल्पना गं मामे!
आर्च, इग्लु मस्तच आहे!
थोडयावेळापुर्वी मामीने टाकलेली प्रचि सोडुन इतर दिसतच नव्हती!

दुसर्‍या धाग्यावर टाकलेली प्रचि परत टाकली तर चालतील का? नाही तर मी डिलिट करेन इथुन. मी पुर्वी निगवर टाकली होती ही.

एम्प्रेस गार्डनमधे भाजी, फुलं & फळं प्रदर्शनामधे या सुंदर्‍या भेटल्या. मला प्रचंड आवडलेली ही कल्पना. मी ठेवलेलं याचं नाव - PURE VEG. Happy

कारल्याचे Ear rings, मटरचा नेकपिस आणि रेड चिलीचं पेंडंट. चायनीज कॅबेजचा ब्लाउज - मस्त कलर आहे ना?

empress garden1.JPG

बांबुच्या चटईचा स्कर्ट विथ वेलदोड्याची फॅन्सी चेन.

empress garden2.JPG

कॉर्न आणि करेल्याचा नेकपिस & रेड आणि ग्रीन चिलीजचा सेक्सी टॉप. ( एकदम ftv मॉडेल Wink )

empress garden3.JPG

Don't miss the finger ring and bracelet !

empress garden4.JPG

या exit जवळ निरोप द्यायला उभ्या होत्या.

empress garden5.JPG

Pages