पावसाळ्यातील एक दृश्यः ह्या विषया वरील चित्र काढले आहे. भेटायला ये आत्ताच असा प्रियकराचा संदेश आल्याने प्रेयसी लगबगीने तयार होउन निघाली आहे. छोटीशीच छत्री, पायाला आळता लावलेला तो अजून थोडा ओला आहे. केशरचना केली आहे पण वेणी सैल झाल्याने थोडे केस विखुरले आहेत व गजर्यातील थोडी फुले बाहेर पडली आहेत. जोरात वारा असल्याने तरंगत आहेत.
अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल |
मकार महामंडल | मस्तकाकारे ||
अशा शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या कल्पनेतलं श्रीगणेशाचं शब्दचित्र उभं केलं. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपल्या बालकलाकरांसाठी संधी आहे आपापल्या कल्पनेतलं चित्र साकार करण्याची. परंतु हे काव्यरुपी चित्र नसून प्रत्यक्ष अक्षरचित्र असणार आहे.

नमस्कार,
3D painting साठी तुम्ही कोणती सॉफ्टवेअर्स वापरता? ती फोन/संगणकावर वापरताना आणखी काही हार्डवेअर (डिजीटल पेन/पॅड इ.) लागते का? मी मायक्रोसॉफ्ट paint 3D थोडेफार वापरले आहे पण त्यात खूपच मर्यादा येतात असे वाटले.
धन्यवाद.
लहान पणा पासून मला स्केच पेन ने चित्रे रंगवायला फार आव डते. स्वतः काढायचे म्हट ले तर थोडी इलस्ट्रेशन कार्टू न येतात. कॅमलिनचा नवा बारा पेन चा सेट आणला की त्या बरोबरच एक गुड क्वाली टी व्हाइट कार्ड शीट येत असे. साध्या ड्रॉइन्ग बुक पेक्षा सुरेख असे. त्यावर सर्व रंगांनी फुले काढायची हा बेस्ट उद्योग होता.
त्यातही गुलाबी व चिंतामणी- कॉपर सल्फे ट हे रंग आव डते. तसेच निळ्या रंगांच्या सर्व छटा. काही चित्रे हिरवी गुलाबी पिवळी अशी आहेत. काही चिंताम णी रंगां च्या शेड्स आहेत. काही निळ्या रंगांच्या शेड्स काही ब्राउन चॉकोलेटी रंगाच्या आहेत.
जलरंग माध्यम वापरून काढलेले गुलाबचित्र !
डिजिटल पेंटिन्ग - पानगळ - नैनिताल
मंडला आर्ट आणि झेन्टेंगल पॅटर्न वापरून काढलेले गणपती चे चित्र..

मुक्तहस्त चित्र स्पर्धा
पाल्याचे नाव : विराज(वय ३ वर्ष)
Fingerprint color वापरून गाजर, लिंबू, भेंडी वापरून ठसे दिले. पानांच्या ठश्यासाठी मेथीची काडी घेतली होती. पण त्याला काही जमेना मग त्याने बोटानेच हिरवा रंग लावला.

ब गट
गणपती चित्र
साहित्य- साधा कोरा कागद, पेन्सिल, खोडरबर, काळा बॉल पेन, स्पार्कलपेन( सोनेरी आणि शेंदरी)
पेन्सिल ने साधारण आकार,रेषा काढून घेतल्या,त्यावर आधी सोनेरी स्पार्कल ने रंगवून मग काळ्या बॉल पेन ने नक्षीकाम केलं

हात, पोट,मांडी या ठिकाणी साधारण ओंकार चा मोठा आकार दिला

||प्रथम तुला वंदितो कृपाळा ,गजानना गणराया ||
ब गट - प्रवेशिका.
मी काढलेले जलरंगातील हे श्रीगणेशाचे चित्र . मायबोलीकरांना आवडेल ही अपे़क्षा आहे.
सर्वप्रथम श्रीगणेशाचे स्केचिंग करुन घेतले.

त्यानंतर जलरंगाचा वापर करुन चित्र पूर्ण केले .

फोटो रेफरन्स : पिंटरेस्ट साईट