कला

आनंद

Submitted by चाऊ on 1 December, 2012 - 00:00

कुणी पुसावे डोळे म्हणून आसवं येत नाहीत
का होतात सर्द पापण्या मलाच नाही माहीत

सरत नाही संध्याकाळ विरत नाही अंधारात
दिवस रात्रीच्या वेशीवरती हरवलेपण आत

कळले नाही कधी निसटला हातामधला हात
गेले सारे उरे निशाणी हातावरल्या रेषांत

सगळे आहे तरी रितेपण झाकळल्या मनात
काय मिळे हे सुख मलाही तु दिलेल्या कळांत

काळालाही काही कळेना हि स्तब्धता जगात
सुखावते अस्वस्थ वेदना, शांती तळमळण्यात

दुखावला जो उरी झेलुनी कट्यारीची पात
तोच जाणतो लपवुन अश्रु जगणे आनंदात

शब्दखुणा: 

॥ रावण विरचित शिव तांडव स्तोत्र ॥ - मराठी अनुवाद

Submitted by नरेंद्र गोळे on 28 November, 2012 - 08:19

॥ रावण विरचित शिव तांडव स्तोत्र ॥ http://hindi.webdunia.com/religion/occasion/vijayadashami/0710/19/107101...

मूळ संस्कृत श्लोक व मराठी अनुवाद




जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌

डमड्डमड्डमड्डम न्निनादवड्डमर्वयं
चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम्‌

जटांमधून धावत्या जलांनि धूत-कंठ जो
धरीत सर्पमालिका, गळ्यात हार शोभतो

डुम्मूडुम्मू करीत या, निनाद गाजवा शिवा
करीत तांडव प्रचंड, शंकरा शुभं करा




जटा कटाहसंभ्रमभ्रम न्निलिंपनिर्झरी
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि

धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके

शब्दखुणा: 

भिक्षावळ काय करावी?

Submitted by madevi on 27 November, 2012 - 02:54

माझ्या पुतण्याची मुंज दोन महिन्यानंतर आहे. पारंपारीक भिक्षावळ तर गावी करतीलच पण तुम्हाला काही नविन प्रकार माहित असतील तर सुचवा ना .

विषय: 
शब्दखुणा: 

आमचे तुळशी वॄंदावन

Submitted by NANDALE ART on 24 November, 2012 - 08:46

तुळशी वॄंदावन रंगकाम
रंग माध्यम, ऑईलपेंट कलर
वॄंदावनला आधी प्रायमर मारुन पांढरा कलर ऑईलपेंट दिला.Imaget11.jpg
नंतर लाल, नारंगी,पिवळानारंगी, पिवळा,पिवळा हिरवा, निळाहिरवा, गुलाबी रंग दिला.Tulas.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

कानाखाली चक्क वाजली होती

Submitted by बन्या on 15 November, 2012 - 04:53

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/39058

कानाखाली चक्क वाजली होती
तिच्या भावाने फाडली होती

पूर्ण रस्ता हाणला गेलो
जे मला धूती ...... धोबी होती

आज फुटलो तसाच पण
आजची धुणी नवी होती

रोज सुजणे फुलत होते
रोज सुजण्यात टवटवी होती

काल काही निमित्तही नव्हते
तरीही धुतला गेलो होतो

माराची सुरुवात फक्त त्याची
उरलेला शेवट ...... मित्र करिती

त्यातले तुझे असो नसो कोणी
धुताना सर्व एक होती

दिवाळिची क्षणचित्रे

Submitted by चाऊ on 14 November, 2012 - 02:28

माझी दिवाळीतली रांगोळी

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 13 November, 2012 - 04:31

ही माझी ह्या वर्षीच्या दिवाळीत काढलेली रांगोळी Happy

DSC01744-002.JPG

विषय: 
शब्दखुणा: 

माझ्या ऑफिसातल्या रांगोळ्या - २०१२

Submitted by साधना on 12 November, 2012 - 10:53

सगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

माझ्या ऑफिसातल्या हौशी कलावंतानी दिवाळीच्या स्वागतासाठी घातलेल्या रांगोळ्या इथे देतेय.

खालची रांगोळी रंगवलेले तांदुळ वापर्पुन घातलीय.

शब्दखुणा: 

लक्ष लक्ष रंग दिवे .......!!!! स्वप्नांना पंख नवे......!!!!!

Submitted by salgaonkar.anup on 12 November, 2012 - 00:08

तेवायला हवा अंतरीचा दिवा,
जपायला हवा अंतरीचा ठेवा,
उघड कवाड आपल्या मनाचे,
येतील कवडसे आतून प्रकाशाचे............!!!!
आला दिवाळी सण, साजरा करूया आपण सारे जण. मायबोलीच्या सर्व परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा .......!!!

आम्ही घरीच तयार केलेला आकाश कंदील
2012-11-11 17.01.19.jpg2012-11-11 21.43.57.jpg

धनत्रयोदशी निमित्त दारापुढे काढलेली हि सुरेख रांगोळी

उत्कृष्ट लाकूडकामाचा नमुना

Submitted by जाह्नवीके on 6 November, 2012 - 05:42

नमस्कार मंडळी,

अंगोलातून बस्तान हलवायची वेळ जसजशी जवळ यायला लागलीये तसं इथून इथलं अस काहीतरी घेऊन जाता आलं तर बरं असं वाटू लागलंय.......डोळे रस्त्यावर विविध गोष्टी शोधायला लागले.....आणि एका लाकूड काम करणार्‍या माणसावर येऊन थांबले...त्याच्याकडून मित्र मंडळींसाठी करून घेतलेले हे काही नमुने.....
हे सर्व नमुने त्याने अ‍ॅकेशिया च्या लाकडापासून तयार केले आहेत. त्यावर ऑईल बेस्ड रंग देऊन चमक येण्यासाठी काळ्या रंगाचं बूटपॉलिश मारलं आहे. Happy

(१)
1_1.jpg

(२)

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कला