मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
छंद
मी आनंद यात्री!
छंद! या विषयावर माझ्या पेक्षा मातेकडे जास्त असेल सांगायला! माझी माता- अतिशय गुणसंपन्न. कुठं काही ओझरतं पाहीलं तरी हुबेहूब किंवा कांकणभर जास्त चांगले करायचा तिचा हातखंडा! शिवण, embroidery, knitting, crochet, drawing, हस्तकला, रांगोळ्या, पाकसिद्धी, लेखन, वाचन, teaching... म्हणजे you name it and she has it! तर अशा मातेचे आम्ही शेंडेफळ. यातील बरंच काही तिनं शिकवण्याचे प्रयत्न केले पण आस्मादिकांनी बर्याच वेळा यू टर्न करून तिचे सगळे बेत यशस्वी रित्या हाणून पाडले!
आनंद छंद ऐसा ... मनीमोहोर
जावयाना द्यायच्या अधिक महिन्याच्या वाणावर घालायचा क्रोशेकामाचा रुमाल असो किंवा भरतकाम , क्विलटिंग असो अगर मार्केटला भाज्या महाग करणारा माझा व्हेजिटेबल कारविंग चा छंद असो , क्रेपची अगर सॅटिन ची फ़ुलं असोत , आकाश कंदिला सारखे क्राफ्ट प्रोजेक्ट असोत ह्या सगळ्या बद्दल मी मायबोलीवर बरच लिहिलं आहे आणि त्याच मायबोलीकरांनी खूप कौतुक ही केलं आहे त्यामुळे वेगळं नवीन काय लिहावं ह्या संभ्रमात आहे मी.
आनंदछंद ऐसा - स्वाती२
मी जेव्हा लहानपणीच्या आठवणीत मागे मागे जाते तेव्हा मला कायम आजोबा, मामा, आई, गडीमाणसे यांच्यासोबत आजोळच्या किंवा माहेरच्या आवारात लूडबूड करणारी मी दिसते. कोकणात रहाताना बागकाम हा जगण्याचाच एक भाग होता मात्र त्याचे खर्या अर्थाने छंदात रुपांतर झाले ते अमेरीकेत आल्यावर. भारतात असताना मला कुणी विचारले असते की तुझे छंद काय तर मी वाचन, विणकाम, हस्तकला वगैरे यादी दिली असती. पण म्हणताना आपण एखाद्या गोष्टीपासून दुरावल्याशिवाय तिचे महत्व जाणवत नाही तसे काहीसे माझे झाले. इथे अमेरीकेत लग्न होवून आले, दोन महिन्यात नव्याची नवलाई संपली, पानगळ सुरु झाली आणि काहीतरी टोचू लागले.
कळावे, लोभ असावा...
सुमारे ३५ वर्षांपूर्वीचा काळ. संगणकाशी माझा अद्याप परिचय झालेला नव्हता. मोबाईल फोन तर तेव्हा स्वप्नातही नव्हते. तेव्हा संदेशवहनासाठी दोन मुख्य साधनांचा वापर प्रचलित होता – एक स्थिर-फोन आणि दुसरे पत्र. फोनचे दर हे आजच्यासारखे किरकोळ नव्हते. त्यामुळे फोनचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित असे. परदेशी फोन तर फक्त अत्यावश्यक किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत केले जात. पत्रलेखन विविध कामांसाठी बरेच होई, जसे की व्यक्तिगत, कार्यालयीन, विविध आमंत्रणे, जाहिराती, पत्रमैत्री, इ. महाविद्यालयीन जीवनात मी माझ्या परगावी आणि परदेशात असलेल्या आप्तस्वकीयांना हटकून पत्रे लिहीत असे.
छंद आणि प्रश्न
वाटते स्वत:च्या आत कथेसाठी पात्र शोधावे
कुंभारा प्रमाणे भूमिकेला स्वत: घडवावे
कथेतील भांडणात उगीच का पडावे
पु.लं. प्रमाणे अमृत कण कसे शिंपडावे?
छायाचित्रातील व्यक्तीशी हितगुज करावे
कधी चित्रकारा सारखे छायाचित्र रेखाटावे
त्यात स्वत:च वेगवेगळे मुद्रा, भाव भरावे
निसर्गा प्रमाणे फक्त मुक्तरंग कसे उधळावे?
इतिहासातील खाणाखुणा काढत फिरावे
युद्धातील असामान्य शौर्य परत आठवावे
शिवाजीच्या वीर मावळ्या प्रमाणे लढावे
लिखाण, छायाचित्र, इतिहास क्षेत्र कसे गाजवावे?
क्रिएटिव्हिटीचे नमुने - छंद
हल्ली छंद, कलांशी संबंधित स्तिमित व्हायला लावणारे व्हिडीओज पहायला मिळतात. नंतर मात्र ते सापडत नाहीत. असे आपल्याला पहायला मिळालेले व्हिडीओज सर्वांसाठी शेअर करण्यासाठी हा धागा. प्रकाशचित्रं, मोबाईलने घेतलेले व्हिडीओज, प्रचि हे सुद्धा चालतील. स्वतःचे असतील तर मग धावेल.
इथे एक नमुना म्हणून एक व्हिडीओ शेअर करतोय
https://www.facebook.com/sandeshnewspaper/videos/10153691626765380/
असा केक पूर्वी पाहिला नव्हता. जबरदस्त कलाकारी !
खग ही जाने खग की भाषा - भाग 5
पक्षीनिरीक्षणाची लागलेली आवड लक्षात आल्यावर जुना कॅमेरा व लेन्स विकुन टाकली व नविन गियर घेतला. हा नविन गियर टाकल्याने आमची पक्षीनिरीक्षणाची गाडी या वर्षी सुस्साट धावली. आता गरज आहे ते फोटोशॉप, लाईटरुम सारखे सॉफ्टवेअर शिकुन आणखी चांगला प्रयत्न करायची.
खाली दिलेले सर्व फोटो आधी फेसबुकावर प्रकाशित आहेत पण इथले सर्वच जण तिकडे असतीलच असे नाही. त्यामुळे इथेही ते प्रकाशित करत आहे.
यापूर्वी केलेले प्रयत्न खाली बघता येतीलच.
उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 1 इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
सृजन
काळ्याकभिन्न दगडांच्या फ़टीतून
जसा कोवळा कोंब बाहेर येतो
स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी,
अगदी तसंच मनाच्या कपारीतून
शब्दांचा हिरवागार कोंब डोकावतो
त्याची तगमग थांबवण्यासाठी....
बघता बघता झाकून जाते संपुर्ण कपार
इवल्या इवल्या रोपट्यांनी
आणि पालटतो मनाचा ऋतू
वाहू लागतात भावनांचे वारे
बहरू लागते काव्याचे रान
ओली होते मुळांजवळची माती
पाऊस असला तरीही आणि नसला तरीही.....
-- संतोष वाटपाडे
अंड्याचे फंडे ३ - छंद
Pages
