शिवणकाम

मेमरी क्विल्ट अर्थात स्मृती-चौघडी

Submitted by _प्राची_ on 22 February, 2015 - 10:59

मी अमि यांच्या 'जुन्या कपड्यांचे काय करावे' या धाग्यावर मी आधी याबद्दल लिहिले आहे. तिथे खुप जणांना हि कल्पना आवडली म्हणून नवीन धागा काढून ती परत इथे डकवते आहे. अधिक अधिक लोकांपर्यंत हि कल्पना पोचावी म्हणून.

मुळात हि कल्पना माझी नाही. मी नेट वर पाहून हि उचलली आहे.

लेकाचे टि शर्ट नेहमी कामवाल्या बाईंना देते पण नेट वर मेमरी क्विल्ट पाहिल्यावर थोडे टी शर्ट वापरून हे बनवले. मुलगा मोठा होतोय, असे रंगीबेरंगी कपडे कदाचित पुढे वापरणार नाही. हि आठवण रंगीत दिवसांची.

विषय: 
शब्दखुणा: 

कोणते शिलाई यंत्र घ्यावे ?

Submitted by मी अमि on 20 July, 2013 - 09:29

मला बऱ्याच दिवसांपासून शिलाई यंत्र घ्यायचे आहे पण कोणते घ्यायचे ते कळत नाही. इथे ४ ब्रेंड्स आहेत - सिंगर उषा, ब्रदर आणि बर्निना। मला बिगिनर मॉडल घ्यायचे आहे. पण पुर्वी पायाने चालवायचे तशी मशीन नकोय. कृपया मार्गदर्शन करा।

लोकरी कपडे व गणवेश व्यावसायिका संगीता गोडबोले : एक परिचय : संयुक्ता मुलाखत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 April, 2012 - 04:44

आयुष्यात एक गरज म्हणून नोकरी-व्यवसाय करणारे अनेकजण असतात. परंतु स्वतःची वैयक्तिक आवड जोपासत डोळ्यांसमोर निश्चित उद्दिष्ट ठरवून व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण घेणे, त्यानुसार मार्ग आखत योजनाबद्ध सुरुवात करणे, व्यवसायाचा नियोजनपूर्वक टप्प्या-टप्प्यांत विस्तार, नवनवीन आव्हानांच्या शोधात स्वतःतील कौशल्यगुणांना वाव देत राहणे हे सर्वांनाच जमते असे नाही!

देवाची वस्त्रे

Submitted by मिनी on 4 August, 2010 - 10:11

माझ्या आजीची देवावर खुप श्रद्धा. तिचा देव्हारा बघणं म्हणजे घरी आलेल्या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय असायचा. तिचं नेहमी म्हणणं असायाचं आपल्याला कसे चांगले चांगले कपडे, दागिने घालायला आवडतं तसचं देवालाही ते आवडतं. म्हणुन ती तिच्या देव्हार्‍यातल्या सगळ्या देवांच्या मूर्तींना वस्त्रे आणि दागिने घालायची. त्यावरुनच मला एकदा सुचलं की तू इतके महागाची वस्त्रे विकत आणण्यापेक्षा मी तुला शिवुन देईन. तेव्हापासुन मी दर सुट्टीत मामाकडे गेले कि आजीला वर्षभर पूरतील इतकी वस्त्रे शिवुन घ्यायचे. त्यातही सणासुदीला वेगळे, रोजचे वेगळे असे प्रकार होते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शिवणकाम