सजावट

कलिंगडाची बाबागाडी

Submitted by _प्राची_ on 2 July, 2014 - 00:51

भावाच्या लेकिच्या बारश्याला केलेली कलिंगडाची बाबागाडी. चेहर्‍यासाठी सफरचंद वापरलय. टोपीसाठी कोबीचे पान आणि नाक डोळे साध्या स्केचपेनने काढले. नंतर धुवुन टाकता येते.
कल्पना वेबवर पाहिलेल्या फोटोन्मधून घेतली आहे. फोटो मोबाईल वर काढलेत.

kalingad2.jpgkalingad1.jpg

ह्या वेब वरच्या लिन्का

विषय: 

जुन्या खुर्चीचे नवे रुप

Submitted by विद्याक on 15 September, 2013 - 22:33

आमच्या ऑफीसमधे फंड रेझर साठी जुन्या खुर्च्यांना नविन रुप देउन ( पेन्टींग, मोझॅक, मॉड पॉज..करुन.) त्या विकुन पैसे जमवायचे ठरले. तेव्हा मी कापड लावुन मॉड पॉज हे केले. मॉड पॉज हा एक प्रकारचा ग्लुच असतो तो वापरुन कापड खुर्ची ला चिकटवले. बघा, तुम्हांला आवडते का?

जुने रुप
130908_0000.jpg

नवे रुप
130906_0001.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

फॉंडंट (Fondent) वापरून केक सजवण्याचा प्रयत्न

Submitted by श्रद्धादिनेश on 6 August, 2013 - 08:50

ह्या वर्षी लेकीच्या वाढदिवसाला प्रयोग म्हणून फॉंडंट (Fondent) वापरून केक सजवण्याचा प्रयत्न केला.
अनुभव नसल्याने बरीच मेहनत लागली हाताळायला. पावसमुळे सारखं पाणी सुटत होतं. पण वेगवेगळे आकार बनवायला एकदम मस्त...त्यात मजा आली. हे प्रकरण दिसतं मस्तं...पण खायला खुपच गोड. आपल्याला एवढ्या प्रमाणात साखर खायची सवय नसल्यामुळे असेल. मुलांनी आवडीने खाल्ला पण.

DSC03630.jpgDSC03634.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

पार्टीप्लॅनिंग आणि सजावटीच्या कल्पक कल्पना

Submitted by श्रद्धादिनेश on 24 July, 2012 - 06:51

मी बनवलेल्या कलाक्रुतिंना तुम्हा सगळ्यांनी खुप प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल धन्यवाद. मी बनवलेल्या दुसर्या केकसाठी नविन धागा उघडण्याच्या तुमच्या सल्ल्याबद्दलही आभार. पण लाजोताईंसारख्या केकगुरु इथे असताना माझी तरी केकसाठी नविन धागा उघडायची हिम्मत नाही होणार आणि स्वता: मीच पुढचा केक कधी बनवेन ह्याचा मलाच पत्ता नाही. त्यापेक्शा मला असे वाटतेय की आपण आपल्याकडच्या काही नविन कल्पना इथे वाटून घेतल्यात तर.

विषय: 

कल्पक कल्पना- सादरीकरणाच्या,सजावटीच्या

Submitted by श्रद्धादिनेश on 24 July, 2012 - 06:50

मी बनवलेल्या कलाक्रुतिंना तुम्हा सगळ्यांनी खुप प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल धन्यवाद. मी बनवलेल्या दुसर्या केकसाठी नविन धागा उघडण्याच्या तुमच्या सल्ल्याबद्दलही आभार. पण लाजोताईंसारख्या केकगुरु इथे असताना माझी तरी केकसाठी नविन धागा उघडायची हिम्मत नाही होणार आणि स्वता: मीच पुढचा केक कधी बनवेन ह्याचा मलाच पत्ता नाही. त्यापेक्शा मला असे वाटतेय की आपण आपल्याकडच्या काही नविन कल्पना इथे वाटून घेतल्यात तर.

विषय: 
Subscribe to RSS - सजावट