मुक्त होतो नी मुक्तच राहिलो ।
मी कशातच कधी ना अडकुन राहिलो।।
जगाने रंग बदलले बरेच।
रंग माझा मी राखुन राहिलो।।
खोट्याचा मोह झाला कितीदा।
सत्याची कास मी पकडून राहिलो।।
मनाने जरी घेतल्या उंच भरार्या ।
मातीशी नातं मी जोडून राहिलो।
सुख नी दुःख शरिर भोगतच होते।
मनाने मात्र मी स्थितप्रज्ञ राहिलो।।
तपाच्या तापात घुसळुन मोक्ष आला।
तरी न बदलो फक्त साक्षी राहिलो।।
शेवट काय झाले, नकळले मला।
कळण्यास ते,'मी' न राहिलो।।
बुधवार, ३/९/२५ , ६:३४ PM
अजय सरदेसाई -मेघ
पृथ्वीवरील जीवसृष्टीत निसर्गाने अनेक रंगांची उधळण केलेली आहे. ती अर्थातच मनमोहक आहे. विविध वनस्पती आणि प्राणी हे भिन्नरंगी असून ते वेळोवेळी आपापले ‘रंग’ दाखवत असतात ! मानवनिर्मित अनेक गोष्टीही रंगीत आहेत. विविध रंगांच्या दर्शनातून मनात वेगवेगळे भाव उमटतात. आपल्या दैनंदिन जीवनातील सुसूत्रता अनेक रंगांवर आणि रंगबदलांवर अवलंबून आहे. मुळात आपल्याला रंगज्ञान होण्यासाठी आपले डोळे व मेंदू यांच्यातील विशिष्ट यंत्रणा कारणीभूत आहेत. या अद्भुत व अमूल्य अशा जीवशास्त्रीय प्रणालीवर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी हा लेख.
आभाळाच्या पटावरी
आहे एक रंगारी
नित्य नवी नक्षी पहा
रोज कैसी चितारी
पूर्वेला रामप्रहरी
ये कुंचला घेऊनी
लाल पिवळा केशरी
छटा त्या नाना परी
सांज होता पश्चिमेला
जांभळा नी गुलाबी
शुभ्र मेघांचे पुंजके
वा लकेरी तयावरी
मेघ बरसता कधी
रंग सात उधळी
निळे नभ हे राती
कृष्णरंगी रंगवी
हा पॉटरी स्टुडिओ तिच्या ऑफिसच्या अगदी जवळच होता. ती तिथे ३-४ वेळा तरी जाऊन आली होती. पण वर्कशॉपला जायला जमत नव्हतं. ती पहिल्यांदा आली ते निव्वळ वेळ घालवण्यासाठी. घरी जाऊन करण्यासारखं काहीच नव्हतं आणि ऑफिसमध्ये नसलेली कामं करत वेळ काढणार तरी किती. आतमध्ये एका बाजूला वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे, मातीचे घडे, कप, भांडी, मूर्ती आणि अजून काही सुंदर वस्तू मांडून ठेवल्या होत्या. मागे मंद संगीत सुरु होतं. ती एक एक वस्तू न्याहाळत पुढे चालली होती. प्रत्येक वस्तूसमोर ती बनवणाऱ्या कलाकाराचे नाव आणि मुख्य म्हणजे वयही लिहिलं होतं. तिला सुरुवातीला वाटलं, वय लिहिण्यात काय अर्थ आहे. मग तिच्या लक्षात आलं.
कॅनव्हास
रंगेबेरंगी दुनिया
चौफेर ;
आपले रंग कोणते
ओळखावे कसे?
आपले रंग
ते निवडावे कसे?
रंगेबेरंगी दुनिया
चौफेर ;
त्या रंगात एकरुप
व्हायचे ते कसे?
एकरुप झाल्यावर
स्वतःच स्वतःला
ओळखायचे ते कसे?
आपले रुप-गुण
दाखवावे ते कसे?
प्रश्न आहेत असे
अनेक ;
त्यांस उत्तर
ते द्यायलाच हवे?
कि काही प्रश्न
हे अनुत्तरीतच बरे?
फुलपाखरु..
एक होते रंगेबेरंगी
फुलपाखरु..
त्याचे 'मन'
ऐसे नाव..
ईवलेसे नाजुक
पंख तयाचे
त्यावर सुंदर नक्षी
संस्कारांची.
फुलपाखराच्या
पंखावरचे काही रंग
लाल-गुलाबी
स्वप्नांचे
बालपणीच्या आठवणींचे
उमलणार्या फुलांचे
चांदण्या रातींचे
तर
काही रंग आहेत.,मात्र
निळे-काळे
नको त्या
कटु आठवणींचे
भळभळत्या जखमांचे
चुलीतल्या विस्तवाचे..
(असाच एक जुना पूर्वप्रकाशित लेख.)
मला माहिती आहे, हे 'भव्यदिव्य' शीर्षक वाचून तुम्ही 'अरे वा, अनु चित्रं पण काढते वाटतं?' म्हणून उत्सुकतेने हा लेख वाचायला घेणार. (म्हणूनच हे शीर्षक दिलं! हॅ हॅ हॅ!) पण माझं नातं जडलं आहे ते चित्रांच्या रंगांशी नाही, तर कपड्यांच्या रंगांशी.
ते पाखरू कोळ्याने विणलेल्या जाळ्यात अडकत चालले होते. जितके बाहेर पडायचा प्रयत्न करावा तितके अजूनच अडकत होते. जाळे नाजूक आणि अत्यंत सफाईने विणलेले होते; आणि पाखरू त्याहूनही नाजूक आणि मुलायम. कधी कसे अडकले ते कळलेच नाही..
*****************************************************
त्याचे चित्र आता आकार घेऊ लागले होते. हिरव्या, निळ्या रंगामध्ये मुक्त मोकळे वारे वाहू लागले होते. पावसाची एक सर वेगाने कागदावर चितारली जाऊ लागली. त्याचा हात सफाईने कॅनव्हासवर रंगांची शिंपण करू लागला.
*****************************************************
मोर म्हंटलं की पावसात नाचणार्या मोराचं चित्र डोळ्यासमोर उभ रहातं..नाचणारा मोर फारचं क्वचित बघायला मिळतो...पण अश्या मोराचं दर्शन म्हणजे केवळ आनंदाची उधळणचं.
भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याला परदेशात नाचताना पाहून माझ मन पण नाचू लागलं 
कंट्रीसाईड मध्ये ड्राईव्ह करत असताना, एका फांदीवर मोर दिसलां असं वाटलं. पहिले तर विश्वासचं नाही बसला म्हटलं ईथे कूठून आलेत मोर..भास झाला असावा. असं म्हणतो न म्हणतो तोच एक मोर शिळ ठोकत समोर आला.
