गोष्ट जुनी असली तरी विचार आजही झालाच पाहिजे. प्राणी आणि पक्षी यांच्या पाठीवर निसर्गाने पृथ्वीवर "मनुष्यप्राणी" जन्माला घातला. सगळ्या हुशार आणि बुद्धिमान असा हा मनुष्यप्राणी. निसर्गाने जे जे जन्माला घातलं त्या प्रत्येकासाठी केले काही नियम. निसर्गाचा ठेवा जपला जावा आणि निसर्ग सौंदर्य अबाधित राहावं म्हणून हे नियम. मनुष्य, प्राणी, पक्षी यांना जगण्यासाठी जे जे लागेल ते ते सारं निसर्गाकडूनच पुरवलं जायचं. मानवाच्या अन्न , वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांना निसर्गाने निस्वार्थीपणे तथास्तु म्हंटल.
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आपल्या शिक्षणपद्धतीत शालेय जीवनात 'चित्रकला' या विषयाला जितकं महत्त्व दिलं जातं, दुर्दैवानं तितकीच चित्रकला मी शाळेत असताना शिकले. पण चित्र हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे, ह्याची जाणीव मात्र त्या वयात देखील कळत-नकळत होत होती. कुठे उत्तम चित्र असे, कुठे उत्तम रंगसंगती जमली असेल, कुठे चांगला पॉलीटीकल ह्यूमर व्यंगचित्रातून व्यक्त झालेला असेल, कुठे मुक्त मॉडर्न अभिव्यक्ती असेल, कुठे नुसत्या रेषांतून व्यक्त होणं असेल - आई-बाबा त्यांच्या पाहण्यात आलेली चित्र आवर्जून आम्हाला दाखवत असत.
नमस्कार! ह्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिण-मुंबईच्या NCPA ला जाउन एक अनोखी मैफल आणि त्याची पूर्व-तयारी अनुभवण्याचा योग आला. कलाकार होते उस्ताद झाकीर हुसैन आणि पाश्चात्य ऑर्केस्ट्रा कंडक्टर झेन दलाल.
त्याबद्दल डायरीच्या थाटात लिहिलेले हे अनुभव:
दिवस पहिला - २२ सप्टेंबर
मराठी नाटक बघायला मला मनापासून आवडत असले तरी सध्या मी त्याला मुकलोय. माझे मुंबईतले वास्तव्य आणि नाटकाचे प्रयोग यांचा योग जूळत नाही. यावेळेस मला तळ्यात मळ्यात बघायचे होते, पण त्याच्या
प्रयोगाच्या तारखा जुळत नव्हत्या. मग एक पळवाट म्हणून नाटकाच्या सिडीज शोधत राहतो.
तर यावेळेस प्रशांत दळवींचे, सेलिब्रेशन या नाटकाची सिडी घेऊन आलो. या नाटकाचे प्रयोग होत होते,
त्यावेळेसही मी भारतात नव्हतोच बहुतेक. एका मायबोलीकरणीकडूनच या नाटकाची तारीफ ऐकली होती.
तर आधी थोडेसे या नाटकाबद्दल लिहितो..
नाटक सबनीसांच्या कुटुंबाचे. भाई सबनीस आणि मालती सबनीस यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस. त्याचे
॥ नमन तुला गजानना, गौरी नंदना.. ॥
तुच गगन, तुच पवन, रंग सदन, गंध सुमन
गती-मती त, तुच जिवन, सकल साधना..
॥ नमन तुला गजानना, गौरी नंदना.. ॥
मा.बो.वर गणेसोत्स्व मोठ्या जल्लोषात साजरा होतो आहे..
तुम्हा सगळ्या कलाकारां समोर, माझा ही खारीचा वाटा..:)
गणपतीत मी काढलेल्या काही रांगोळ्या..


माध्यम - जलरंग
कागद - ३०० GSM, 5"x7"
जालावरील जलरंगातील चित्रे पाहून रंगवायचा प्रयत्न केला आहे.