मला रांगोळी काढण्याची खूप आवड आहे. रोज सकाळी दरवाज्यासमोर रांगोळी काढूनच माझा दिवस सुरू होतो. कितीही गडबड असली , तरी रोज साधीशी ठिपक्यांची रांगोळी रेखाटणे आणि सणवार, विशेष प्रसंगी थोडा जास्त वेळ गेला तरी रंग भरून प्रसंगानुरूप रांगोळी काढणे, हा माझा कित्येक वर्षांचा प्रघात आहे.
गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळामध्ये मी काढलेल्या या रांगोळ्या -
१) घटस्थापना -

२) ब्रह्मचारिणी देवी -
गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत रोज रांगोळीमधून मी काढलेली गणपतीची वेगवेगळी रूपे
1)
2)
3)
4)
आम्ही बरेच वर्ष आकाश कंदील घरी करायचो . पारंपरिक कंदील च आवडतो आमच्या घरी सगळयांना. पण अलीकडे काही वर्षे मात्र वेळे अभावी विकतच आणतो. विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत हे जाणवत होतं पण तरी ही बाजारातून रेडिमेड कंदिलच येतो घरी.

---------
संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते.
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे.
सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे.
त्यानिमित्ताने केशवसुतांची 'रांगोळी घालताना पाहून' नावाची एक सुंदर कविता आठवली.
रांगोळी
अंगणी रांगोळी
रेखीव सुंदर
रंगीत साजरा
नाचरा मयूर
मयूर पिसारा
दिमाख आगळा
चित्त आकर्षितो
निलिमा जांभळा
डौल मयुराचा
रेषा उमलती
मेघ पावसाळी
मनी घुमडती
रांगोळी मधुनी
खुणावे जरासा
नाचे मनमोर
उजळल्या दिशा