आपल्या शिक्षणपद्धतीत शालेय जीवनात 'चित्रकला' या विषयाला जितकं महत्त्व दिलं जातं, दुर्दैवानं तितकीच चित्रकला मी शाळेत असताना शिकले. पण चित्र हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे, ह्याची जाणीव मात्र त्या वयात देखील कळत-नकळत होत होती. कुठे उत्तम चित्र असे, कुठे उत्तम रंगसंगती जमली असेल, कुठे चांगला पॉलीटीकल ह्यूमर व्यंगचित्रातून व्यक्त झालेला असेल, कुठे मुक्त मॉडर्न अभिव्यक्ती असेल, कुठे नुसत्या रेषांतून व्यक्त होणं असेल - आई-बाबा त्यांच्या पाहण्यात आलेली चित्र आवर्जून आम्हाला दाखवत असत. त्यातल्या सगळ्या गोष्टी अर्थातच त्या वयात समजल्या असं अजिबातच नाही, पण कुठेतरी मनावर 'आर्ट' पाहण्याचे संस्कार झाले असावेत. पुढे वाचनातून, पाहण्यातून, विविध देशात हिंडण्यातून, विविध लोकांशी झालेल्या गप्पांमधून रंग, रेषा, निर्मीती, अभिव्यक्ती ह्याच्याशी जवळीक घडत गेली. गेल्या काही वर्षांत, आपल्या लहानपणी 'काय गिरगटलंय' असं ज्याला 'गिरगटणं' म्हणलं जायचं, त्या प्रचंड इफेक्टीव्ह, परीणामकारक 'टँगल आर्ट' ची ओळख झाली. आधी डूडल्स वर ओझरती नजर टाकली जायची. मग नकळत डूडल्स बारकाईनं बघायची सवय लागली, त्या रेषांतून अर्थ काढण्याचा, कलाकाराच्या भावना, त्याचं व्यक्त होणं समजून घेण्याचा खेळ मनात रंगायला लागला. गंमत म्हणजे' गेली अनेक वर्ष मी वेळोवेळी 'गिरगटण्यातून, रेषांमधून स्वतःला व्यक्त करायची धडपड करतीये' याची जाणीव मला गेल्या ३-४ वर्षात झाली. आजही अनेक वेळा डोक्यात विषय असतात, त्याचं इंटरप्रीटेशन , व्हिज्युअल, त्यातली प्रत्येक उभी आडवी रेष, रंग, टेक्चर असं समोर दिसतं, पण अनेकदा हातातून हवं तसं उतरत नाही. अशा वेळी लहानपणी 'शास्त्रोक्तरीत्या चित्रकला शिकली नाही' ह्याची खंत प्रचंड बोचते, जाणवते. दरवेळी मला शब्दातून व्यक्त व्हावसंच वाटत नाही. एखादं डूडल काढलं जातं. कधी जमतं- कधी जमत नाही. पण त्यातून व्यक्त झालं निदान स्वतःसाठी की मग दुसर्या अभिव्यक्तीची गरज नाही वाटत. स्वस्थ-शांत वाटतं. I am totally tangled in this tangle art ! अनेकदा स्वतःच्याच लिमीटेश्न्स जाणवतात, पण रेषा स्वस्थही बसू देत नाहीत. त्या उमटायच्या तश्या उमटतातच. या डुडल्सच्या, टँगल आर्ट च्या जगात मी नवखी असले तरी या व्यक्त होण्यातली धडपड, तडफड, नशा, मजा अनुभवण्यात एक गंमत आहे.
ही अशीच काही डुडल्स. २ मिनीटापासून २० मिनीटापर्यंतची मायक्रो-मिनी प्रोजेक्टस ....
हे काही बुकमार्क्स....
आणि ही काही आय-पॅडवर त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे , विचारांप्रमाणे काढलेली डूडल्स
पतझड मे कुछ पत्तोंके गिरने की आहट...
The 'नूज ' is all over the 'न्यूज' ...
हे परवा थँक्सगिव्हींला केलेले डूडलींग. कॉफी शॉपमधे बसल्या बसल्या, गप्पा मारताना केलेले. अगदीच अनप्लॅन्ड.
Turkey Doodle
वॉव मस्तच!! फुलपाखरु व ती
वॉव मस्तच!!
फुलपाखरु व ती फॅशनेबल छोटी आवड्ली.
पॅरीस तर निशब्द.
मस्तच
मस्तच
सुपरलाईक.
सुपरलाईक.
मस्त!
मस्त!
मस्त !!!!
मस्त !!!!
अशक्य भारी आहे हे मी देखिल
अशक्य भारी आहे हे
मी देखिल गिरमिटायचा प्रयत्न करून बघतो आता....
टी बॅग च्या खोक्यामधल्या डिव्ह्यायडर पासून बुकमार्क बनवण्याची कल्पना खूपच भारी आहे.
Sahi!! Paris khupch bolake
Sahi!! Paris khupch bolake aahe..
तू माधव आचवल वाचले आहेस का?
तू माधव आचवल वाचले आहेस का? मला ही प्रस्तावना वाचून माधव आचवल आठवले.
छान काढली आहेस चित्रे. पतझडचे फेसबुकावर पाहिले होते. ह्यातली सगळीच डुडल्स वाटत नाही कारण त्यांना निश्चित एक नाव आहे. जसे की फुलपाखरु, हत्ती, बाहुली, झाड हे डुडल्समधेच येतात का?
बादवे, ते गाणे फारच सुरेख आहे ज्युलीमधले. .. माय हार्ट इज बीटींग कीप सम रीपीटींग!!!
अमेझिंग वर्क, रार!
अमेझिंग वर्क, रार!
मस्तच!
मस्तच!
भारी! कलाकार आहेस तू.. मला
भारी! कलाकार आहेस तू.. मला vase आणि bookmark दोन्ही वरच्या मनीमाऊ आवडल्या
वाह रार!
वाह रार!
सुंदर !!
सुंदर !!
मस्तच!! बुकमार्क्स नि छोटा
मस्तच!! बुकमार्क्स नि छोटा हत्ती आवडला
सुरेखच!
सुरेखच!
फार सुंदर . खूप आवडले.
फार सुंदर . खूप आवडले.
सुरेख
सुरेख
जबर्रदस्त .. कसले भारी आहे हे
जबर्रदस्त .. कसले भारी आहे हे !!
अतीशय सूंदर !!
अतीशय सूंदर !!
मस्तच!
मस्तच!
सुबक सुंदर आहेत सर्व चित्रं
सुबक सुंदर आहेत सर्व चित्रं ..
भारी आहेत. झाड, बरणीवरची
भारी आहेत.
झाड, बरणीवरची मांजर, हत्ती आणि बुकमार्क्स चा पहिला सेट जास्त आवडले.
नं. २ चं झाड, मांजर आणि
नं. २ चं झाड, मांजर आणि बुकमार्क्स आवडले. तुला मेंदीही चांगली काढायला जमत असेल ना?
वा>>>>>>>>>>ह... मस्त मस्त .
वा>>>>>>>>>>ह... मस्त मस्त . किती आर्टिस्टिक आहेस!!!!!!!!!
छानच डूडल्स, रार
छानच डूडल्स, रार
मस्त डूड्लस
मस्त डूड्लस
सुंदर !!
सुंदर !!
वाह रार ! तुझं ' गिरगिटणं '
वाह रार !
तुझं ' गिरगिटणं ' अगदी अफलातुन व्यक्त झालयं.
सुरेख!
सुरेख!
मांजर आणि बुकमार्क मस्त.
मांजर आणि बुकमार्क मस्त.
Pages