क्यालिग्राफीचा - पहिला प्रयत्न

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आई गं!!! जांभळा रंग एकूणच मला अत्यंत अत्यंत प्रिय. त्यात तो जर शाईचा असेल. त्याची नीप छान असेल आणि तो गळत ओघळत नसेल तर आणखीच मजा!!!

माझी ताई जितकी सुंदर रांगोळी काढायचा ना तितकीच सुंदर ती कशिदा काढण्यात, शेणानी घर सारवण्यात, आणि खास म्हणजे लिहिण्यात हुशार! मी चवथ्या वर्गात असताना ती दहावीला होती. तिच्या समोर तिच्या मैत्रिणीची रसायन शास्त्राची वही होती आणि बहिण तिच्या वहीतून आपल्या वहीत काहीतरी समीकरण लिहित होती. ते समीकरण बघून मला इतके नवल वाटले की मला रसायन शास्त्र हा विषय कधी येतो कधी नाही असे झाले होते.

तिच्या हाती पेन जांभळ्या शाईचा होता आणि तिचा अक्षरांंचे कंगोरे, उगार, वेलांटी, मात्रा, तिचा त्र, तिचा तृ, तिचा च, छ, ज, झ.. अगदी कुठलेही अक्षर घ्या.. त्या अक्षरांच्या प्रेमात तुम्ही नाही पडलात तर नवल. तिचे पत्र इतके सुंदर असायचे की सगळे जण तिचे पत्र जपूण ठेवत.

आज मी फेसबुकावर माझ्या एका मित्राची क्यालिग्राफी पाहिली आणि मला ८० चा तो काळ आठवला. मोत्यासारख्या अक्षरांनी मढवलेली वही. आज ताईची ती वही आठवून मी माझ्या कवितेची एक क्यालिग्राफी केली आहे:

kalligraphye.jpg

विषय: 
प्रकार: 

वाह! Happy

जांभळा रंग एकूणच मला अत्यंत अत्यंत प्रिय.<<<<<
म्हणजे तुला वांग्याची भाजी शॉलेट आवडत असणार, बी.. Proud

खुपच छान बी..
मी कॅलिग्राफी तर नै करत पण वेगवेगळ्या पद्धतीने , फाँट वापरुन लिहायला आवडत..
डायरीमधे लिहलेली आवडती वाक्ये टकेल कधीतरी Happy

बी,

छान रे !! मस्त च Happy
श्री अच्युत पालव ह्यांची काही पुस्तके आहेत, ती बघ तुला जर ह्यात इंटरेस्ट डेव्हलप करायचा असेल तर.