। तुझे सुंदर रुप रेणुके विरजे।
। वर्णिताती मुनी देव ,देव राजे।
। कोण स्वगुणांचा करिल गुणाकार।
। तुला माझा अंबीके नमस्कार।
काही महिन्या पुर्वी , यजमानांन च्या अपघाता मुळे दोन महिन्यांची रजा काढावी लागलेली... तेव्हा एका नामांकीत गुरुंचे मार्गदर्शन मिळाले, आणि खुप दिवसा पासुन मनात असलेले कुल स्वामिनीचे चित्र साकारता आले... 
माबोवरील अनेक लेखकांच्या कविता / गझला मला खुप आवडतात.
माझ्यासारखीच आवड असणा-या मित्रांना आणि ओळखितील ईतरांसोबत, ही कला वाटावी असे मला वाटते.
ब-याचवेळा या कलेवर आम्ही, आमच्या अल्पमतीने थोडीफार चर्चाही करतो.
ईथे कला म्हणजे लेख, कथा, कविता, गझल, पा.कृ किंवा प्रकाशचित्र अपेक्षीत आहे.
यामधे पेटेंटेड किंवा एखाद्या विशिष्ट कामासाठिचे कॉपीरायटेड मटेरीयल जसे की पी.एचडी संदर्भातले लेखन किंवा एखाद्या संशोधना संबंधी कॉपीरायटेड लेख अपेक्षीत नाही.
दिनांक १० जून २०१२ , पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली होती , आणि मार्च ending ची सर्व कामे आटपायला आणि ताळे - बंद पत्रक (balance Sheet final ) पूर्ण व्हायला जून उजाडला होते , त्यामुळे कामाचा त्राण घालवण्यासाठी ऑफिस मधले बरेच मेंबर मिळून एक ट्रीप प्लान केली ती हि अगदी पुण्यापासून जवळ ,,,,,,,
चिंब घामेजलेल्या अंगावर
वैशाख वा-याचा सुखद स्पर्श
ढगांच्या संगतीने चाललेला
उन सावलीचा खेळ
कुठे तापलेल्या कातळाची धग
वाडीत, झावळ्यांनी चाळलेलं ठिबक उन
नारळी पोफळीच्या उंच चव-या
फळांनी भरलेल्या आंब्याच्या बागेचा गंध
खारी पाखरांनी फोडलेल्या
पिकल्या फणसाचा सुवास
मन पुन्हा पाच पन्नास वर्ष मागे
गबाळी चड्डी, मळकट आंगडं
अनवाणी पाय, तापलेला फुफाटा
शिंपण्याच्या आळ्यात पाय थंडावून
रहाटाची एकसूरी रे रे ऐकत
कधी वीटी दांडू, गाडा, लगोरी
रात्री उशीरापर्यंत, लॅडीज, झब्बू
वीज जाळल्याने आजीची तगमग
आज ही तीच आस, तीच उन्हाळ्याची हाक
झाड झाडो-यानं लपेटलेलं शांत गाव
आली वीज, गेली वीज, लपंडाव
ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा नसता छंद न करता तो वाढवून शासनाला अर्पण करणा:या काकासाहेब केळकर यांनी उभारलेलेले संग्रहालय म्हणजे ‘राजा केळकर संग्रहालय.’
एका कट्ट्यासाठी मी शिवलेला अनारकली. याच्या लेसेस ही मीच कापडाच्या बनवल्या आहेत.



मैञीणीला खुप घेराचा साध्या पॅटर्नचा अनारकली ड्रेस शिवुन हवा होता तर मॅडमनी मला त्यासाठी ऑर्डर दिली. वे़ळे अभावी मी पुर्ण ड्रेस शिवुन न देता सेमीस्टीचड् शिवुन द्यायचे कबुल केले. तिला वाईन कलरमधे ब्रासो नेट चे मटेरीयल हवे होते, ते आमच्या कडे (बोईसरला) मिळाले पण अस्तराचे कापड मिळाले नाही. तिने कलर कॉम्बिनेशनसाठी एक वेबसाईट सुचवली पण त्यातले सेम कॉम्बिनेशन्स बोईसरला मिळणे मुश्कील होते म्हणुन स्वतःच्या मनानेच एक कॉम्बो शोधला आणि कापड विकत घेतले.
चुकुन धागा दोन दा उ घ ड ला गेला आहे.. त्यां मु ळे संपादित क र ण्यात येत आहे... ़ क्षमस्व.
माहीरा खानचे हमसफर मधले काम आवडले होते म्हणून तिची नवीन, सध्या सुरु असलेली मालिका सदके तुम्हारे (Sadqay tumhare) YouTube वर बघायला घेतली. आता ह्या २७ भागांच्या मालिकेचा शेवटचा एक भाग उरला आहे. त्यात जे होईल ते होईल पण त्या आधीच ही मालिका माझ्या आवडत्या मालिकांमध्ये जाऊन बसली आहे.
लेखक/पटकथाकार खलील उर रेहमान कमर (Khalil-Ur-Rehman-Qamar) ह्यांची ही मालिका त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची कहाणी आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मालिकेची कथा बघता जर ही गोष्ट खरी असेल तर सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भूत असतं ह्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल!