कला

सकारात्मक दृष्टीकोन

Submitted by salgaonkar.anup on 3 May, 2016 - 00:02

एका तळ्याकाठी एक सुंदर बगीचा होता. विवधरंगी फुलांनी बहरलेल्या बगीच्यात माळीकाकांनी एक नवीनच गुलाबाचं रोपटं लावलं होतं. माळीकाका संपूर्ण बगीच्याची खूप काळजी घेत, विशेषतः या नवीन गुलाबाच्या रोपट्याची. दिवसागणिक गुलाबाच्या रोपट्याची छान वाढ होत होती, एके दिवशी झाडांना पाणी देताना माळी काकांना त्या गुलाबाच्या रोपट्याला पाहुन खूप आंनद झाला, त्या रोपट्याला पहिल्यांदाच दोन कळ्या आल्या होत्या. माळीकाका या कळ्या फुलण्याची आतुरतेने वाट बघू लागले. त्या कळ्याही फुलण्याच्या तयारीत असताना अचानक एका रात्री पहिल्या कळीला कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला.

शब्दखुणा: 

शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

Submitted by salgaonkar.anup on 2 May, 2016 - 23:59

लाडक्या राजकन्येला सुयोग्य वर लाभावा म्हणून राजाने स्वयंवराची घोषणा केली.
राजकन्येच्या स्वयंवराचा दिवस उगवला आणि राजमहाल दुमदुमू लागला.
जागोजागी दिव्यांची आरास, फुलांच्या रांगोळ्या, सुवासिक अत्तरे, झेंडूची तोरणे या सा-याने वातावरण आगदी प्रसन्न झाले. अनेक देशो- देशीचे शूरवीर योद्धे, राजपुत्र राजदरबारात उपस्थित झाले. राजहत्तीला दरबारातील रिंगणात उभ करण्यात आलं आणि "जो कुणी पुरुष राजघराण्याच्या राज हत्तीची सोंड आणि पुढचे दोन पाय वर करून दाखवेल त्याच्याशी राजकन्येचा विवाह होईल आणि त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल." अशी घोषणा झाली.

शब्दखुणा: 

मुशायरा १ मे २०१६

Submitted by वैवकु रीटर्न्स on 29 April, 2016 - 04:30

नमस्कार मंडळी !
1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुण्यातील आनंदयात्री या 'सिंगल्स'च्या ग्रुपने गझल मुशायरा आयोजित केला आहे. त्यानिमित्त आपणा सर्वाना आग्रहाचे निमंत्रण
कार्यक्रम : आनंदयात्री आयोजित "गझलसंध्या"
दिवस : रविवार दिनांक १ मे २०१६
वेळ : संध्याकाळी 6:00 वाजता
स्थळ : कम्युनिटी हॉल ,स्काऊट गाईड मैदान,सदाशिव पेठ , पुणे
सहभागी गझलकार:
बेफिकीर (पुणे) , प्रमोद खराडे (पुणे),
वैभव कुलकर्णी (पंढरपूर), निशिकांत देशपांडे (पुणे),
सुप्रिया जाधव (पुणे) .
प्रवेश विनामुल्य !!

सैराटची जादू....

Submitted by केशव तुलसी on 28 April, 2016 - 12:36

सध्या सर्वत्र सैराटचे प्रोमोज चालू आहेत,टीन एज लवस्टोरीवर हा सिनेमा बेतलेला आहे .पण नागराज मंजुळेच्या फॅण्ड्रीमुळे या चित्रपटाकडून अपेक्शा वाढलेल्या आहेत.नागराज मंजुळे प्रत्येक चित्रपटातून सामाजिक भाष्य कारतात.या चित्रपटातही काही सामाजिक भाष्य असेलच.
विशेष म्हणजे या चित्रपटाची माउथ पब्लिसीटी खूप झाली आहे,ज्याच्या त्याच्या तोंडी सैराटची गाणी ऐकायला मिळत आहेत .कोणत्याही मोठ्या कलाकारांना न घेता चित्रपट हीट करुन दाखवने ही नागराज मंजुळे यांची खासियत या चित्रपटा बाबतीतही पाहायला मिळत आहे.नायक व नायिका आधिच प्रसिद्ध झाले आहेत.

सम अंकल

Submitted by दाद on 27 April, 2016 - 20:54

नाही... सॅम अंकल नाहीये ते. सम अंकलच. मुळात सोम अंकल. खरतर काहीही म्हटलेलं चालायचं आम्ही पोरांनी त्यांना. पोरच काय बाकीचेही त्यांना वेगवेगळ्या नावांनी बोलवायचे.
मिस्टर सोमसुंदरम, मिस्टर सोम, सोम अंकल, नुस्तच ओ काका.. ते सम अंकल वगैरे मग आम्हा पोरांनी सुरू केलेली धतिंग.
मारलेल्या हाकेबरहुकुम ते उत्तरायचे.. म्हणजे. येस्सार... पासून काय गं पोट्टे ... ते... ’धा’!

सुध्या

Submitted by satishb03 on 21 April, 2016 - 15:05

वस्तीतला सुद्या म्हातारा झालाय. आता रोज साडी घालत नाही, दाढीही रोज करत नाही. गालावर पांढरे खुंट दिसतात. गरीब गरीब वाटतो .सुद्या म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वी येऊन आमच्या वस्तीत स्थिरावलेला. गोरापान उंचापुरा, देखना तरतरीत हिजडा.
आमच्या कित्येकांच्या ह्यानं टाळु भरलेल्या, ढुंगणं धुतलेली, पायावर घेऊन आंघोळी घातलेल्या. काखेत घेऊन जोगवा मागितलेला. वस्तीतल्या समवयस्क बाप्यांसाठी कायम चेष्टेचा विषय.

विषय: 

पिअर्स साबण

Submitted by satishb03 on 20 April, 2016 - 13:29

पिअर्स साबण काय काय करतो ? एका आंघोळीत बाईला देखणं करुन नवऱ्याला तिच्यावर जबराट प्यार करायला लावतो. ऑफीस मधुन कितीही दमून आलेला असो. पिअर्सने आंघोळ केलीय ना तिने ? आवळलीच पायजे तिला ! संतुर साबण काय करतो ? कौनसे काँलेजमे पढती हो ? उत्तर यायच्या आत आरोळी ! मम्मीsss... मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नहीं चलता ? सैफ लगेच च्यूतिया बनतो ! आरतिच्याबायलिला काय उमर ? ह्या असल्या फाल्तु वचनेबल जाहिरातीँनी आमच्या काही बायका होत्यात वेड्या. आणि माजतात गोंधळ.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - कला