पाश्चात्य संगीत

पाश्चात्य संगीत: का आणि कसे.

Submitted by बिथोवन on 23 September, 2020 - 04:36

बऱ्याच मराठी मंडळीनी भारत भ्रमण केले असेल आणि तसे करताना भारताच्या विविध प्रांतात फिरताना भाषेची अडचण कशी येते याचाही अनुभव घेतला असेल. एक कॉमन दुवा साधणारी भाषा म्हणून हिंदी येत असेल तर बरेच प्रश्न सुटतात पण जिथे त्याच प्रांतातली भाषा बोलण्याचा आग्रह होतो आणि समोरचा माणूस हिंदी वा इंग्रजी बोलत नाही तेंव्हा जो गोंधळ उडतो तसाच काहीसा गोंधळ काहीही नवीन करताना होतो. उदाहणादाखल तुम्ही हिंदी गाणी आवडीने ऐकता पण पहिल्यांदा इंग्रजी गाणी तुम्ही ऐकलीत तेंव्हा इतकी आवडली नाहीत.

मोझार्ट, द ज्वेल थीफ - Beethoven & Mozart- Part (6)

Submitted by बिथोवन on 12 September, 2020 - 02:00

व्हिएन्नामध्ये शोनबर्नला मोझार्टने जो कार्यक्रम सादर केला होता त्यानंतर सम्राट फ्रांझ जोसेफ याने मोझार्टला दिलेल्या हिऱ्याच्या अंगठ्या, भेटवस्तू आणि वस्त्र प्रावरणे घेऊन मोझार्ट, लिओपोल्ड आणि नॅनल,फ्रँकफुर्टच्या दिशेने निघून तिघेजण पुढील दोन वर्षे संगीताचा कार्यक्रम करत युरोप भर हिंडले.

ऑपेरा मेट्रिडेट, रे डी पोंटो - मोझार्ट

Submitted by बिथोवन on 6 August, 2020 - 06:00

(बिथोवन आणि मोझार्ट भाग चार आणि भाग पाच यामध्ये ही कथा विभागून लिहिण्यात आलेली आहे. परंतु माबोच्या रसिक वाचकांना ह्या ऑपराची कथा सलग वाचायला मिळावी म्हणून ही पूर्ण कथा एकाच लेखात लिहिली आहे. धन्यवाद)

चौदाव्या वर्षी मोझार्टने लिहिलेला ऑपेरा मेट्रिडेट, रे डी पोंटो. २६ डिसेंबर १७७० ला मिलान कार्निवल मध्ये या ऑपेराचं तीएत्रो रेजिओ ड्युकल इथे उद्घाटन झालं. सोप्रानो, अल्टो आणि टेनर अशा आवाजाचा उपयोग करून मोझार्टने आपली सातवी सिंफनी अशी पेश केली की त्या सिंफनीने इटलीतल्या लोकांना वेड लावलं!.

(अंक पहिला)

Beethoven & Mozart- (Part-5)

Submitted by बिथोवन on 1 August, 2020 - 10:31

बिथोवन आणि मोझार्ट-(५)

दुसरा अंक कधी सुरू होत आहे याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच परत एकदा मोझार्टने आपली सातवी सिंफनी वाजवावी अशी प्रेक्षकांनी गळ घातली. त्या सिंफनीने इटलीतल्या लोकांना वेडच लावलं होतं. मग दुसरा अंक सुरू झाला.

बिथोवन(आणि मोझार्ट-३)

Submitted by बिथोवन on 8 July, 2020 - 08:53

बिथोवन(आणि मोझार्ट-३)

सहा वर्षाचा असताना मोझार्टने केलेला तो कार्यक्रम अभूतपूर्व ठरला होता. लोकांनी असे  कौतुक केले की एका रात्रीत मोझार्टचे नाव युरोपभर पसरले. त्यानंतर मोझार्टची कीर्ती अशी पसरली की त्याला चमत्कार असेच लोकांनी म्हंटले. हा कार्यक्रम झाल्यावर त्याला व्हिएन्ना, मग प्राग, पॅरिस, लंडन, म्युनिक, फ्रँकफर्ट, झुरीक आणि रोम इथे बोलावले गेले आणि तो आणि नॅनल आपल्या वडिलांबरोबर सांगीतिक दौरा करू लागले.

बिथोवन(आणि मोझार्ट)-२

Submitted by बिथोवन on 20 June, 2020 - 00:55

बिथोवन(आणि मोझार्ट)-२

"मोझार्टचं घर कुठे आहे?" एका वाटसरूला मी विचारलं. 
" सरळ गेलास की सेंट कॅथेड्रल चर्च लागेल. त्याच्या बाजूला मोझार्टस्  व्हिएन्ना नावाची इमारत आहे, ते त्याचं घर".

"डांके" मी म्हणालो आणि चालू लागलो. सेंट कॅथेड्रलची उंचच उंच इमारत दिसू लागली आणि तीस चाळीस घोड्या गाड्या एका इमारतीसमोर दिसल्या. इथेच असणार तो.

मी बिचकतच आत पाऊल टाकले. प्रचंड मोठा हॉल. दोन तीनशे माणसं असावीत. सगळ्यांचा मोठा आवाज  हॉल मध्ये भरून राहिला होता     आणि त्यांची लगबग चालली होती.

NCPA, SOI आणि उस्ताद झाकीर हुसैन - ते अविस्मरणीय पाच दिवस

Submitted by आशयगुणे on 4 November, 2015 - 00:28

नमस्कार! ह्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिण-मुंबईच्या NCPA ला जाउन एक अनोखी मैफल आणि त्याची पूर्व-तयारी अनुभवण्याचा योग आला. कलाकार होते उस्ताद झाकीर हुसैन आणि पाश्चात्य ऑर्केस्ट्रा कंडक्टर झेन दलाल.

त्याबद्दल डायरीच्या थाटात लिहिलेले हे अनुभव:

दिवस पहिला - २२ सप्टेंबर

आधुनिक पाश्चात्य शास्त्रिय संगीताचा एक सर्जनशील निर्माता- आन्द्रे रियू

Submitted by रेव्यु on 4 August, 2013 - 02:11

आंद्रे लीयाँ मारी निकोलास रियू हा पाश्चात्य शास्त्रीय व उपशास्त्रिय तसेच इतर पारंपारिक संगीतात अविष्कार करणारा २०व्या व २१व्या शतकातील अत्यंत यशस्वी कंपोजर समजला जातो. संगीताच्या शुचितेस धक्का न लागू देता ( यावर वाद आहे) भव्य सेट्स व स्थानिय व त्याबरोबरच देशोदेशीच्या तरुण कलाकारांना प्रोत्साहन देत त्याने पाश्चात्य संगीतात ( विशेषतः) ऑर्केस्ट्रा, ऑपेरा,वॉल्ट्झ, सोप्रानो अशा प्रकारांना जनमानसापर्यंत पोहोचविले आहे.

विषय: 

हार्मनी म्हणजे काय?

Submitted by गजानन on 24 April, 2011 - 11:26

पाश्चात्य संगीतातली हार्मनी (Harmony) म्हणजे काय?

Subscribe to RSS - पाश्चात्य संगीत