प्रेम की आकर्षण...(भाग २)

Submitted by अतुल असवले on 16 August, 2018 - 21:04

त्याने पत्र लिहायला सुरुवात केली त्याला तीच नाव नव्हतं माहीत पण त्याने तिला फुलपाखरू असं नाव दिले आणि पत्राला सुरुवात केली.

“प्रिय फुलपाखरू,”
मी अमोल, तुला तर माहीतच आहे. मला तुझं नाव नाही माहीत म्हणून मी तुला फुलपाखरू अस नाव दिले आहे. जवळ जवळ आता एक महिना होत आला मी तुला Follow करत आहे आणि माझी खात्री आहे तुला ही ते जाणवलं असेल कदाचित.
मागे आपलं बोलणं अर्धवट राहील.पण आज मात्र तू जेव्हा हसलीस तेव्हाच ठरवलं आता काही करून तुझ्याशी बोलायचं म्हणून हे पत्र लिहिनायचे धाडस करतोय. हे बघ मी जास्त गोल गोल विषय फिरवणार नाही.
मला तू खूप आवडतेस. आज ज्या बस स्टॉप वर आपण अनोळखी सारखे उभे असतो तिथे मला तुझ्यासोबत मस्त गप्प मारत उभं राहायच्य.बस मध्ये एकाच सीट वर बसायचे आहे.तुज्या नावा मागे मला माझे नाव लावायचं आहे.
मी अस नाही बोलणार की तु होच बोल पण नकाराचे कारण कळे तर जास्त आवडेल.

तुझा (अर्थातच हो बोललीस तर)
अमोल

अश्या रीतीने त्याने पत्र संपवले आपण काही चुकलो तर नाही ना ही खात्री करण्यासाठी त्यानें पत्र 2 वेळा परत वाचले. अमोलने ते पत्र आता बॅग मध्ये नीट ठेवलं आता मात्र अमोल जास्तच अस्वस्थ झाला होता कारण तिला हे पत्र सर्वांन समोर देणार तरी कसे आणि दिले तर ती हो बोलेल का?? असे विचार त्याला खाऊ लागले. अमोल ने फुडें काहीच विचार न करता घट्ट डोळे मिटुन घेतले आणि झोपून गेला .
सकाळ झाली अमोल उठला तयार झाला देवा समोर हात जोडले आणि कॉलेज ला जायला निघाला. कॉलेज ला पोहोचला पण मनात एकच विचार होता “ती हो बोलेल का??”. 5 वाजले अमोल नेहेमी प्रमाणे शेवटचं लेक्चर बंक करून निघाला जाताने त्याने एक चॉकलेट घेतलं नुसतं पत्र कस देणार म्हणून. अमोल बस स्टॉप वर पोहोचला नेहेमी प्रमाणे त्याने भिकार्याला पैसे दिले आणि तिची वाट बघू लागला.प्रिया अली तिने दुरूनच अमोल ला लुक दिला आता मात्र अमोल चा आत्मविश्वास वाढला. ती जाऊन रांगेत उभी राहिली अमोल ही मागे मागे गेला बाजूला उभा राहिला आता मात्र त्याला अक्षरशः घाम फुटला होता त्याने 2-3 वेला आजू बाजूला बघितलं कोणी बघत तर नाही ना?? आणि पूर्ण खात्री पटल्यावर त्याने पटकन बॅग मधून चॉकलेट आणि पत्र काढून प्रिया कडे हात केला प्रिया ने आश्चरचर्या ने बघितलं आणि आजू बाजूला बघून ते पत्र आणि चॉकलेट घेतलं. अमोल ला विश्वासच बसत नव्हता की तिने पत्र घेतलं अमोल च एक टेन्शन गेला होता आता मात्र तिच्या उत्तराची वाट बघावी लागणार होती.बस आली दोघेही बस मध्ये चढले ती नेहेमी प्रमाणे ladies सीट वर जाऊन बसली. तिचा स्टॉप आला ती उतरली आज मात्र तिने उत्तरताने smile दिली नाही अमोल ला टेन्शन आले त्याने बस च्या खिडीकतुन तिला एकटक बघायला सुरवात केली.
प्रिया पुढे गेली आणि मागे वळून बघीतले आणि लाजत अमोल ला बाय केल.अमोल ला खरंच विश्वास बसत नव्हता अमोल च मन आता भरून आलं होतं आणि आता मात्र अमोल ला पत्राच्या उत्तराची गरज नव्हती. अमोल घरी आला त्याचा आनंद त्याच्या चेहरयावर दिसत होता.अमोल आता स्वप्न रंगवू लागला होता.अमोल ला आता फक्त उद्याचा दिवस कधी उगवतो याची उत्सुकता होती.त्याने ठरवलं होतं उद्या तिला घेऊन कॉफी प्यायला जायचं मस्त गप्पा मारायच्या.
इकडे प्रिया घरी आली ती रूम मध्ये गेली दरवाजा आतुन बंद करून घेतला हळूच पत्र बाहेर काढलं तिने ते वाचायला सुरुवात केली वाचताना तिच्या चेऱ्यावरच नकळत आलेलं हसू सर्व काही सांगत होत. तीच पत्र वाचून झालं तिने पत्र आपल्या हृदयाला लावले आणि ती पण स्वप्न बघू लागली पण मधेच ती दचकली काय माहीत तिला कसलं तरी टेन्शन आलं तिने हातातलं पत्र बाजूला ठेवलं.

आता त्या दोघांना ही उत्सुकता होती ती भेटायची……..

Next part coming soon stay tunned….

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users