महाराष्ट्र

माझी गाणी... "कळेना मला हे कशी वेगळी तू..." (नवीन)

Submitted by limayeprawara on 16 January, 2016 - 04:51

मित्रांनो,
एक निखळ हळुवार प्रेमगीत... आणि एक उत्कृष्ट गझल...
प्रेयसी आणि प्रतिभा... दोघीही सारख्याच... कधी चांदणं बरसवणाऱ्या तर कधी उन्हात उभं करणाऱ्या... कंपोजर म्हणून मलाही असंच जाणवतं... "कळेना मला हे कशी वेगळी तू..." म्हणून... प्रियकर "अथांग यमन", मी आणि रोमँटिक वॉल्ट्झ...

"कळेना मला हे कशी वेगळी तू..."

जरूर ऐका आणि आपले मत नोन्दवा....
धन्यवाद.... प्रवरा

विषय: 
प्रांत/गाव: 

हॉरर चित्रपटांची नावे सांगा.

Submitted by Swara@1 on 11 January, 2016 - 02:10

आज ऑफिसमध्ये काही काम नसल्याने(आणि बॉस हि नसल्याने) तुनळि वर चित्रपट पहायचा विचार करतेय. तर कृपया एखादा चांगला हॉररपट सुचवा.

विषय: 
प्रांत/गाव: 

आयटी आणि भाकरी

Submitted by mi_anu on 12 October, 2015 - 09:55

(हा धागा काढण्यास लायक नाही असे वाटल्यास काढून टाकावा.)
अगदीच राहवलं नाही म्हणून लिहीतेय.
हे सकाळ मध्ये आयटी आणि भाकर्‍यांबद्दल लेख लिहीणारे साहेब खरंच आयटीत आहेत का? त्यांच्या लेखनात थोडं सरसकटीकरण आणि विसंगती दिसतात म्हणून.
या लेखांबद्दल चर्चा करायची असल्यास इथे लिहा.

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4688866888234778423&Se...

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

अर्धा-दशक लहान बायको - भाग २

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:02

आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे.

प्रांत/गाव: 

अर्धा-दशक लहान बायको - भाग १

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:00

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.

रंग रेषांच्या देशा.... - तुझे रुप चित्ती राहो...

Submitted by प्रदीपा on 24 September, 2015 - 04:33

या विभागात सगळ्यात पहिला आलेला मल्लीनाथ चा गणपती पाहिला आणि ठरवले की आपण ही टाकू इकडे एखादे चित्र.. असंच झटपट काढून...

तसे भरपूर गणपती काढून झालेत... शाळेत असताना पेन्सील ने गणपती काढायचे वेगवेगळ्या मूडमधले... असा छंदच लागत असे गणपतीची सुट्टी पडली कि,

पण.. अजुन पेन्सील हातात घ्यायला सवडच झाली नाहीय... तोवर आठवलं .. मागे कधीतरी रंगां चे फटकारे मारुन एक समर्थ आणि गणपती काधलेला आहे... सध्या नवा काढुन होइपर्यन्त तो द्यावा.. माय्बोलीच्या गणेशोत्सवात आपला पण सहभाग...:)

प्रांत/गाव: 

हाडाची काडे आणि सायकल

Submitted by बन्या on 12 August, 2015 - 03:05

नमस्कार

सध्या सगळीकडे सायकल चालवण्याचे एवढे फ्याड आलेले आहे कि मलाही आता एक सायकल घेउशी वाटत आहे
पण आम्ही पडलो बारीक , काटकुळे जवळ जवळ सायकलच्याच वजनाचे.
मित्र बेदम हसले माझी कल्पना ऐकल्यावर, म्हणाले अरे आता दिस्तो आहेस तोही दिसणार नाहीस , नको या लफड्यात पडूस , तुला कर्डिओ ची गरज नाही .

नेट वर बराच सर्च मारला , पण मिश्र स्वरुपात प्रतिसाद दिसलेत
आता काही कळेनासे झालेय , आतून इच्चा तर खूप होतेय सायकल चालवण्याची , मस्त ,लेगस बनवण्याची,;)
पण साला अजून बारीक झालो तर संपलोच

मी जास्त खाऊ शकत नाही, जिम मध्ये जाऊन वजने उचलून पाहिली , पण आहार वाढत नसल्याने त्याचाही उपयोग होत नाही .

विषय: 
प्रांत/गाव: 

शुभम भवतु !!!!

Submitted by एम . प्रविण on 22 July, 2015 - 22:43

नमस्कार मंडळी ,

खूप दिवस झाले मी मायबोली फोलो करतोय, म्हणजे थोडक्यात मी स्वता सदस्यत्व nhanvte घेतले. आज मुहूर्त मिळाला आपण सर्वांनी खूप चं छान गोष्टी इथे share केल्या आहेत. पाककला , चित्र कला , नयनरम्य प्रवास वर्णने , सुंदर कविता , छान छान कथा , अप्रतिम छायाचित्रण … एक ना अनेक गोष्ठी …. इथे खूपशी मिळाली । आपल्या सर्वांचे याबद्दल मनस्वी आभार !!!!!!

काय लिहू हे समजत नाही पहिली post आहे ही. मी हि आज पासून active होतोय … आपल्या सर्वांचे सहकार्याची अपेक्षा !!!

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

वापरून नरम पडलेले बूट पुन्हा कडक कसे करावेत?

Submitted by बाळाजीपंत on 10 July, 2015 - 01:08

नुकतेच माझे ऑफिसात जायचे काळे बूट वापरून वापरून नरम झाले आहेत. आज घालुन बघता असे लक्षात आले की या बुटांचे चामडे लवकरच राम म्हणेल.

त्यामुळे बुट पायातून अलगद मधेच सटकतो.

असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे चामडे कायमस्वरुपी कडक होऊन पायात व्यवस्थित बसतील?

बुट कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेला आहे व कोणत्या प्राण्याच्या कातड्यावर तो चढविला जाणार आहे त्यावरही कडक/नरमपणा अवलंबुन असतो का?

कृपया जाणकार/तज्ञांनी सल्ला द्यावा.

प्रांत/गाव: 

भानामतीकरांचे बुरे दिन केव्हा येणार ..

Submitted by उडन खटोला on 19 June, 2015 - 09:26

नवीन सरकार येऊन अर्धे वर्ष उलटले पण त्याने भानामतीकरांवर कारवाई करण्याचा मुहुर्तच न साधल्याने आमनेसामने असे दोन हात झालेच नाहीत,

पण परवा armastrong नाशिककरा वर कारवाई काय झाली आणि भानामतीकरांचे वांधे झाले. नाही हो,पैसा भरपूर होता पण खुर्चीशिवाय पटरीवरची ट्रेन रखडली होती. कुठून पकडली आणि कुठे पोहोचायचे होते, तेवढे विचारू नका.

विषय: 
प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र